• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Health news: भाजलेले हरभरे खाण्याचे आहेत जबरदस्त फायदे, वजन कमी करण्यासह पुरुषांचा वाढतो स्टॅमिना

Health news: भाजलेले हरभरे खाण्याचे आहेत जबरदस्त फायदे, वजन कमी करण्यासह पुरुषांचा वाढतो स्टॅमिना

Health Benefits of bhuna chana : भाजलेल्या हरभऱ्याच्या सेवनाने वजन तर कमी होतेच पण त्याचबरोबर अनेक अतिरिक्त फायदेही होतात. भाजलेल्या हरभऱ्याच्या बाहेरील पेशीमध्ये फायबर आणि प्रथिने चांगल्या प्रमाणात आढळतात.

 • Share this:
  नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : हिवाळ्यात भाजलेला हरभरा जास्त वापरला जातो. लोक संध्याकाळी स्नॅक्सच्या स्वरूपात भाजलेले हरभरे खातात. भाजलेल्या हरभऱ्याच्या सेवनाने वजन तर कमी होतेच पण त्याचबरोबर अनेक अतिरिक्त फायदेही होतात. भाजलेल्या हरभऱ्याच्या बाहेरील पेशीमध्ये फायबर आणि प्रथिने चांगल्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते. त्यात फायबर असल्यामुळे पचायला जास्त वेळ लागतो त्यामुळे लवकर भूक लागत नाही. भाजलेल्या हरभऱ्यातही कॅलरीज खूप कमी असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी भाजलेले हरभरे खाण्याचा सल्ला दिला जातो. भाजलेल्या हरभऱ्याचे इतरही अनेक फायदे (Health Benefits of bhuna chana) आहेत. भाजलेल्या हरभऱ्याचा वजन कमी करण्याच्या आहारात समावेश केला जातो. कर्बोदके, प्रथिने, आर्द्रता, स्नेहक, फायबर, कॅल्शियम, लोह आणि इतर अनेक जीवनसत्त्वे त्यात असतात. FoodNDTV.com नुसार, भाजलेल्या हरभऱ्याचे नियमित सेवन केल्याने रक्तातील साखर आणि मधुमेह नियंत्रणात राहतो. याशिवाय भाजलेले हरभरे हाडांना निरोगी ठेवण्यास मदत करतात. हृदयासाठीही ते फायदेशीर आहेत. भाजलेल्या हरभऱ्याचे फायदे मधुमेहींसाठी फायदेशीर भाजलेल्या हरभऱ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. म्हणजे त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही. यामुळेच मधुमेहींना भाजलेले हरभरा खाण्याचा सल्ला दिला जातो. हे वाचा - Congress ला बसणार मोठा झटका, गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेस TMC सोबत युती करण्याच्या तयारीत पुरुषांची शारीरिक क्षमता वाढते भाजलेले हरभरे पुरुषांची शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. भाजलेल्या हरभऱ्यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. शरीरातील तुटलेल्या पेशींच्या दुरुस्तीसाठी प्रथिने एक आवश्यक पोषक तत्व आहे. भाजलेले हरभरे पुरुषांच्या शरीरातील थकवा दूर करून स्टॅमिना मजबूत करतात. मूठभर भाजलेले हरभरे सकाळी एक ग्लास दुधासोबत खाल्ल्याने अनेक प्रकारची अशक्तता दूर होते. गुळासोबत खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरताही पूर्ण होते. हे वाचा - मेहनतीच्या जोरावर बनला इंजिनिअर पण झटपट श्रीमंतीसाठी बनला हॅकर, बीडच्या तरुणाचा कारागृहातून अनेकांना गंडा पचनशक्ती मजबूत होते भाजलेल्या हरभऱ्यामध्ये फायबर जास्त असल्याने त्यामुळे पोटाशी संबंधित समस्या दूर होतात. यामुळे पोटातील गॅस आणि अपचनाची समस्या दूर होते. रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते भाजलेल्या हरभऱ्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी देखील आढळतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते. यामुळे आजारांना प्रतिबंध होतो.
  Published by:News18 Desk
  First published: