Home /News /lifestyle /

Black Salt Water Benefits: विविध आजारांवर फायदेशीर आहे काळ्या मिठाचे पाणी; जाणून घ्या त्याविषयी सर्व माहिती

Black Salt Water Benefits: विविध आजारांवर फायदेशीर आहे काळ्या मिठाचे पाणी; जाणून घ्या त्याविषयी सर्व माहिती

Black Salt Water Benefits: साध्या मिठाच्या तुलनेत काळ्या मिठात कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळतात. या मिठाचा आहारातील समावेश मधुमेहासारख्या आजारांवर देखील खूप प्रभावी असल्याचे (Black Salt Water Benefits) दिसून आले आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 18 जानेवारी : आवळा, तुळशी, गिलॉय, हळद यासारख्या अनेक नैसर्गिक घटकांनी आपली प्रतिकारशक्ती वाढते. याचा खोकला, सर्दी, ताप, गॅस यांसारख्या सामान्य आजारांवरही चांगला उपयोग होतो. या घटकांमध्ये काळ्या मिठाचे (Black Salt) ही नाव वाढवता येईल. खरं तर, साध्या मिठाच्या तुलनेत काळ्या मिठात कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळतात. या मिठाचा आहारातील समावेश मधुमेहासारख्या आजारांवर देखील खूप प्रभावी असल्याचे (Black Salt Water Benefits) दिसून आले आहे. काळ्या मिठाचा आता अनेकजण वापर करतात. चाट पापडीपासून ते बुंदी रायत्याची चव काळ्या मीठाशिवाय अपूर्ण आहे. पण, आज आम्ही तुम्हाला काळ्या मिठाच्या पाण्याचे काही आश्चर्यकारक फायदे सांगत आहोत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. काळ्या मिठाच्या पाण्याने पचनक्रिया सुधारते काही तज्ञांच्या मते, दररोज सकाळी रिकाम्या पोटी काळ्या मिठाचे पाणी पिणे खूप फायदेशीर ठरू शकते. हे हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि प्रथिने पचवणारे एंजाइम वाढवून कार्य करते. ज्यामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बरोबर राहते. काळ्या मीठाचे पाणी लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रभावी धावपळीच्या जीवनशैलीत वाढलेले वजन हे बहुतेक लोकांसाठी त्रासाचे कारण बनले आहे. वाढलेले वजन नियंत्रणात आणण्यासाठीही काळ्या मिठाचा फायदा होतो. रोज सकाळी रिकाम्या पोटी काळ्या मिठाचे पाणी प्यायल्याने वजन कमी करता येते. काळ्या मीठामध्ये असलेले लठ्ठपणा विरोधी गुणधर्म लठ्ठपणा कमी करण्यास मदत करतात. मधुमेहामध्ये काळ्या मिठाचे पाणी पिण्याचे फायदे अनेकदा डॉक्टर मधुमेही रुग्णांना साखर आणि मीठ मर्यादित प्रमाणात वापरण्याचा सल्ला देतात. वास्तविक, काळ्या मिठामध्ये सोडियमचे प्रमाण साध्या मिठापेक्षा खूपच कमी असते, त्यामुळे काळे मीठ मधुमेहाचा सामना करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. काळ्या मिठाच्या पाण्याचा केसांना फायदा केस स्वच्छ करण्यासाठी काळ्या मिठाच्या पाण्याचाही वापर केला जाऊ शकतो. यामध्ये असलेले क्लींजिंग एक्सफोलिएटिंग घटक केसांच्या मुळांनाच नव्हे तर डोक्याची पूर्ण त्वचा देखील स्वच्छ करण्याचे काम करतात. हे वाचा - Hot Water Benefits at Night: सकाळी ठीक आहे, पण रात्री गरम पाणी पिण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत नसतील छातीत जळजळ आणि गॅसपासून आराम पोटात बद्धकोष्ठतेच्या समस्येने अनेकांना त्रास होतो. अशा परिस्थितीत काळे मीठ टाकून कोमट पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेपासून सहज आराम मिळतो. हे वाचा - Green Peas Storage Tips: मटारच-मटार.. खा वर्षभर! या 2 सोप्या पद्धतींनी घरच्या-घरी करू शकाल दीर्घकाळ स्टोअर काळ्या मिठाच्या पाण्याने तणाव कमी होतो तणावामुळे अनेकांना झोपही लागत नाही. त्यामुळे शरीरात इतर समस्या निर्माण होतात. महत्त्वाचे म्हणजे काळ्या मिठाचे सेवन केल्‍याने कोर्टिसोल आणि अॅड्रेनालाईन नावाचे स्‍ट्रास संप्रेरकांचे प्रमाण कमी करून पुरेशी झोप घेण्‍यासही मदत होते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या