Home /News /lifestyle /

थंडीमुळे पायांच्या बोटांना सूज आलीय का? हे 7 घरगुती उपाय देतील जलद आराम

थंडीमुळे पायांच्या बोटांना सूज आलीय का? हे 7 घरगुती उपाय देतील जलद आराम

Home Remedies For Swollen Fingers: काही घरगुती उपाय करून तुम्ही हिवाळ्यात पायाच्या बोटांना आलेली सूज कमी करू शकता.

    नवी दिल्ली, 23 जानेवारी : हिवाळ्यात थंडीमुळे अनेकांच्या हाता-पायाची बोटं सूजतात (Winter health problem). ही समस्या किरकोळ वाटत असली तरी ज्यांना याचा त्रास होतो त्यांनाच याची गंभीरता माहीत असते, अशा लोकांना हिवाळा म्हणजे अगदी त्रासदायक वाटू लागतो (Winter problem Swollen Fingers). तुम्ही सुजलेल्या बोटांच्या समस्येने त्रस्त असाल, तर तुमच्यासाठी ही समस्या वेळीच दूर करणे महत्त्वाचे आहे. तुमच्याच स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही ही समस्या (Home Remedies For Swollen Fingers) कमी करू शकता. येथे आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही हिवाळ्यात पायाच्या बोटांना आलेली सूज कमी करू शकता. हे उपाय किफायतशीर आणि खूप प्रभावी देखील आहेत. जाणून घेऊया बोटांची सूज कमी करण्याचे सोपे उपाय. सुजलेल्या बोटांवर करा हे उपाय 1.मोहरीचे तेल एका भांड्यात थोडे मोहरीचे तेल घेऊन ते कोमट करावे. आता हीटरसमोर किंवा चुलीसमोर बसून बोटांना तेल लावून चांगला मसाज करा. 2. मीठ पाणी सूज कमी करण्यासाठी दिवसातून दोनदा आपले पाय मिठाच्या पाण्यात घाला आणि किमान 10 मिनिटे राहू द्या. मिठामुळे संसर्ग दूर होतो आणि त्यामुळे पायाची सूजही कमी होते. कोमट पाणी पायांना होणारी खाज आणि वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. 3. काळी मिरी एक चमचा मोहरीच्या तेलात थोडी काळी मिरी मिसळून सुजलेल्या बोटांवर लावा. हलक्या हातांनी मसाज करा. यामुळे खाज आणि जळजळीपासून आराम मिळेल आणि सूज कमी होईल. 4. कोरफड जेल कोरफडीमध्ये अँटीबॅक्टीरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे बोटांना सूज आणि खाज कमी करण्यासाठी मदत करतात. हे वाचा - Success Mantra: जीवनात निराशा कुणाला चुकलीय; यशस्वी लोकं त्यावर अशी करतात मात 5. झेंडूचे फूल झेंडूच्या फुलांची पाण्यात एक चमचा मीठ भिजवून त्याची पेस्ट बनवा. आता या पाण्यात काही वेळ पाय ठेवा. हळूहळू सूज कमी होईल आणि खाज सुटण्यापासूनही आराम मिळेल. झेंडूच्या अर्कामध्ये नैसर्गिक अँटिसेप्टिक गुणधर्म असतात जे त्वचेला जलद बरे करण्यास मदत करतात. 6.हळद आणि मध हळद आणि मध दोन्हीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असतात आणि त्वचेची सूज कमी करण्यास मदत होते. कच्ची हळद बारीक करून त्यात मध मिसळून बोटांवर लावल्यास वेदना आणि सूज यांमध्ये खूप आराम मिळतो. हे वाचा - लसीकरण करून घेणं यासाठी आहे महत्त्वाचं; कोरोना मृत्यूंविषयी डॉक्टरांनी सांगितली धक्कादायक माहिती 7. खोबरेल तेलात कापूर खोबरेल तेलात कापूर टाकून बोटांवर लावल्यास सूज बऱ्यापैकी कमी होते आणि खाज सुटण्यामध्ये आराम मिळतो. (सूचना: येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips, Lifestyle, Winter

    पुढील बातम्या