नवी दिल्ली, 27 डिसेंबर : आजची तरुणाई सडपातळ दिसण्यासाठी डाएटिंगला (Dieting) पहिली पसंती देतात. कारण ही पद्धत त्यांना सर्वात सोपी वाटते. सर्वात गंभीर बाब म्हणजे, यासाठी ते कोणत्याही तज्ज्ञाचा सल्ला घेत नाहीत. नुसते वाचून किंवा स्वतःच्या मनाने किंवा कुठेतरी ऐकून ते डाएट करायला (Dieting Side Effects) लागतात.
स्लिम दिसावं यासाठी डाएटिंग करणं सर्वांनाच सोपं वाटतं. मात्र, कधीकधी ते आरोग्यासाठी (Health) खूप हानिकारक (Harmful) असू शकतं. डाएटिंग केल्यानं आरोग्याचं कोणतं नुकसान होऊ शकतं, हे आज जाणून घेऊ. जर तुम्हीही डाएटिंगवर जास्त भर देत असाल तर, तुम्हालाही याची माहिती असणं आवश्यक आहे.
नैराश्य येऊ शकतं
आहारावर जास्त लक्ष दिल्यास नैराश्य येऊ शकतं. वास्तविक, शरीराला पूर्ण आहार न मिळाल्यानं शरीरात कार्बोहायड्रेट्स आणि साखरेची कमतरता असते. त्यामुळं शरीरातील सेरोटोनिनचं प्रमाण कमी होऊ लागतं. ज्यामुळं डिप्रेशन येऊ शकतं.
अशक्तपणा येऊ शकतो
डाएटिंगमुळं अशक्तपणा येतो. याचे कारण म्हणजे डाएटिंगवर अधिक लक्ष केंद्रित करताना लोक एक तर खाणं-पिणं सोडून देतात किंवा खूप कमी करतात. त्यामुळं शरीराला पोषक तत्त्वं मिळत नाहीत आणि ऊर्जेची पातळी खाली जाऊ लागते. त्यामुळं अशक्तपणा येऊ लागतो.
मुतखड्याची समस्या उद्भवू शकते
अनेक प्रकरणांमध्ये डाएटिंगमुळं मुतखड्याची समस्या उद्भवल्याचं समोर आलंय. कारण, जी पोषक तत्त्व आपल्या शरीरात अन्नाद्वारे जातात, त्यात असे अनेक घटक असतात, जे शरीरातील पाण्याची गरज पूर्ण करतात. अन्न न खाल्ल्यानंही शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते. त्यामुळं मुतखडा तयार होण्याची शक्यता जास्त असते.
हे वाचा - Nashik: मजुरीसाठी बाहेरगावी गेल्यास नाही मिळणार रेशन, 10 हजारांचा होणार दंड; ग्रामपंचायतीचा अजब फतवा
चयापचयावर वाईट परिणाम
आहार कमी करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केल्यानं तुमच्या चयापचयावरही वाईट परिणाम होऊ शकतो. हे शरीरातील लेप्टिन हार्मोनमुळे होतं, ज्याचा थेट संबंध तुमच्या भूकेशी असतो.
हे वाचा - Healthy Lifestyle: दिवसाची सुरुवात करताना करा या फक्त 3 गोष्टी; कधीही पडणार नाही आजारी
केस गळणं
जेव्हा लोक डायटिंगमुळं अन्न सोडतात किंवा कमी करतात, तेव्हा शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता भासू लागते. ज्याचा आरोग्यासोबत त्वचा आणि केसांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत डायटिंगमुळंही केस गळण्याची समस्या उद्भवू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips