• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • घरातील लोकांच्या घोरण्यामुळे त्रस्त आहात का? हे 5 सोपे उपाय येतील तुमच्या कामी

घरातील लोकांच्या घोरण्यामुळे त्रस्त आहात का? हे 5 सोपे उपाय येतील तुमच्या कामी

नॅशनल स्लीप फाउंडेशनच्या अहवालानुसार तीनपैकी एक पुरुष आणि चारपैकी एक महिला घोरते. घोरणं ही किरकोळ समस्या म्हणून दुर्लक्षित केली जात असली तरी, त्याची अनेक कारणं आहेत, ज्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली,  31 ऑक्टोबर : असे बरेच लोक आहेत जे झोपताना घोरतात (snoring). घोरणाऱ्यांना त्याची कल्पनाही नसते, पण जे घोरणाऱ्यांच्या शेजारी झोपतात त्यांच्यासाठी हा खूप वाईट अनुभव असू शकतो. नॅशनल स्लीप फाउंडेशनच्या अहवालानुसार तीनपैकी एक पुरुष आणि चारपैकी एक महिला घोरते. घोरणं ही किरकोळ समस्या म्हणून दुर्लक्षित केली जात असली तरी, त्याची अनेक कारणं आहेत, ज्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यात चांगली गोष्ट अशी आहे की औषधांचा वापर न करता घोरण्यावर उपचार केले जाऊ (Home remedies to reduce snoring) शकतात. वजन कमी करा असे बरेच लोक असतात, जे आधी घोरत नव्हते पण वजन वाढल्यानंतर ते घोरू लागतात. अशा लोकांसाठी थोडे वजन कमी करणे उपयुक्त ठरू शकते. खरं तर, लठ्ठ लोकांमध्ये मानेच्या भागात अतिरिक्त ऊतक आणि चरबी असते, ज्यामुळे श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. संशोधनानुसार, वजन कमी केल्यास घोरणं कमी होतं. वजन नियंत्रणात ठेवल्यास कदाचित घोरणं पूर्णपणे बंद होऊ शकतं. झोपण्याची स्थिती घोरणं आपल्या झोपण्याच्या स्थितीशी संबंधित आहे. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही तुमच्या पाठीवर झोपता तेव्हा घोरण्याची शक्यता जास्त असते. जेव्हा एखादी व्यक्ती पाठीवर झोपते तेव्हा हवेच्या मार्गातील सभोवतालची ऊतक गुरुत्वाकर्षणामुळे खाली सरकतात, ज्यामुळे श्वसनाचा मार्ग अरुंद होतो. दोन्ही नाकपुड्या स्वच्छ ठेवा सर्दी झाली असेल किंवा नाक जाम झाले असेल तर त्यावेळी झोपेत श्वास घेण्याची प्रक्रिया खूप वेगात होते. ज्यामुळे व्यक्ती घोरू लागतो. नाकपुड्या उघड्या ठेवल्याने घोरणे टाळता येते. गरम तेलाने मालिश किंवा तेलाचे थेंब नाकातील अडथळे उघडू शकतात. तसेच, झोपण्यापूर्वी उबदार अंघोळ करणं फायदेशीर ठरू शकतं. कारण उष्णतेमुळं नाकपुड्या उघडू शकतात आणि घोरण्याची शक्यता कमी होते. हे वाचा - अमेरिकाही शोधून शोधून थकली; म्हणे, ‘कुठून आला Coronavirus कधीच समजणार नाही’ हायड्रेटेड रहा हायड्रेटेड राहणे केवळ निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी महत्त्वाचे नाही तर ते घोरणं दूर ठेवण्यासाठी देखील उपयुक्त आहे. जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा नाक आणि टाळूमध्ये चिकट स्त्राव होतो. यामुळे श्वास घेताना हवेत अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे घोरण्याची क्रिया होऊ शकते. पुरुषांना हायड्रेटेड राहण्यासाठी दररोज किमान 3-4 लिटर पाणी किंवा द्रवपदार्थ सेवन करण्याचा सल्ला दिला जातो, तर महिलांनी दररोज 2-3 लीटर द्रवपदार्थ सेवन करावे. हे वाचा - PICS: अनुष्का शर्मानं वामिकासोबत साजरी केली Halloween Party, पाहा कशी दिसली चिमुकली परी! धूम्रपान आणि मद्यपान धुम्रपान करणार्‍यांमध्ये नाकात सूज येणे किंवा वरच्या श्वासनलिकेला सूज येणं यामुळे घोरण्याची क्रिया होऊ शकते. त्याचे परिणाम दिसण्यासाठी वेळ लागत असला तरी, धूम्रपान सोडल्याने घोरण्याची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. अल्कोहोल, दारूमुळे श्वासोश्वासावर सभोवतालच्या स्नायूंवर परिणाम होतो, ज्यामुळे घोरण्याची शक्यता वाढते. म्हणूनच, झोपेच्या वेळेपूर्वी अल्कोहोल न घेण्याचा सल्ला दिला जातो. घोरण्यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही या टिप्स रोज वापरल्या तर तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळू शकतात.
  Published by:News18 Desk
  First published: