Home /News /lifestyle /

Lemon-Turmeric: हृदयापासून मेंदूपर्यंत.. लिंबू आणि हळदीचे इतके फायदे तुम्हाला माहीत नसतील

Lemon-Turmeric: हृदयापासून मेंदूपर्यंत.. लिंबू आणि हळदीचे इतके फायदे तुम्हाला माहीत नसतील

Lemon Turmeric Health Benefits : यकृत निरोगी ठेवण्यासाठी, शरीरातील अपायकारक पदार्थ काढून टाकण्यासाठी, लठ्ठपणा कमी करण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. चला, जाणून घेऊया हळद आणि लिंबाचं सेवन आपल्यासाठी किती (Lemon Turmeric Health Benefits) फायदेशीर ठरतं.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 21 जानेवारी : हळद आणि लिंबू आपल्या शरीराला अनेक प्रकारे निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत. लिंबू आणि हळद यांचं एकत्र सेवन केल्यास शरीरातील अनेक समस्या आणि आजार दूर होतात. 'ओन्ली माय हेल्थ'नुसार, लिंबू आणि हळदीचे फायदे शरीरातील सांध्यांच्या समस्यांपासून पचनापर्यंत सर्व गोष्टींसाठी होतात. शिवाय, यकृत निरोगी ठेवण्यासाठी, शरीरातील अपायकारक पदार्थ काढून टाकण्यासाठी, लठ्ठपणा कमी करण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. चला, जाणून घेऊया हळद आणि लिंबाचं सेवन आपल्यासाठी किती (Lemon Turmeric Health Benefits) फायदेशीर ठरतं. हळद आणि लिंबाचे फायदे 1. यकृतातील अपायकारक पदार्थ काढून टाकणं (Liver Detoxification) लिंबू आणि हळदीचं सेवन यकृताशी संबंधित अनेक समस्या दूर ठेवतं आणि ते आपल्या शरीरातील विषारी द्रव्यं बाहेर काढण्यासही खूप मदत करतात. त्यामुळं यकृत स्वच्छ आणि निरोगी राहतं. यकृताशी संबंधित समस्यांमध्ये लिंबाच्या रसामध्ये हळद आणि थोड्या प्रमाणात मध मिसळून सेवन करा. लिंबू आणि हळदीचं नियमित सेवन केल्यानं पचनक्रिया चांगली राहते. 2. लठ्ठपणा दूर करते लिंबू आणि हळदीचे सेवन लठ्ठपणापासून मुक्त होण्यासाठी खूप उपयुक्त आहे. रोज सकाळी लिंबाच्या रसामध्ये मध आणि हळद मिसळून सेवन केल्यास लठ्ठपणाची समस्या लवकर दूर होते. हळदीमध्ये दाह-विरोधी गुणधर्म असतात; जे शरीराच्या समस्यांवर उपयुक्त आहेत. याच्या सेवनानं शरीरातील चयापचय क्रियाही सुरळीत राहते. 3. त्वचा सुंदर बनवा लिंबू आणि हळद देखील त्वचेसाठी फायदेशीर आहे. दररोज लिंबाच्या रसात हळद मिसळून प्यायल्याने त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. तुम्ही फेस मास्क आणि फेस पॅक म्हणूनही वापरू शकता. हे वाचा - मोठी बातमी: कोरोनावर लस न घेता उपाय शोधणार जोकोविच, ब्रिटनमध्ये होणार ट्रायल 4. हृदयासाठी चांगलं लिंबू आणि हळद खाल्ल्यानं हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. हृदयात ब्लॉकेजची समस्या असल्यास लिंबासोबत हळद आणि मधाचं सेवन केल्यास फायदा होतो. याशिवाय हळदीचं सेवन केल्यानं शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि संसर्गजन्य आजारही टाळता येतात. हे वाचा - टाइप-1 आणि टाइप-2 मधुमेहामध्ये काय आहे फरक? या चुकांमुळे शरीरात घुसतो..परत माघारी फिरत नाही 5. मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर मानसिक समस्या दूर करण्यासाठी सुद्धा लिंबू आणि हळदीचं पाणी खूप उपयुक्त आहे. त्यांच्या सेवनानं मूड स्विंग्स नियंत्रित करण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत होते. हळद आणि लिंबामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अँटीडिप्रेसेंट गुणधर्म देखील असतात, जे मानसिक समस्यांवर मात करण्याचं काम करतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या