मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Fast Weight Loss Tips: लठ्ठपणा कमी करण्यासाठी या सोप्या पद्धतींचा करा वापर; काही आठवड्यांमध्ये दिसेल फरक

Fast Weight Loss Tips: लठ्ठपणा कमी करण्यासाठी या सोप्या पद्धतींचा करा वापर; काही आठवड्यांमध्ये दिसेल फरक

एका संशोधनानुसार, लठ्ठपणामुळे टाइप 2 मधुमेह आणि काही प्रकारचे कर्करोग (कॅन्सर) देखील वाढतात. यामुळेच लठ्ठपणा लवकरात लवकर कमी करणं गरजेचं आहे, अन्यथा वाढलेलं वजन इतर कोणत्याही आजारांचे कारण ठरू शकते.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर : लठ्ठपणा वाढल्यानंतर लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे उपचारांसाठी अनेकांचे पाण्यासारखे पैसेही खर्च होतात, अनेक प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही, तेव्हा त्यांची निराशा होते. तुम्हाला किंवा तुमच्या नातेवाईकांना ही समस्या असेल तर काळजी करू नका. आज आपण काही उपाय जाणून घेऊयात, ज्याचे काही महिने नियमितपणे पालन केले तर वजन झपाट्यानं कमी करता (Fast Weight Loss) येतं.

वजन कमी (Weight Loss) करणं का महत्वाचं आहे

एका संशोधनानुसार, लठ्ठपणामुळे टाइप 2 मधुमेह आणि काही प्रकारचे कर्करोग (कॅन्सर) देखील वाढतात. यामुळेच लठ्ठपणा लवकरात लवकर कमी करणं गरजेचं आहे, अन्यथा वाढलेलं वजन इतर कोणत्याही आजारांचे कारण ठरू शकते.

आहार तज्ञ डॉ. रंजना सिंह यांनी झी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या आरोग्यदायी आहार आणि व्यायामाव्यतिरिक्त तुमच्या जीवनशैलीत विविध बदल करावे लागतील. निरोगी आहारात प्रथिने, फायबर आणि सर्व प्रकारच्या पोषक तत्वांचा समावेश करणं महत्त्वाचं आहे. याशिवाय पुरेशी झोप आणि शारीरिक हालचालही खूप महत्त्वाची आहे.

जलद वजन कमी करण्याचे उपाय

1. ध्येय निश्चित

वजन कमी करण्यासाठी तुम्ही ध्येय ठेवा, तुम्ही काय करत आहात, किती खात आहात, या सर्व गोष्टींचा तुमच्या शरीरावर परिणाम होत असतो, याचा गंभीरपणे आणि जाणीवपूर्वक विचार केल्याशिवाय तुम्ही वजन कमी करण्याचे ध्येय पूर्ण करू शकणार नाही.

2. नियमितपणे पाणी प्या

सकाळी उठल्यानंतर किमान अर्धा लिटर पाणी प्यावे. असे केल्याने तुमचे पोट पूर्णपणे स्वच्छ होईल. जर तुम्ही पिण्यासाठी गरम पाणी वापरत असाल तर तो एक चांगला आणि फायदेशीर पर्याय असेल.

हे वाचा - Kolhapur: दागिने लुटण्यासाठी तरुणानं लढवली अनोखी शक्कल; कारनामा वाचून लावाल डोक्याला हात

3. नाश्ता महत्त्वाचा

वजन कमी करण्यासाठी दिवसाची सुरुवात एका चांगल्या न्याहारीने (नाश्त्या) करा. न्याहारी तुमचा संपूर्ण दिवसाचा डाएट प्लान सेट करते. तुमच्या नाश्त्यामध्ये अंकुरलेले धान्य, सोया, बीन्स, स्प्राउट्स, दही आणि अंडी यांचा समावेश करा.

4. निरोगी खा

वजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुमचे वजन वाढवणारे पदार्थ खाणे टाळा. यामध्ये एवोकॅडो, साखरयुक्त ओटमील, केळी आणि जास्त कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ खाणे टाळा. वजन कमी करण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ अधिक प्रमाणात सेवन करावे.

हे वाचा - चेहऱ्यावर दिसतंय Hyperpigmentation? वाचा काय आहेत कारणं आणि त्यावरील उपाय

5. सकाळी चालणे आवश्यक

वजन कमी करण्यासाठी, एखाद्या व्यक्तीने दररोज सकाळी सूर्याच्या सौम्य किरणांमध्ये किमान 20 मिनिटे चालले पाहिजे. यामुळे वजन कमी करण्यातही खूप मदत होते. अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की, ज्या लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असते, त्यांचे वजन लवकर वाढते, सूर्यकिरणांना व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत मानला जातो.

First published:

Tags: Weight loss, Weight loss tips