मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Coriander leave : थंडीत कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोथिंबीर आहे फायदेशीर; जाणून घ्या सर्व फायदे

Coriander leave : थंडीत कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोथिंबीर आहे फायदेशीर; जाणून घ्या सर्व फायदे

health benefits of coriander leave: एक कप कच्च्या कोथिंबिरीच्या पानात फक्त 0.083 ग्रॅम फॅट आढळते. याशिवाय त्यात फक्त 0.587 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स आढळतात. त्यामुळे हृदय आणि मधुमेहाच्या आजाराचा धोका कमी होतो. कोथिंबीरच्या सेवनाने त्वचा मुलायम राहते.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 26 डिसेंबर : हिवाळ्यात कोथिंबीर बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. साधारणपणे कोथिंबिरीचा वापर (Coriander Leaves) भाजीत स्वाद वाढवण्यासाठी केला जातो. पण, त्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. कोथिंबिरीच्या पानात अनेक पोषक घटक आढळतात. त्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, अँटीऑक्सिडंट्स, फोलेट, बीटा कॅरोटीन असतात. कोथिंबीरीच्या पानांमध्ये फारच कमी (health benefits of coriander leave) चरबी असते. एक कप कच्च्या कोथिंबिरीच्या पानात फक्त 0.083 ग्रॅम फॅट आढळते. याशिवाय त्यात फक्त 0.587 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स आढळतात. त्यामुळे हृदय आणि मधुमेहाच्या आजाराचा धोका कमी होतो. कोथिंबीरच्या सेवनाने त्वचा मुलायम राहते. डाग, मुरुमे आणि ब्लॅकहेड्स सारख्या समस्या दूर करण्यासाठी देखील ती उपयुक्त आहे. जाणून घेऊया कोथिंबिरीचे काय फायदे आहेत. कोथिंबीर पानांचे फायदे कोलेस्ट्रॉल कमी करते TOI च्या बातमीनुसार, कोथिंबीर खाल्ल्याने शरीरातील उच्च कोलेस्ट्रॉल म्हणजेच HDL म्हणजेच चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. यासोबतच खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL चे प्रमाण कमी होते. यामुळे हिवाळ्यात कोथिंबीरीचे सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो. रक्तातील साखर कोथिंबीर किडनी डिटॉक्ससाठी देखील फायदेशीर मानली जाते. कोथिंबीरीच्या पानांचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे, कारण ते इन्सुलिन सोडण्यास मदत करते. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. हे वाचा - त्वचेपासून ते केसांच्याही आरोग्यासाठी गुणकारी आहेत कडुनिंबाची पाने; जाणून घ्या या पद्धती चांगले पचन कोथिंबीर खाल्ल्याने पचनशक्ती मजबूत होते. कोथिंबीर यकृताचे कार्य सक्रिय करते, ज्यामुळे गॅस, बद्धकोष्ठता, सूज येणे या समस्या दूर होतात. सांधेदुखी कोथिंबीरमध्ये एंटी-इंफ्लामेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे सांध्यामधील सूज येण्याच्या समस्येपासून सुटका मिळते. सांधेदुखीचे मुख्य कारण म्हणजे सांध्यातील सूज. त्यामुळे कोथिंबीरीची पाने सूज कमी करण्यास मदत करतात. हे वाचा -  Healthy Lifestyle: दिवसाची सुरुवात करताना करा या फक्त 3 गोष्टी; कधीही पडणार नाही आजारी रक्त वाढीसाठी ज्यांना अॅनिमियाचा त्रास आहे त्यांच्यासाठी कोथिंबिरीची पाने उत्तम औषध ठरू शकतात. कोथिंबीरीच्या पानात लोह जास्त प्रमाणात आढळते. काही लोकांना लोहामुळे अॅनिमिया होतो. (सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle

पुढील बातम्या