मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Health News: रिकाम्या पोटी केळी खाता?, जाणून घ्या त्या मागचे फायदे आणि तोटे

Health News: रिकाम्या पोटी केळी खाता?, जाणून घ्या त्या मागचे फायदे आणि तोटे

केळी

गॅसच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही केळी खाऊ शकता. यामुळे तुमचा गॅसचा त्रास मुक्ती मिळण्यास खूप मदत होऊ शकते. केळ्यामध्ये फायबर, आयरन आणि कॅल्शियमसारखे पोषक घटक असतात, जे गॅसच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करतात.

केळी गॅसच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही केळी खाऊ शकता. यामुळे तुमचा गॅसचा त्रास मुक्ती मिळण्यास खूप मदत होऊ शकते. केळ्यामध्ये फायबर, आयरन आणि कॅल्शियमसारखे पोषक घटक असतात, जे गॅसच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करतात.

केळी खाणं आरोग्यासाठी निश्चितपणे चांगलं आहे. पण त्याचे फायदे जाणून घ्यावेत. असं केल्यास शरीराला जास्तीत-जास्त फायदे मिळण्यास मदत होईल.

नवी दिल्ली, 01 नोव्हेंबर: - आपण आपल्या दैनंदिन आहारात विविध खाद्यपदार्थांचा समावेश करतो. नियमित पोषक जेवणाबरोबर दररोज एखादं सिझनल फळ (Seasonal fruit) खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. विविध फळांमध्ये विविध प्रकारचे पोषक घटक (Nutrients) असतात. या पोषक घटकांमुळं आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपल्या शरीराची वाढ देखील चांगली होते. केळीचा (Banana) विचार केला तर, केळी बाराही महिने बाजारामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. केळीमध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम (Magnesium) आणि फॉस्फरस (Phosphorus) हे घटक असतात. त्यामुळं केळीला मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचा मुख्य स्रोत मानलं जातं. त्याशिवाय त्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि फायबर देखील असते. हे घटक आपलं सर्दी आणि इतर आजारांपासून संरक्षण करतात. त्यामुळं दररोज किमान एक तरी केळी खाल्ली पाहिजे. मात्र, केळी नेमकी केव्हा खावी याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. काहीजण रिकाम्यापोटी केळी खाण्याचा सल्ला देतात तर काही जण म्हणतात रिकाम्या पोटी (Empty stomach) केळी खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही. त्यामुळं या दोन्ही पैकी नेमकी कोणती पद्धत शरीरासाठी योग्य आहे? त्यांचे फायदे-तोटे काय आहेत? हे जाणून घेणं आवश्यक आहे. झी न्यूजनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हेही वाचा- Diabetes सह वजन कमी करण्यासाठी 'मल्टीग्रेन आटा' आहे खूप फायदेशीर; जाणून घ्या तयार करण्याची प्रक्रिया

 केळी हे असं फळ आहे ज्यामुळं आतड्यातील संसर्ग दूर होतात. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर सकाळी रिकाम्या पोटी केळी खावी. असं केल्यानं पोट साफ होण्यास मदत मिळते, असं तज्ज्ञांचं मत आहे. केळीचे विविध आरोग्यदायी फायदे आहेत. केळी खाल्ल्यानं शरीर डिटॉक्सिफाय होतं, वजन वाढण्यास मदत होते, शरीराला ताकद मिळते, रोग प्रतिकारक शक्ती वाढते. याशिवाय, जर व्यायाम केल्यानंतर केळी खाल्ली तर जलद गतीनं स्नायू मजबूत होतात.

रिकाम्यापोटी केळी खाण्याचे फायदे

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी केळी खाण्याचे काही फायदे आहेत. रिकाम्या पोटी केळी खाल्ल्यानं पचनक्रिया सुधारते आणि पोट व्यवस्थित साफ होण्यास मदत होते. आपल्या शरीराला पोटॅशियम या खनिजाची गरज असते. हा घटक आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण संतुलित ठेवण्याचं काम करतो. केळी हा पोटॅशियमचा मुख्य स्रोत आहे. त्यामुळं सकाळी दात घासल्यानंतर केळी खाणं, चांगलं मानलं जातं. केळीमध्ये असलेले व्हिटॅमिन ए आणि सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. केळीमध्ये उच्च पोषक घटक आणि कमी उष्मांक असलेलं फळ आहे. 100 ग्रॅम केळीतून फॅट्सरहीत 90 कॅलरी मिळतात. सकाळी केळी खाल्ल्यानं ती जलग गतीनं आपल्या लहान आतड्यापर्यंत जाते. त्यातील सर्व पोषक घटक जसेच्या तसे आतड्यात शोषली जातात. याशिवाय, केळीमध्ये ट्रिप्टोफॅन हे संयुग असतं, सॅरोटॉनिन संतुलनासाठी आवश्यक असलेल्या अमीनो आम्लांमध्ये ट्रिप्टोफॅनचा समावेश होतो. याचा उपयोग तणाव, चिंता, अस्वस्थता आणि निद्रानाश दूर करण्यासाठी होतो.

रिकाम्यापोटी केळी खाण्याचे तोटे

रिकाम्या पोटी केळी खाण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र, त्याचे काही तोटे देखील आहेत. केळ्यांधलं साखरेचं प्रमाण 25 टक्के इतकं आहे. त्यातून शरीराला उर्जा तर मिळते मात्र, ही उर्जा एका ठराविक काळसाठी टिकते. नंतर लगेच थकवा जाणवू लागतो. रिकाम्यापोटी केळी खाल्ली गेल्यास लगेच भूक लागते.

हेही वाचा- Health benefits of dates: हिवाळ्यात खजूर खाण्याचे आहेत अनेक फायदे, इतक्या सर्व आजारांपासून रहाल दूर

 केळी खाणं आरोग्यासाठी निश्चितपणे चांगलं आहे. पण त्याचे फायदे जाणून घ्यावेत. असं केल्यास शरीराला जास्तीत-जास्त फायदे मिळण्यास मदत होईल.

First published:

Tags: Health Tips