मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /लहानपणात मनावर झालेला एखादा आघात पुढं लठ्ठपणाचं कारण ठरतो? संशोधनातील नवे निष्कर्ष

लहानपणात मनावर झालेला एखादा आघात पुढं लठ्ठपणाचं कारण ठरतो? संशोधनातील नवे निष्कर्ष

Risk of obesity from childhood trauma : विशिष्ट अनुवांशिक गुणधर्म (specific genetic traits) असलेल्या लोकांना बालपणात मनावर आघात झाला असेल तर त्यांना प्रौढत्वात लठ्ठ होण्याचा धोका जास्त असतो. वयाच्या 18 वर्षांपर्यंत एखादा मनावर आघात होणं, असुरक्षित घडणं याचा परिणाम पुढे लठ्ठपणात होऊ शकतो.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 16 मार्च : ओबेसिटी (Obesity) म्हणजे लठ्ठपणा ही जगभरात सार्वजनिक आरोग्यासंबंधी मोठी समस्या बनली आहे. मधुमेहापासून हृदयविकारापर्यंत आणि इतर अनेक रोगांचे कारण लठ्ठपणा ठरत आहे. म्हणूनच लठ्ठपणाचे कारण शोधणे आणि त्याचे निदान करणे ही काळाची गरज आहे. आता एका नवीन अभ्यासातून अशी बाब समोर आली आहे की, आनुवंशिकता आणि बालपणातील कोणत्याही प्रकारचा एखादा आघात प्रौढावस्थेतील लठ्ठपणाशी संबंधित आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष 'फ्रंटियर्स इन जेनेटिक्स' जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. यात असं सांगण्यात आलं आहे की, जर विशिष्ट अनुवांशिक गुणधर्म (specific genetic traits) असलेल्या लोकांना बालपणात मनावर आघात झाला असेल तर त्यांना प्रौढत्वात लठ्ठ होण्याचा धोका जास्त असतो. वयाच्या 18 वर्षांपर्यंत एखादा मनावर आघात होणं, असुरक्षित घडणं याचा परिणाम पुढे लठ्ठपणात होऊ शकतो. यूएसमधील एका विशेष प्रकल्पांतर्गत 2016 मध्ये झालेल्या अभ्यासातून ही बाब समोर आली (Risk Of Obesity From Childhood Trauma) होती.

हेल्दी नेवाडा प्रकल्प (Healthy Nevada Project) नावाच्या, मानसिक आरोग्य सर्वेक्षणात 16,000 हून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. त्यांनी दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरापैकी 65 टक्के पेक्षा जास्त लोकांनी किमान एक ACE नोंदवले. हे 16,000 लोकांमधील जेनेटिक मेकअप आणि क्लिनिकल बॉडी मास इंडेक्समध्ये क्रॉस-रेफरन्स होते. संशोधकांच्या मते, ज्या सहभागींना एक किंवा अधिक एसीईचा त्रास झाला आहे, त्यांना प्रौढत्वात लठ्ठपणाचा धोका 1.5 पट जास्त होता. ज्या सहभागींनी चार किंवा त्याहून अधिक एसीई होते, त्यांना गंभीर लठ्ठपणाचा धोका दुप्पट होता.

तज्ज्ञ काय म्हणतात

या अभ्यासाशी संबंधित रिनॉन हेल्थचे सीईओ टोनी स्लोनिम यांनी सांगितले की, बालपणात आपल्यासोबत झालेलं गैरवर्तन, गरिबी, अन्न असुरक्षितता आणि प्राथमिक काळजी घेणाऱ्यांसोबतचे खराब संबंध यामुळे लठ्ठपणाचा धोका वाढतो. या संदर्भात आनुवंशिकता समजून घेणं महत्त्वाचं आहे. या गोष्टी लहानपणी कोणाच्या बाबतीत होऊ नयेत, याची काळजी घ्यावी लागेल.

हे वाचा - महागड्या नाईट क्रीमपेक्षा चेहऱ्याला लावा गाईचं तूप; मिळतील इतके सगळे फायदे

अभ्यासाचे प्रमुख लेखक, कॅरेन स्लॉच यांनी सांगितले की, आमच्या विश्लेषणात असं आढळून आलं की, प्रत्येक एसीईमुळे बीएमआयमध्ये वाढ होते. आम्हाला असं दिसून आलंय की, बालपणातील वाईट अनुभवांची संख्या प्रौढत्वातील लठ्ठपणाशी जवळचा संबंध आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की जेव्हा अनेक जनुकांमध्ये विशिष्ट उत्परिवर्तन होते तेव्हा ACE च्या BMI ला प्रतिसाद अधिक मजबूत होता, ज्यापैकी एक स्किझोफ्रेनियाशी आजाराशी देखील संबंधित आहे.

हे वाचा - अशा कारणांमुळे वाढतो High BP चा धोका; या गोष्टींचा आहारातील समावेश ठरेल गुणकारी

पर्यावरणीय घटक जसे की, जीन्स आणि ACEs आणि इतर अनेक आरोग्य पॅरामीटर्सचा एकत्रितपणे गंभीर परिणाम आरोग्यावर होतो," असे हेल्दी नेवाडा प्रकल्पाचे प्रमुख संशोधक जोसेफ ग्रझिम्स्की (Joseph Grzymski) यांनी सांगितले.

First published:

Tags: Weight, Weight gain