मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Benefits of Walnuts: हिवाळ्यात भिजवलेले अक्रोड खाण्याचे आहेत अनेक फायदे; असा करा आहारात समावेश

Benefits of Walnuts: हिवाळ्यात भिजवलेले अक्रोड खाण्याचे आहेत अनेक फायदे; असा करा आहारात समावेश

Benefits of Walnuts : अक्रोड रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी खाल्ले तर त्याचे गुणधर्म आणखी वाढतात. सकाळी रिकाम्या पोटी अक्रोड खाणे जास्त फायदेशीर आहे. यामुळे अनेक आजार आपल्यापासून दूर राहतात.

Benefits of Walnuts : अक्रोड रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी खाल्ले तर त्याचे गुणधर्म आणखी वाढतात. सकाळी रिकाम्या पोटी अक्रोड खाणे जास्त फायदेशीर आहे. यामुळे अनेक आजार आपल्यापासून दूर राहतात.

Benefits of Walnuts : अक्रोड रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी खाल्ले तर त्याचे गुणधर्म आणखी वाढतात. सकाळी रिकाम्या पोटी अक्रोड खाणे जास्त फायदेशीर आहे. यामुळे अनेक आजार आपल्यापासून दूर राहतात.

    नवी दिल्ली, 04 डिसेंबर : अक्रोडाचा वापर ड्रायफ्रुट्स म्हणून केला जातो. अक्रोड हे मेंदूच्या कार्यक्षतेसाठी खूप फायदेशीर मानले जातात. अक्रोडमध्ये पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात. त्यात प्रथिने, जीवनसत्त्वे तसेच लोह, कॅल्शियम, तांबे, फॉस्फरस, मॅग्नेशियम, ओमेगा -3 फॅटी ऍसिडसह इतर अनेक घटक असतात. हे सर्व घटक आपल्या शरीराला विविध रोगांशी लढण्यात मदत करतात आणि शरीराला त्याचा (Benefits of Walnuts) फायदा होतो. अक्रोड रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी खाल्ले तर त्याचे गुणधर्म आणखी वाढतात. सकाळी रिकाम्या पोटी अक्रोड खाणे जास्त फायदेशीर आहे. यामुळे अनेक आजार आपल्यापासून दूर राहतात. भिजवलेले अक्रोड खाण्याचे फायदे 1. रक्तातील साखर नियंत्रित होते - मधुमेहाच्या रुग्णांसाठी अक्रोड खाणे खूप फायदेशीर ठरू शकते. याच्या नियमित सेवनाने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. इतकेच नाही तर तुम्हाला मधुमेह नसेल तरी त्याचे सेवन केल्याने टाइप-2 मधुमेह होण्याचा धोकाही कमी होतो. 2. बद्धकोष्ठतेमध्ये फायदा - अलिकडे बद्धकोष्ठतेची समस्या वाढत आहे. तुम्हालाही बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने फायदा होऊ शकतो. अक्रोडमध्ये भरपूर फायबर असतात. यामुळे आपली पचनक्रिया निरोगी राहते. यासोबतच भिजवलेले अक्रोड पचायलाही सोपे असतात. 3. गर्भवती महिलांसाठी फायदेशीर - गरोदरपणात अक्रोड खाणे खूप फायदेशीर मानले जाते. अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असते, जे बाळाच्या मेंदूच्या विकासात मदत करतात. मात्र, गर्भधारणेदरम्यान अक्रोडचे सेवन डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच करावे. हे वाचा - तुम्हीही प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात खाता ना? मग या गोष्टी तुम्हाला माहीत असाव्यात 4. रोगप्रतिकारशक्ती वाढते - तुम्ही रोज अक्रोड खात असाल तर त्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. यामुळे आजारांपासून आपला बचाव होतो. 5. वजन नियंत्रित राहते - भिजवलेल्या अक्रोडचे नियमित सेवन केल्यानेही वजन नियंत्रित राहते. जर तुमचे वजन जास्त असेल आणि तुम्ही नियमितपणे अक्रोड खात असाल तर ते तुमचे वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. अक्रोड खाल्ल्याने आपल्या शरीरातील चयापचय क्रिया वाढते, ज्यामुळे अतिरिक्त चरबी जाळण्यास मदत होते. हे वाचा - Sitting on the Floor while Eating: जमिनीवर बसून जेवल्यामुळे आरोग्याला होतात इतके फायदे, वाचा जेवण्याची योग्य पद्धत 6. झोप चांगली लागते - जर तुम्हाला झोप न येण्याची समस्या असेल तर अक्रोड खाल्ल्याने तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारू शकते. तसेच तणावमुक्त होण्यास मदत होते. अक्रोडमध्ये मेलाटोनिन असते, त्यामुळे चांगली झोप येते. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या