• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • हिवाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांसाठी पेरू आहे खूप गुणकारी; आहारात असा करा समावेश

हिवाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांसाठी पेरू आहे खूप गुणकारी; आहारात असा करा समावेश

Guava Health Benefits :वजन नियंत्रित ठेवण्यासाठी हे खूप चांगले फळ आहे. पेरूच्या सेवनाने साखरही नियंत्रणात राहते. पेरू शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण करतो, तसेच हिवाळ्यात सर्दी-खोकल्यापासून आराम देतो.

 • Share this:
  नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर : पेरू देशाच्या जवळपास सर्वच भागात आढळतो. हिवाळ्याच्या मोसमात पेरू (guava) बाजारात अधिक दिसून येते. पेरू पिकल्यावर पिवळा होतो. पेरूचे संपूर्ण फळ खाण्यायोग्य असते. हेल्थलाइनच्या बातमीनुसार, हिवाळ्यात पेरू आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. केवळ पेरूच नाही तर पेरूच्या पानांमध्येही औषधी गुणधर्म आहेत. पेरूमध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि भरपूर फायबर असतात. त्यात कॅलरीज खूप कमी असतात. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी हे खूप चांगले फळ आहे. पेरूच्या सेवनाने साखरही नियंत्रणात राहते. पेरू शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण करतो, तसेच हिवाळ्यात सर्दी-खोकल्यापासून आराम देतो. पेरू हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण करतो. पेरूमुळे हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढते. आज आपण पेरूच्या फायद्यांविषयी (Health Benefits of guava) माहिती घेऊया. पेरूचे फायदे साखरेची पातळी कमी करते मधुमेहाच्या रुग्णांसाठी पेरू खूप फायदेशीर आहे. काही अभ्यासात असेही आढळून आले आहे की, पेरूच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. मधुमेहींसाठी पेरूची पाने फायदेशीर आहेत. पेरूच्या पानांचा चहा प्यायल्याने रक्तातील साखर कमी होते. हृदयाचे आरोग्य राखते पेरूमध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते. याशिवाय यामध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स देखील आढळतात, जे मुक्त रॅडिकल्समुळे हृदयाच्या नुकसानीपासून संरक्षण करतात. पेरूमध्ये पोटॅशियम आणि फायबर असल्यामुळे ते हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. हे वाचा - Diwali मध्ये मिळणाऱ्या गिफ्ट्सवर देखील आकारला जातो कर, वाचा काय आहे कॅलक्यूलेशन? मासिक पाळीतील वेदना कमी एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, पेरू आणि पेरूची पाने स्त्रियांच्या मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. पेरूमुळे पोटातील क्रॅम्प्सही कमी होतात. पेरू रोगप्रतिकारशक्ती वाढवतो हवामान बदलले की त्याचा परिणाम शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. अशा परिस्थितीत पेरूमध्ये असलेले अनेक अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात. पेरू केवळ रोगप्रतिकारक शक्तीच वाढवत नाही तर ऊर्जा देखील देतो. हे वाचा - काळजी घ्या; लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोना व्हायरसचा धोका कायम, संशोधनातून माहिती समोर पचन व्यवस्थित होईल पेरूमध्ये इतर फळांच्या तुलनेत सर्वाधिक फायबर असते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. पेरूच्या बिया गॅस आणि अपचनाच्या समस्येवर मात करण्यास मदत करतात.
  Published by:News18 Desk
  First published: