मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Winter Health : थंडीच्या दिवसात पाण्यात फक्त ही एक गोष्ट घालून प्या, अनेक आजार राहतील कोसो दूर

Winter Health : थंडीच्या दिवसात पाण्यात फक्त ही एक गोष्ट घालून प्या, अनेक आजार राहतील कोसो दूर

शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळं कोणत्या शारीरिक समस्या उद्भवतात? -
डोकेदुखी
पोट साफ न होणं किंवा बद्धकोष्ठता

शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळं कोणत्या शारीरिक समस्या उद्भवतात? - डोकेदुखी पोट साफ न होणं किंवा बद्धकोष्ठता

Benefits of drinking Tulsi water : सर्दी आणि घसा खवखवण्याच्या समस्येवरही मात करता येते. पोटाशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास तुळशीचं पाणी प्यायल्यानं त्यावर गुण येतो.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 08 नोव्हेंबर : आज आम्ही तुम्हाला तुळशीचं पाणी पिण्याचं फायदे सांगणार आहोत. हिंदू धर्मात तुळशीची पूजा केली जाते. परंतु, तुम्हाला माहिती आहे का की, तुळस आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवू शकते. हिवाळ्यात तुळशीचं छोटंसं रोपटंही आरोग्यासाठी चांगले फायदे देऊ शकतं. याच्या नियमित सेवनानं केवळ सर्दी-खोकलाच नाही तर, पचनाच्या समस्यांमध्येही (Benefits of drinking Tulsi water) आराम मिळतो.

तुळशीचं पाणी आरोग्यासाठी विशेष का आहे?

आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. अबरार मुलतानी यांनी झी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, 'रोज तुळशीच्या पानांचं सेवन केल्यानं शरीरातील अपायकारक घटक निघून जातात. यासोबतच, तुळशीमुळं शरीराचं तापमानही नियंत्रणात राहतं. तुळशीच्या पानांचं सेवन केल्यानं स्थूलपणाही कमी होतो. तसंच वाईट कोलेस्टेरॉल वाढत नाही.

हिवाळ्यात तुळस आहे फायदेशीर

आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, हिवाळ्यात (Winter) हळद (Turmeric) आणि तुळशीची (Tulsi) पानं उकळून त्याचा काढा करून प्यायल्यानं रोगप्रतिकारक शक्ती तर मजबूत होतेच. शिवाय, सर्दी आणि घसा खवखवण्याच्या समस्येवरही मात करता येते. पोटाशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास तुळशीचं पाणी प्यायल्यानं त्यावर गुण येतो.

अशा प्रकारे तयार करा तुळशीचा वापर

1. आम्लपित्त होत असेल तर, दररोज 2 ते 3 तुळशीची पानं चावून खावीत.

2. नारळपाणी, तुळशीची पानं आणि लिंबाचा रस मिसळून पिता येईल.

3. तुळस रोजच्या चहात किंवा कोणत्याही काढ्यामध्ये मिसळल्यानं इतर फायद्यांसोबत पचनासही मदत होते.

हे वाचा - पाकिस्तानी नौदलाचा भारतीय मच्छीमारांच्या बोटवर बेछूट गोळीबार, ठाण्यातील मच्छीमाराचा मृत्यू

रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे

याच्या सेवनाने व्हायरल इन्फेक्शन (Viral Infection) बर्‍याच प्रमाणात टाळता येतं.

तुळशीचं पाणी प्यायल्यानं सर्दी आणि घसादुखीपासून आराम मिळतो.

मधुमेहाच्या रुग्णांची तुळशीचं सेवन केल्यास साखरेची पातळी नियंत्रणात राहील.

हे वाचा - शारीरिक संबंधांदरम्यान आला हार्टअटॅक, एका चुकीमुळे गेला असता महिलेचा जीव

शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढून टाकले जातात.

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

पचनाशी संबंधित समस्या दूर राहतात.

बद्धकोष्ठता आणि लूज मोशनच्या समस्येपासून आराम मिळतो.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Health Tips