• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • White Honey: तुम्ही कधी पांढरा मध खाल्लाय का? त्याचे आरोग्यासाठी इतके सारे आहेत फायदे

White Honey: तुम्ही कधी पांढरा मध खाल्लाय का? त्याचे आरोग्यासाठी इतके सारे आहेत फायदे

Benefits of White Honey: मधमाशांना हा मध प्रत्येक फुलातून मिळत नाही तर अल्फाल्फा, फायरवीड आणि व्हाईट क्लोव्हरच्या फुलांमधून मिळतो. तसेच यामध्ये कोणतीही हीटिंग प्रक्रिया वापरली जात नाही आणि तो तपकिरी मधापेक्षा अधिक फायदेशीर आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : तुम्ही अनेकदा तपकिरी रंगाच्या मधाचे सेवन केलं असे आणि त्याचा आरोग्यासाठी किती फायदा आहे, हे देखील तुम्हाला माहीत असेल. पण, तुम्ही कधी पांढरा मध चाखला आहे का आणि तुम्हाला त्याचे फायदे माहीत आहेत का? तुम्हाला कदाचित माहीत नसल्यास आपण जाणून घेऊया की, पांढऱ्या मधाला कच्चा मध म्हणून ओळखले जाते, तो क्रीमी पांढऱ्या रंगाचा असतो. मिळालेल्या माहितीनुसार, हा मधही मधमाशांच्या पोळ्यातून काढला जातो. परंतु, मधमाशांना हा मध प्रत्येक फुलातून मिळत नाही तर अल्फाल्फा, फायरवीड आणि व्हाईट क्लोव्हरच्या फुलांमधून मिळतो. तसेच यामध्ये कोणतीही हीटिंग प्रक्रिया वापरली जात नाही आणि तो तपकिरी मधापेक्षा अधिक फायदेशीर आहे. पांढऱ्या मधाचे (Benefits of White Honey) फायदे जाणून घेऊया. वृद्धत्व पांढरा मध वृद्ध न दिसण्यात आपली मदत करतो. त्याला अँटी-ऑक्सिडंट्सचे पॉवर हाऊस देखील म्हणतात. खरं तर, त्यात जीवनसत्त्वे ए आणि बी, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि जस्त यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात, जे आरोग्यासाठी इतर अनेक फायदे देखील देतात. खोकला पांढरा मध खोकला घालवण्यासाठीही खूप उपयोगी ठरतो. खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही कोमट पाणी आणि लिंबूसोबत याचे सेवन करू शकता. हे वाचा - अ‍ॅस्पिरिन घेतल्यानं Heart Failure चा धोका 26 टक्क्यांनी वाढू शकतो, नवीन संशोधनातील माहिती पचनसंस्था निरोगी राहते पांढरा मध पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. याच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अपचन, गॅस सारख्या समस्यांपासून आराम मिळतो तसेच पोट साफ राहते. अॅनिमियाची समस्या पांढऱ्या मधाचे सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण झपाट्याने वाढते आणि अॅनिमियाची समस्या दूर होते. याचे सेवन केल्याने शरीरातील उर्जेची पातळी लक्षणीय वाढते आणि अशक्तपणाही दूर होतो. हे वाचा - WhatsApp मध्ये आता सात दिवसांनंतरही डिलीट करता येणार Send केलेला मेसेज त्वचा चमकदार बनवते पांढरा मध त्वचेला चमकदार बनवण्यातही खूप मदत करतो. यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि त्वचा घट्ट होण्यासही मदत होते. या मधामध्ये फायटोन्यूट्रिएंट्स असतात, ज्यामुळे त्वचेतील जखमा आणि व्रण भरून निघण्याचे कामही जलद होते. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
  Published by:News18 Desk
  First published: