मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Yellow Teeth Treatment: पिवळे दात चारचौघात खराब करतात स्मार्ट लूक, या उपायांनी 7 दिवसात चमकतील

Yellow Teeth Treatment: पिवळे दात चारचौघात खराब करतात स्मार्ट लूक, या उपायांनी 7 दिवसात चमकतील

मौखिक आरोग्याचा तुमच्या एकूण व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक परिणाम होतो. श्वासाची दुर्गंधी, दात पिवळे पडणे, दात किडणे, हिरड्यांमधून रक्त येणे या समस्या तुम्हाला चारचौघात लाजवू शकतात. दात पिवळे झाले असतील तर या घरगुती पद्धतीने उपचार करता येतील.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 25 डिसेंबर : दात पिवळे होण्याची समस्या अनेकांना सतावते. दात पिवळे दिसत असल्यानं त्याचा तुमच्या व्यक्तिमत्वावरही परिणाम दिसून येतो. तुमचे दातही पिवळे असतील आणि तुम्हाला ते पांढरे करण्याचा उपाय शोधत असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. एका अतिशय सोप्या पद्धतीनं दातांचा रंग पुन्हा पांढरा (Get rid of Yellow Teeth) होऊ शकतो.

झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, मौखिक आरोग्याचा तुमच्या एकूण व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक परिणाम होतो. श्वासाची दुर्गंधी, दात पिवळे पडणे, दात किडणे, हिरड्यांमधून रक्त येणे या समस्या तुम्हाला चारचौघात लाजवू शकतात. दात पिवळे झाले असतील तर या घरगुती पद्धतीने उपचार करता येतील.

दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी घरीच बनवा ही पावडर (Tips to get white teeth)

1 टीस्पून दालचिनी पावडर

1 चमचे काळे किंवा रॉक मीठ

एक चमचा मुलेठी

एक टीस्पून लवंग पावडर

काही वाळलेली कडुलिंब आणि वाळलेली पुदिन्याची पाने

हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्या

बारीक पावडर झाल्यावर डब्यात भरून ठेवा.

हे वाचा - Kitchen Tips: मळलेलं पीठ जास्त काळ राहील एकदम मऊसूत; या सोप्या ट्रिक्स वापरून पहा

असा करा वापर

दातांसाठी तयार केलेली ही पावडर एक चमचा घ्या.

ब्रशवर घेऊन दात घासावेत.

30 सेकंद दात घासल्यानंतर स्वच्छ पाण्याने चुळा भरा.

या पावडरने सुमारे 7 ते 10 दिवस ब्रश करा.

हे वाचा - Thyroid Medication: थायरॉईडची औषधं तुम्हीही घेताय? मग या गोष्टी सर्वात अगोदर जाणून घ्या

लवकरच तुमचे दात चमकदार होतील.

रॉक मीठ नैसर्गिकरित्या दातांची चमक वाढवते.

याच्या वापराने दात पांढरे होतात.

कडुलिंब, पुदिना हिरड्या निरोगी ठेवतात.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Health, Health Tips