Home /News /lifestyle /

Constipation Problem: बद्धकोष्ठता असेल तर या '3 C' पासून लांबच राहा; आयुर्वेद तज्ज्ञांनी सांगितले कारण

Constipation Problem: बद्धकोष्ठता असेल तर या '3 C' पासून लांबच राहा; आयुर्वेद तज्ज्ञांनी सांगितले कारण

Constipation Problem Tips: आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर प्रोफाइलवर बद्धकोष्ठतेशी संबंधित एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये डॉ. दिक्षा यांनी बद्धकोष्ठतेशी संबंधित तीन C चा उल्लेख केला आहे. त्यांनी या तीन C पासून लांबच राहण्याचा सल्ला दिला आहे.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 23 मे : सकाळी पोट नीट साफ होत नसेल किंवा त्यात काही त्रास होत असेल तर याचा फक्त आपल्या दैनंदिन वेळापत्रकावर परिणाम होत नाही, तर आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होतो. बद्धकोष्ठतेची अनेक कारणे असू शकतात, जसे की सक्रिय नसलेली बैठी जीवनशैली, चुकीच्या खाण्याच्या सवयी, तणाव आणि अनियमित झोप, या काही बाबी व्यवस्थापित करून प्रॉब्लेम नियंत्रणात आणता येतो. पण जर हा बद्धकोष्ठता दीर्घकाळ चालत असेल तर तुम्हाला त्वरित वैद्यकीय उपचारांची गरज (Constipation Problem Tips) आहे. आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर प्रोफाइलवर बद्धकोष्ठतेशी संबंधित एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये डॉ. दिक्षा यांनी बद्धकोष्ठतेशी संबंधित तीन C चा उल्लेख केला आहे. त्या म्हणतात की, बद्धकोष्ठतेच्या बाबतीत या तीन 'सी'पासून दूर राहणे खूप महत्त्वाचे आहे. त्यांनी लिहिले आहे की, 'तुम्हाला दररोज मल बाहेर जाण्यात अडचण येत असेल, तर पोटात काहीतर गडबडले आहे.'
  जिरे - (Cumin) डॉ. दीक्षा सांगतात की आयुर्वेदात जिऱ्याला जिरक (jeeraka) म्हणतात. हे जीरना (jeerna) या शब्दापासून बनले आहे, ज्याचा अर्थ पचन आहे. जिरक म्हणजे 'जो पचवतो' असा. यामुळे पित्त (पचन सुधारते), लघु (पचनास सौम्य) वाढवते परंतु रुक्ष (स्वभावाने कोरडे) आणि ग्रही (शोषक) देखील आहे. भूक न लागणे, अतिसार, IBS (इरिटेबल बोवेल सिंड्रोम) साठी हे आश्चर्यकारक आहे. परंतु, बद्धकोष्ठतेसाठी नाही. इतर अनेक गोष्टींसाठी जिरे वापरा, परंतु जेव्हा तुम्हाला बद्धकोष्ठता असेल तेव्हा जिरे अजिबात खाऊ नका. दही - दह्यामुळे तोंडाची चव सुधारते, तापमानवाढीचा प्रभाव नियंत्रणात राहतो आणि ते वात संतुलित करते (ज्यात हवा आणि अंतरिक्ष सारखे घटक असतात, ते मन आणि शरीरातील सर्व हालचाली व्यवस्थापित करते). तसेच ते ग्रही आहे, म्हणजे ते शोषक आणि पचायला जड आहे, ज्यामुळे ते "बद्धकोष्ठतेसाठी असंगत" बनते. कोणाला बद्धकोष्ठता असेल तर आराम मिळेपर्यंत दही खाणे टाळा. हे वाचा - Summer Health: उन्हाळ्यात डिहायड्रेशनचे कारण ठरतात या 5 गोष्टी; आजपासूनच खाताना काळजी घ्या कॅफिन - “आपल्या सर्वांचा असा विश्वास आहे की, कॅफीन आपल्या पचनसंस्थेतील स्नायूंना उत्तेजित करू शकते आणि सहज आतड्याची हालचाल होऊ शकते. परंतु कॅफीन (विशेषत: जास्त प्रमाणात कॅफीन) देखील निर्जलीकरणास कारणीभूत ठरते, ज्याचा उलट परिणाम होऊ शकतो आणि बद्धकोष्ठता होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठता असेल तर कॅपिनयुक्त पेये टाळा किंवा डिकॅफिनेटेड कॉफी निवडा. हे वाचा -  Cardamom Benefits: वेलची खाण्याचे इतके फायदे अनेकांना माहीतच नाहीत; अनेक समस्यांवर आहे प्रभावी डॉ दीक्षा भावसार म्हणतात, “कोणीही आपल्या दिवसाची सुरुवात चहा/कॉफीने करू नये, मग तुम्हाला बद्धकोष्ठता असेल किंवा नसली तरी. त्याऐवजी, तुमच्या दिवसाची सुरुवात कोमट पाणी किंवा 1 चमचा गाईच्या तुपाने करा, विशेषतः जर तुम्हाला बद्धकोष्ठता असेल तर.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Health, Health Tips

  पुढील बातम्या