Home /News /lifestyle /

Health Tips: तुम्हाला माहीत आहे का? या गोष्टी शिजवून खाणं आरोग्यासाठी असतं अपायकारक

Health Tips: तुम्हाला माहीत आहे का? या गोष्टी शिजवून खाणं आरोग्यासाठी असतं अपायकारक

Do Not Eat These Foods After Cook : बहुतेक पदार्थ शिजवल्यानंतर खाल्ले जातात. परंतु, काही पदार्थ कच्चे खाणं आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. असे पदार्थ शिजवून खाल्ले तर त्यांचे फायदे मिळणे तर दूरच, उलट आरोग्याला हानी होऊ शकते.

    नवी दिल्ली 02 डिसेंबर : निरोगी राहण्यासाठी अन्न जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढंच योग्य पद्धतीनं काहीही खाणंही महत्त्वाचं आहे. तरच शरीराला त्याचे फायदे मिळू शकतात. बहुतेक पदार्थ शिजवल्यानंतर खाल्ले जातात. परंतु, काही पदार्थ कच्चे खाणं आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. असे पदार्थ शिजवून खाल्ले तर त्यांचे फायदे मिळणे तर दूरच, उलट आरोग्याला हानी होऊ शकते. चला तुम्हाला अशा चार पदार्थांबद्दल सांगतो, ज्या स्वयंपाक करून आरोग्यासाठी हानिकारक ठरू (Do Not Eat These Foods After Cook) शकतात. सुका मेवा सुका मेवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. पण तो कच्चा खाल्ला तरच तुमच्या आरोग्याला फायदा होऊ शकतो. काही लोकांना सुका मेवा भाजून किंवा तळून खाणं आवडतं. मात्र, ते योग्य नाही. हे जिन्नस शिजवून खाल्ल्यानं त्यातील पोषक घटक कमी होतात. तळलेले-भाजलेले ड्रायफ्रुट्स खाल्ल्यानं त्यातील लोह आणि मॅग्नेशियमचे प्रमाण खूपच कमी होतं. यासोबतच कॅलरी आणि फॅटचे प्रमाण वाढतं, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरतं. नारळ नारळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण नारळ ओला असो वा कोरडा, तो भाजून किंवा तळून खाल्ल्यानं आरोग्याला फायदा होण्याऐवजी हानी पोहोचते. तो शिजवून खाल्ल्यानं त्यात असलेले मॅग्नेशियम, सोडियम आणि पोटॅशियम यांसारखे इतर अनेक पोषक घटक नष्ट होतात. यामुळं आरोग्याला फायद्याऐवजी नुकसान होतं. हे वाचा - Sleep Disorders : तुम्हालाही झोपेत बडबडण्याची सवय आहे का? जीवनशैलीत असा बदल ठरेल गुणकारी ब्रोकोली ब्रोकोली आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याच्या सेवनानं रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि आरोग्याला इतरही अनेक फायदे मिळतात. पण ब्रोकोली शिजवून खाल्ला नाही तरच त्याचे फायदे मिळू शकतात. ब्रोकोली शिजवल्यानं त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए, सी, पोटॅशियम आणि प्रथिने यांसारखे पोषक घटक नष्ट होतात आणि तो खाण्यात काही अर्थ राहत नाही. हे वाचा - मीठामुळे अनेक वास्तू दोष होतात दूर; पण या चुका करणं पडू शकतं महागात, वाचा योग्य पद्धत शिमला मिरची शिमला मिरचीच्या सेवनानं रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यास मदत होते. यासोबतच याच्या सेवनानं हृदय निरोगी ठेवण्यासोबतच इतर अनेक फायदेही आरोग्याला मिळतात. कारण त्यात कार्बोहायड्रेट्स, साखर, फायबर, लोह, प्रथिनं, व्हिटॅमिन सी आणि ऊर्जा यांसारखे इतर अनेक पोषक घटक असतात. पण या पोषक तत्वांचा फायदा तुम्हाला सिमला मिरची कच्ची खाल्ली तरच मिळू शकतो. जेव्हा ती शिजवून खाल्ली जाते, तेव्हा त्यातील सर्व पोषक घटक नष्ट होतात. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Food, Health Tips

    पुढील बातम्या