मुंबई, 1 नोव्हेंबर : खजूर खायला खूप चविष्ट असतात. हिवाळ्यात खजूर खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. खजुरामध्ये लोह आणि फ्लोरीन मुबलक प्रमाणात आढळतात. याशिवाय त्यात अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हिवाळ्यात शरीरात अनेक बदल होतात. यासाठी खजूर खाल्ल्याने या बदलांचा प्रभाव कमी होतो. खजूर सहसा वाळवून खाल्ले जातात. कोरड्या खजुरात पौष्टिक मूल्य वाढतात. खजूरमध्ये मनुका किंवा अंजीराइतक्या कॅलरीज असतात. खजूरमधील बहुतेक कॅलरीज कर्बोदकांद्वारे येतात. हेल्थलाइनच्या वृत्तानुसार, 100 ग्रॅम खजूरमध्ये 75 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. याशिवाय त्यातून 277 कॅलरी ऊर्जा देते. खजूरमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांबे, मँगनीज, लोह, व्हिटॅमिन बी 6 आणि मुबलक फायबर असतात. याशिवाय खजूरमध्ये अँटीऑक्सिडंट्सही आढळतात. यामुळे मेंदूच्या आरोग्यासाठी खजूर हे उत्तम फळ आहे. खजूरमध्ये कोलेस्टेरॉल नसते. चरबी देखील खूप कमी आहे. त्यामुळे हृदयरोगींसाठीही ते फायदेशीर आहे. जाणून घेऊया खजुराचे (Health benefits of dates) फायदे -
खजुराचे फायदे
मेंदूला सूज येऊ देत नाही
अनेक कारणांमुळे इंटरल्यूकिन 6 (IL-6) हा पदार्थ मेंदूमध्ये जमा होऊ लागतो. ही एक प्रकारची सूज असते. एका संशोधनात असे आढळून आले आहे की, खजुराच्या सेवनाने मेंदूतील IL-6 कमी होते. कारण, IL-6 वाढल्यामुळं अल्झायमरचा धोका उद्भवू शकतो. खजूर खाल्ल्याने मेंदूचे आरोग्य सुधारते.
हाडे मजबूत होतात
खजूरमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांबे आणि सेलेनियम असतात. त्यामुळे खजुराचे नियमित सेवन केल्याने हाडे मजबूत होतात.
हे वाचा - उगारलेलं पिस्तूल निघालं सिगारेट लायटर; तावडीत सापडलेल्या चेन स्नॅचरला गावकऱ्यांनी धू-धू धुतलं
पचनास मदत करते
खजुरामध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते. शरीरातील लोहाची कमतरता त्याच्या सेवनाने पूर्ण होते. खजूरमध्ये फायबर देखील आढळते, जे पचनक्रिया योग्य ठेवते. रोज 3-4 भिजवलेल्या खजूर खाल्ल्याने पोटाच्या समस्या दूर होतात.
अनेक आजारांपासून बचाव करते
खजूरमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात. अँटिऑक्सिडंट्स पेशींमध्ये मुक्त रॅडिकल्स तयार होण्यापासून रोखतात. फ्री रॅडिकल्समुळे पेशी नष्ट होऊ लागतात. खजूरमध्ये फ्लेव्होनॉइड्स अँटीऑक्सिडंट असतात जे मधुमेह, अल्झायमरचा धोका टाळण्यासाठी फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे कॅरोटीनॉइड्स ऑक्सिडंट्स स्नायूंना कमकुवत होण्यापासून वाचवतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips