Home /News /lifestyle /

Stop Hair Fall: केस गळतीनं तुमचं टेन्शन वाढवलंय? आहारात या पदार्थांचा समावेश ठरेल फायदेशीर

Stop Hair Fall: केस गळतीनं तुमचं टेन्शन वाढवलंय? आहारात या पदार्थांचा समावेश ठरेल फायदेशीर

दररोज 50 ते 100 केस गळत असतील, तर याबाबत काळजी करण्याची गरज नाही. पण जर यापेक्षा जास्त केस गळत असतील तर तुम्ही तुमच्या आहाराची आणि केसांची काळजी घ्यायला हवी. केसांच्या काळजीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

    नवी दिल्ली, 31 मार्च : धावपळीच्या जीवनशैलीत केस गळणं कॉमन होत आहे. मात्र, जास्त प्रमाणात सतत केस गळत राहिले तर ही चिंतेची बाब असते. अमेरिकन अकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजीच्या माहितीनुसार जर दररोज 50 ते 100 केस गळत असतील, तर याबाबत काळजी करण्याची गरज नाही. पण जर यापेक्षा जास्त केस गळत असतील तर तुम्ही तुमच्या आहाराची आणि केसांची काळजी घ्यायला हवी. केसांच्या काळजीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. हेल्थलाईनमध्ये याबाबत माहिती (Food To Stop Hair Fall) दिली आहे. केस गळतीची ही कारणे असू शकतात. -गरोदरपणात किंवा त्यानंतर - औषधाचा दुष्परिणाम (साईड इफेक्ट) -पौष्टिक घटकांची कमतरता - गर्भनिरोध गोळ्यांचा वापर - कोविड नंतर केस गळणे - केसांना जास्त गरम करण्याची साधने किंवा स्टाईलिंग उत्पादनांचा वापर केस गळणे कमी करण्यासाठी तुमच्या आहारात या 5 गोष्टींचा समावेश करा 1. चरबीयुक्त मासे आहारात घेणे फॅटी अॅसिडस्, ओमेगा -3 आणि व्हिटॅमिन डी काही माशांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. उदा. टूना, सी फिश, सॅल्मन, हिल्सा इत्यादी जे केसांसाठी खूप उपयुक्त आहेत. ते खाल्ल्याने केस गळणे कमी होऊ शकते. मासे हे प्रथिने, सेलेनियम आणि बी जीवनसत्त्वांचे चांगले स्त्रोत आहेत. हे सर्व निरोगी केसांच्या वाढीसाठी मदत करतात. 2. अंडी दररोज जर तुम्ही रोज अंड्यांचे सेवन करत असाल तर त्यात असलेले मल्टीविटामिन आणि आवश्यक पोषक घटक केसांना निरोगी बनवतात आणि केस गळणे थांबतात. यामध्ये प्रथिने, बायोटिन, सेलेनियम आणि जस्त यांचा समावेश आहे. केस, त्वचा आणि नखांच्या आरोग्यासाठी बायोटिन आवश्यक आहे. 3. हिरव्या भाज्यांचे सेवन पालक, कोबी इत्यादी हिरव्या पालेभाज्या पोषक असतात, ज्यामुळं केस गळण्यास प्रतिबंध होऊ शकतो. त्यात व्हिटॅमिन ए, लोह, बीटा कॅरोटीन, फोलेट आणि व्हिटॅमिन सी असतात जे मजबूत, निरोगी केसांसाठी आवश्यक असतात. ते लोहाची कमतरता देखील पूर्ण करतात. हे आपल्या शरीराला सेबम तयार करण्यास मदत करते जे टाळूला मॉइस्चराइज करते आणि केसांचे संरक्षण करते. हे वाचा - उन्हाळ्यात जाणवू शकतो सनपॉयझनिंगचा त्रास, जाणून घ्या लक्षणं आणि बचाव 4. फळे फळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. जर तुम्ही बेरी, चेरी, संत्री, द्राक्षे यांसारखी फळे खाल तर तुम्हाला निरोगी आणि सुंदर केस मिळू शकतात. या फळांचे सेवन केल्याने तुमच्या टाळूचे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण होईल. 5. शेंगदाणे आणि बिया वास्तविक, शेंगदाणे आणि बिया जस्त, ओमेगा -3 फॅटी अॅसिड, सेलेनियम, व्हिटॅमिन ई इत्यादी पोषक घटकांनी समृद्ध असतात, जे केस मजबूत करण्यास सक्षम आहेत. शेंगदाणे आणि बियांमध्ये आढळणारे घटक तुमचे केस मजबूत करू शकतात. हे वाचा - उन्हाळ्यातही का होतो सर्दी-खोकल्याचा त्रास? काय आहे उपाय? (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Women hairstyles

    पुढील बातम्या