Home /News /lifestyle /

Carrot Leaves Benefits : थंडीत गाजराचा हलवा खाल्लात पण त्याची पानं किती फायदेशीर आहेत माहितीये का?

Carrot Leaves Benefits : थंडीत गाजराचा हलवा खाल्लात पण त्याची पानं किती फायदेशीर आहेत माहितीये का?

Carrot Leaves Benefits: गाजराची पाने, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरसारख्या सर्व पोषकतत्त्वांनी समृद्ध असतात, आरोग्यासाठीही खूप उपयुक्त असतात. गाजर खाऊन लोक सहसा त्याची पानं फेकून देतात किंवा बाजारातून आणतानाच काढून टाकतात.

    नवी दिल्ली, 23 जानेवारी : कोशिंबीर, भाज्या, खीर, गोड हलवा यासोबत कच्चे खाण्यासाठीही आपल्याला गाजराचा उपयोग होतो. गाजर खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे (Carrot Health Benefits) असल्याचे आपण यापूर्वी बातम्यांमधून पाहिले असेल. अलिकडे अनेकजणांना गाजराचा ज्युस करून प्यायला आवडतो. पण तुम्हाला माहीत आहे का की, गाजराची पाने, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरसारख्या सर्व पोषकतत्त्वांनी समृद्ध असतात, आरोग्यासाठीही खूप उपयुक्त असतात. गाजर खाऊन लोक सहसा त्याची पानं फेकून देतात किंवा बाजारातून आणतानाच काढून टाकतात. मात्र, गाजराच्या पानांचा रस, भाजी आणि चटणीच्या स्वरूपात वापर करणे आरोग्यासाठी (Carrot Leaves Benefits) फायदेशीर ठरेल. आज आपण गाजराच्या पानांचे फायदे (Carrot Leaves) जाणून घेणार आहोत. ते समजल्यानंतर बरेचजणांना ही पानं फेकण्याऐवजी खाण्यासाठी वापरायला नक्कीच आवडतील. गाजराच्या पानांचे फायदे लाल रक्तपेशींची पातळी वाढते गाजराच्या पानांमध्ये आढळणारे क्लोरोफिल शरीरातील लाल रक्तपेशी तयार होण्याच्या प्रक्रियेला गती देते. त्यामुळे गाजराच्या पानांचा रस किंवा चटणी रोज खाल्ली तरी फायदेशीर ठरू शकते. विशेषत: अशक्तपणाचा त्रास असलेल्यांनी ती आवर्जुन खावीत. हृदयविकारातही फायदेशीर गाजराची पानं खाल्ल्याने शरीरातील नसांमध्ये जमा होणारे कोलेस्ट्रॉल कमी होते. म्हणजेच हृदयविकारातही गाजराच्या पानांचे सेवन खूप फायदेशीर आहे, असे म्हणता येईल. यामुळे तुमचे रक्त देखील शुद्ध राहते. या पानांच्या आहारातील समावेशामुळे हृदयावरील तसेच किडनी इत्यादींवरील भारही कमी होतो. हे वाचा - Black carrots : कधी खाल्लं आहे का काळं गाजर; ‘या’ जीवघेण्या आजारावरही आहे प्रभावी रोगप्रतिकारक शक्तीसाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी गाजराच्या पानांचाही खूप उपयोग होतो. यामध्ये मुबलक प्रमाणात आढळणारे अँटीऑक्सिडंट आपली रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्याचे काम करतात. ज्यामुळे आपण सर्व प्रकारच्या संसर्गजन्य रोगांपासून लांब राहतो. यासोबतच शरीरात कॅन्सर किंवा ट्यूमर वगैरे विकसित होत नाहीत. त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी गाजराच्या पानांची भाजी किंवा रस खाणे फायदेशीर ठरेल. हे वाचा - Health Tips: प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे गाजर-आलं सूप; जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत वजन नियंत्रित ठेवण्यासाठी गाजराच्या पानांमुळे आपली चयापचय क्रिया निरोगी राहते. कारण त्यात फायबर चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे पचनसंस्था सुरळीत राहते. तसेच गाजराच्या पानांमध्ये आढळणारे फायबर शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. (सूचना: येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips, Lifestyle, Vegetable

    पुढील बातम्या