मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

हिवाळ्यात ब्रोकोली, फुलकोबी वर्गीय भाज्या खाणं आहे फायदेशीर; रक्ताभिसरण क्रिया होते नीट

हिवाळ्यात ब्रोकोली, फुलकोबी वर्गीय भाज्या खाणं आहे फायदेशीर; रक्ताभिसरण क्रिया होते नीट

5. फुलकोबी - 
फुलकोबी व्हिटॅमिन सी, फोलेट आणि फायबरचा चांगला स्रोत मानली जाते. हे इंडोल्स, ग्लुकोसिनोलेट्स आणि थायोसायनेट्समध्ये देखील समृद्ध आहे. फ्लॉवरचा आहारात समावेश केल्यानं किडनी निरोगी ठेवता येते.

5. फुलकोबी - फुलकोबी व्हिटॅमिन सी, फोलेट आणि फायबरचा चांगला स्रोत मानली जाते. हे इंडोल्स, ग्लुकोसिनोलेट्स आणि थायोसायनेट्समध्ये देखील समृद्ध आहे. फ्लॉवरचा आहारात समावेश केल्यानं किडनी निरोगी ठेवता येते.

Broccoli and healthy blood circulation: 684 महिलांवर केलेल्या एका अभ्यासात असं दिसून आलंय की ब्रोकोली, फ्लॉवर, कोबी, ब्रसेल्स, स्प्राउट्स यांसारख्या भाज्या वृद्ध महिलांमधील हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करतात.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 08 नोव्हेंबर : जेव्हा शरीरातील रक्ताभिसरण क्रिया (blood circulation) नीट होत नाही, तेव्हा हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताचा धोका वाढतो. रक्ताभिसरण नीट होत नाही याचा अर्थ एका रक्तवाहिनीत (Blood vessels) किंवा अनेक रक्तवाहिन्यांमध्ये काही समस्या आहे. TOI च्या बातमीनुसार, सामान्यतः जेव्हा रक्तवाहिन्यांच्या आतील भागात स्निग्ध चिकट पदार्थ किंवा कॅल्शियम जमा होऊ लागतं, तेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये समस्या सुरू होतात. त्यामुळं शरीरातील रक्तप्रवाह कमी होतो. ब्रिटीश जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, फुलकोबी कुळ किंवा वर्गातील भाज्यांच्या म्हणजेच, क्रूसिफेरस भाज्यांच्या (cruciferous vegetables) सेवनानं रक्तवाहिन्यांच्या समस्या (Broccoli and healthy blood circulation) कमी होऊ शकतात.

ऑस्ट्रेलियातील 684 महिलांवर केलेल्या एका अभ्यासात असं दिसून आलंय की ब्रोकोली, फ्लॉवर, कोबी, ब्रसेल्स, स्प्राउट्स यांसारख्या भाज्या वृद्ध महिलांमधील हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करतात. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी नोंदवलंय की, ज्या महिला नियमितपणे फुलकोबीसारख्या भाज्या खातात त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण नगण्य होतं.

हे वाचा - थिएटरच्या भिंतीतून येत होता जोराचा आवाज; भिंत पाडली असता आतील दृश्य पाहून सगळेच शॉक

फुलकोबी, पत्ताकोबीचा (पानांचा कोबी) प्रभाव

प्रमुख संशोधक डॉ. लॉरेन ब्लेकेनहॉर्स्ट (Dr Lauren Blekkenhorst) यांनी सांगितलं की, अभ्यासात फुलकोबीसारख्या विविध प्रकारच्या भाज्यांचे आश्चर्यकारक परिणाम दिसून आले आहेत. डॉ लॉरेन म्हणाले की, आमच्या पहिल्या अभ्यासात असेही निष्कर्ष काढण्यात आले आहे की, जे लोक फुलकोबीच्या वर्गातील विविध प्रकारच्या भाज्या खातात, त्यांच्यामध्ये हृदयाशी संबंधित आजारांचा धोका खूप कमी होतो. पण त्यावेळेस हे कशा प्रकारे होतं ते आम्हाला कळलं नव्हतं.

या अभ्यासात ब्रोकोली खाल्ल्यानंतर शरीरात काय प्रक्रिया होते, हे सविस्तरपणे समोर आलं आहे. डॉ. लॉरेन म्हणाले की, जेव्हा आम्ही अभ्यासाचं विश्लेषण केलं तेव्हा असं आढळून आलं की ज्या महिला दररोज ब्रोकोली किंवा फ्लॉवर किंवा कोबी खातात, त्यांच्या धमन्यांमध्ये कॅल्शियम जमा होत नाही.

हे वाचा - शारीरिक संबंधांदरम्यान आला हार्टअटॅक, एका चुकीमुळे गेला असता महिलेचा जीव

फुलकोबीचं सेवन रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियम जमा होण्यास प्रतिबंध करतं

अभ्यासात असं आढळून आलंय की कोबी कुळातील भाज्यांमध्ये 'व्हिटॅमिन के' (Vitamin K) आढळतं, जे रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियम जमा होऊ देत नाही. डॉ. लॉरेन यांनी सांगितले की, ज्या महिलांनी दररोज कोबीसारख्या 45 ग्रॅम भाज्यांचं सेवन केलं, त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियम जमा होण्याची शक्यता 46 टक्क्यांनी कमी झाली. तथापि, याचा अर्थ असा नाही की, फक्त ब्रोकोली, फ्लॉवरसारख्याच भाज्या खाल्ल्यानं कॅल्शियम साठण्याचा धोका कमी होतो. तर, आपण अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्यांचं सेवन केलं पाहिजे.

First published:

Tags: Health Tips, Vegetables