Home /News /lifestyle /

Coconut Benefits: रात्री झोपण्यापूर्वी ओलं खोबरं खाण्याचे इतके फायदे तुम्हाला माहीत नसतील

Coconut Benefits: रात्री झोपण्यापूर्वी ओलं खोबरं खाण्याचे इतके फायदे तुम्हाला माहीत नसतील

नारळात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्मही आढळतात. पण, तुम्हाला माहीत आहे का रात्री झोपण्यापूर्वी ओलं खोबरं खाल्ल्यानं आरोग्यासाठी कोणते विशेष (Coconut Benefits) फायदे मिळतात.

    मुंबई, 21 जानेवारी : नारळ आपल्या सर्वांना परिचित आहे. नारळाचा (Coconut) आपण वेगवेगळ्या प्रकारे वापर करतो. पूजेपासून ते नारळातील खोबऱ्याचे विविध गोड पदार्थ करण्यापर्यंत त्याचा उपयोग होतो. खोबरेल तेलाचा केसांसह विविध गोष्टींसाठी उपयोग होतो. नारळ पाण्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे नवीन सांगण्याची गरज नाही. नारळाचे आरोग्याशी संबंधित अनेक फायदे आहेत. नारळात प्रथिने आणि व्हिटॅमिन-सी व्यतिरिक्त सर्व प्रकारची खनिजे आढळतात. जे आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. यासोबतच नारळात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्मही आढळतात, पण तुम्हाला माहीत आहे का की, झोपण्यापूर्वी ओलं खोबरं खाल्ल्यानं आरोग्यासाठी विशेष (Coconut Benefits) फायदे मिळतात. वास्तविक, रात्री झोपण्यापूर्वी कच्चं खोबरं खाल्ल्याने चांगली झोप येण्याव्यतिरिक्त इतर अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. जाणून घेऊया झोपण्यापूर्वी खोबरं खाल्ल्याने आरोग्यासाठी इतर कोणते फायदे (Benefits of eating coconut before sleeping) होऊ शकतात. झोपण्यापूर्वी नारळ खाण्याचे फायदे बद्धकोष्ठता फायबर युक्त ओलं खोबरे रात्री झोपण्यापूर्वी खाल्ले तर बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. त्यामुळे पोटाच्या इतर सर्व समस्याही संपतात. म्हणून, जर तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा त्याच्याशी संबंधित इतर कोणतीही पोटाची समस्या असेल. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी थोडेसे ओलं खोबरे खाणे खूप प्रभावी ठरेल. हृदय रोगांमध्ये झोपण्यापूर्वी ओलं खोबरं खाणं हृदयाच्या आरोग्यासाठीदेखील चांगले असते. यामध्ये असलेल्या फॅटमुळे शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारते. त्यामुळे नारळ हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी करू शकतो. हे वाचा - ही आहेत Omicron ची सर्व 14 लक्षणं; सर्वात कमी आणि सर्वात जास्त वेळा दिसलेले Symptoms वजन नियंत्रित राहते आजकाल प्रत्येक दुसरा पुरुष वजन वाढण्याच्या समस्येने त्रस्त आहे. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करणे, ही एक मोठी समस्या बनली आहे, परंतु यामध्ये नारळ खूप प्रभावी ठरू शकतो. झोपण्यापूर्वी ओलं खोबरं खाल्ल्याने त्यामध्ये असलेले फायबर बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर ठेवण्याबरोबरच पचनसंस्थाही निरोगी ठेवते. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. याशिवाय कच्चे खोबरे खाल्ल्याने आपल्या शरीरातील चयापचय क्रियाही योग्य राहते. त्वचेसाठी त्वचेशी संबंधित सर्व समस्या जसे की पिंपल्स किंवा डाग दूर करण्यासाठी नारळ खूप उपयुक्त आहे. रात्री झोपण्याच्या अर्धा तास आधी ओलं खोबरं खाल्ल्यास त्वचेशी संबंधित सर्व समस्या कमी होतात. हे वाचा - Reduce Fever Tips: 100 डिग्रीच्यावर गेलेला तापही खाली आणू शकतील हे 7 घरगुती उपाय चांगल्या झोपेसाठी आजच्या व्यग्र युगात झोप न येण्याची समस्या सामान्य होत चालली आहे. तुम्हालाही अशीच समस्या भेडसावत असेल तर झोपण्याच्या अर्धा तास आधी ओलं खोबरं खा. यामुळे तुमची निद्रानाशाची समस्या दूर होईल आणि तुम्हाला चांगली झोप येऊ लागेल. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या