Home /News /lifestyle /

लसणाची पात किंवा हिरवा लसूण आरोग्यासाठी आहे वरदान! पोट, हृदयविकारांवर असा होतो फायदा

लसणाची पात किंवा हिरवा लसूण आरोग्यासाठी आहे वरदान! पोट, हृदयविकारांवर असा होतो फायदा

हिरव्या लसणात अ‍ॅलिसिन नावाचे सल्फर कंपाऊंड असते, जे लसणाच्या वासासाठी जबाबदार असते. या विशिष्ट सल्फर पदार्थामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

    नवी दिल्ली, 14 मे : आपल्याकडे प्रत्येक घरात लसूण खाल्ला जातो, दररोज भाज्यांमध्ये लसणाचा वापर होतो. लसूण हे अनेक आजारांवर रामबाण औषध मानले जाते. लसूण पोटासाठीही खूप आरोग्यदायी आहे. लसणाप्रमाणेच हिरव्या लसणाची पात किंवा हिरवा लसूण (Green Garlic) देखील आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. लसणाचा गड्डा जमिनीत पूर्ण परिपक्व होण्यापूर्वी वरती लसणाची पानं हिरवी गार असतात, त्याला अनेकजण कांद्याप्रमाणे लसणाची पात म्हणतात. त्याची भाजी, कोशिंबीर, सूप किंवा चटणी म्हणूनही वापर केला जाऊ शकतो. लसणाची पात एक नैसर्गिक आरोग्य उपाय म्हणून ओळखला जातो. हिरव्या लसणात असलेल्या पोषक तत्वांबद्दल सांगायचे तर, त्यात सोडियम, पोटॅशियम, लोह, कॅलरीज, कार्बोहायड्रेट्स, आहारातील फायबर, प्रथिने इ. हे बऱ्याच काळापासून विविध आजारांवर उपचार करण्यासाठी वापरले जात आहे. जाणून घेऊया हिरव्या (Benefits of Green Garlic) लसणाचे फायदे. लसणाची पाने किंवा हिरवे लसूण खाण्याचे फायदे - रोग प्रतिकारशक्ती वाढवते हिरवा लसूण - healthbenefitstimes.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार, हिरव्या लसणाचे अनेक आरोग्य फायदे आहेत, त्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते. हिरव्या लसणात अ‍ॅलिसिन नावाचे सल्फर कंपाऊंड असते, जे लसणाच्या वासासाठी जबाबदार असते. या विशिष्ट सल्फर पदार्थामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध - हिरवा लसूण अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध आहे. याव्यतिरिक्त, त्यात दाहक-विरोधी घटक देखील असतात, जे अनेक प्रकारच्या संक्रमणांपासून संरक्षण करतात. लोह समृद्ध - लसणाच्या पानात लोह मुबलक प्रमाणात असते. ज्या लोकांचे रक्त कमी आहे किंवा त्यांच्या शरीरात अशक्तपणा आहे, त्यांनी लसणाची पानं नक्की खायला हवी. हे वाचा - चेहऱ्याच्या या भागांवर तीळ असणं मानलं जातं शुभ; तिळावरून असं कळतं व्यक्तिमत्व हिरव्या लसणामुळे हृदय निरोगी राहते - लसूण हृदयासाठी एक उत्तम औषधी वनस्पती आहे. हिरव्या लसणात पॉलिसल्फाइड असते, जे हृदयाला रोगांपासून वाचवते. ही स्प्रिंग वेजी आरोग्यासाठीही फायदेशीर आहे, कारण त्यात मँगनीज असते. हे खनिज शरीरात चांगली कोलेस्ट्रॉल पातळी (HDL) राखते. शरीरात जितके जास्त मँगनीज असेल तितके हृदय चांगले राखण्यासाठी HDL चे प्रमाण जास्त असेल. हे वाचा - कुत्रा अचानक अंगावर आल्यावर असं चुकून पण करायचं नसतं; नाहीतर नक्की चावेल पोटत संसर्गापासून संरक्षण - सर्दी आणि खोकल्याशी लढण्याव्यतिरिक्त, हिरवा लसूण गॅस्ट्रो-इंटेस्टाइनलमध्ये उद्भवणारे सूक्ष्मजंतू संसर्ग दूर करण्यासाठी देखील प्रभावी आहे. पोटाशी संबंधित समस्या टाळण्यासाठी तुम्ही हिरवा लसूण नियमितपणे खाऊ शकता. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या