Home /News /lifestyle /

Health Benefits Of Banana : रोज एक केळ जरूर खावं; त्याचे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे

Health Benefits Of Banana : रोज एक केळ जरूर खावं; त्याचे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे

केळी हे असे फळ आहे जे प्रत्येक हंगामात आणि सर्वत्र सहज उपलब्ध असते. हे इतर फळांपेक्षा स्वस्त आहे आणि झटपट ऊर्जा (Nutrition) देण्यासाठी सर्वोत्तम अन्न मानले जाते.

    नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : सुपर फूड प्रकारात समाविष्ट असलेली केळी (Banana) जगभरात खूप लोकप्रिय आहेत. केळी हे असे फळ आहे जे प्रत्येक हंगामात आणि सर्वत्र सहज उपलब्ध असते. हे इतर फळांपेक्षा स्वस्त आहे आणि झटपट ऊर्जा (Nutrition) देण्यासाठी सर्वोत्तम अन्न मानले जाते. केळी जीवनसत्त्वे, खनिजांनी समृध्द असतात, जी लहान मुलांपासून वडिलधाऱ्यांपर्यंत सगळ्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे असतात. मेडिकल न्यूज टुडे नुसार, जर त्याचे नियमित सेवन केले गेले तर रक्तदाब नियंत्रणात ठेवला जातो. तसेच कर्करोगासारख्या (cancer) गंभीर आजारांपासूनही वाचता येते. जर तुम्ही उपवासादरम्यान देखील केळी खाल्ली तर त्यामुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते. तर जाणून घेऊया केळीचे आरोग्याला फायदे (Health Benefits Of Banana) काय आहेत. केळीचे फायदे 1. रक्तदाब नियंत्रित राहतो अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, केळ्यात पोटॅशियम भरपूर असते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी आहे. हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीला अधिक चांगले कार्य करण्यास मदत करते. जर लोक दररोज मध्यम आकाराचे केळे खातात, तर ते शरीराला पोटॅशियमच्या 9 टक्के गरज पुरवू शकते. 2. दमा दूर ठेवा एका संशोधनात असे आढळून आले आहे की, पोटॅशियम व्यतिरिक्त भरपूर अँटीऑक्सिडेंट घटक केळामध्ये आहेत, जे मुलांना दम्याच्या समस्येपासून दूर ठेवण्यात खूप महत्वाची भूमिका बजावू शकतात. 3. कॅन्सर प्रतिबंध केळीमध्ये काही विशेष अँटिऑक्सिडंट्स लेक्टिन असतात, जे मुक्त रॅडिकल्सपासून पेशींचे संरक्षण करण्यात खूप मदत करतात. एका संशोधनात असे आढळून आले की, लहानपणी केळी, संत्री खाणाऱ्या मुलांना रक्ताचा कर्करोग होण्याचा धोका कमी असतो. हे वाचा - धनुष्यबाण घेऊन गर्दीत पोहोचला हल्लेखोर, बाण सोडल्यानं 5 जण ठार तर अनेक जखमी 4. हृदयासाठी निरोगी केळीमध्ये असलेले फायबर, पोटॅशियम, फोलेट, अँटीऑक्सिडंट्स हे सर्व हृदय निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक घटक आहेत. संशोधनानुसार जर आपण भरपूर फायबर वापरले, तर एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्टेरॉल कमी होऊ शकते. 5. मधुमेह अमेरिकन डायबेटीस असोसिएशननेही दररोज केळी खाण्याची शिफारस केली आहे. हे टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी करते. हे वाचा - ‘दीपिका पादुकोण ते ऐश्वर्या रॉय’ या अभिनेत्रींनी केवळ एका सीनसाठी परिधान केला लाखो-कोट्यवधींचा ड्रेस इतर फायदे केळी खाल्याने स्मरणशक्ती वाढते. पचन चांगले होते. किडनी स्टोन होण्याची शक्यता कमी असते. स्ट्रोकचा धोका कमी होतो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Fruit, Health Tips

    पुढील बातम्या