मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Dry Ginger : फक्त खोकल्यावर इलाज नव्हे, वजन कमी करण्यासह कोलेस्‍ट्रोलही कमी करते सुंठ

Dry Ginger : फक्त खोकल्यावर इलाज नव्हे, वजन कमी करण्यासह कोलेस्‍ट्रोलही कमी करते सुंठ

Benefits Of Dry Ginger : बद्धकोष्ठता दूर करण्यासोबतच सुठं पचन सुधारण्यासाठीही खूप उपयुक्त आहे. अन्न खाल्ल्यानंतर पोट फुगणे किंवा गॅसची समस्या असल्यास तुम्ही याच्या सेवनाने या समस्येवर मात करू (Benefits Of Dry Ginger) शकता.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : अनेकांच्या स्वयंपाकघरात हमखास वापरला जाणारा सुठं हा मसाल्याचा पदार्थ, खरं तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. त्यामुळेच याचा आयुर्वेदिक औषधांमध्येही वापर केला जातो. सुंठाचा वापर केल्यानं तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता. बद्धकोष्ठता दूर करण्यासोबतच सुठं पचन सुधारण्यासाठीही खूप उपयुक्त आहे. अन्न खाल्ल्यानंतर पोट फुगणे किंवा गॅसची समस्या असल्यास तुम्ही याच्या सेवनाने या समस्येवर मात करू (Benefits Of Dry Ginger) शकता. सुठं खाण्याचे फायदे 1. वजन कमी सुठं शरीरातील चरबी जाळण्याचे काम करते. तसेच रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते. याच्या सेवनाने भूक कमी होते आणि अन्न सहज पचते. या सर्व गुणधर्मांमुळे हे वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. 2.पीरियड क्रॅम्प्समध्ये आराम मासिक पाळीच्या दरम्यान होणारा त्रास बरा करायचा असेल तर महिलांनी सुठांचे सेवन करावे. प्रसूतीनंतरही स्त्रियांना सुठांचे लाडू खाण्याची सूचना दिली जाते. त्यामुळं पोट साफ होण्यास आणि शरीराला ऊर्जा प्रदान करण्यास खूप मदत होते. हे वाचा - विकी-कतरिनाच्या लग्नावर एक्स गर्लफ्रेंड हरलीन सेठीची अशी प्रतिक्रिया; वाचा काय म्हणाली अभिनेत्री 3. पचनशक्ती मजबूत होते आयुर्वेदामध्ये, सुठं पावडरचा उपयोग जुनाट अपचन, पोटदुखी आणि पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी केला जातो. पचनक्रिया अधिक चांगल्या प्रकारे कार्य करण्यासाठी ते खूप फायदेशीर ठरू शकते. 4. कोलेस्ट्रॉल नियंत्रित सुठांचे नियमित सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. त्याचे सेवन LDL लिपोप्रोटीन (खराब कोलेस्टेरॉल) च्या उच्च पातळीमुळे हृदयविकाराचा धोका देखील कमी करू शकतो. हे वाचा - St Employees Strike: ‘आत्महत्या करू नका’ एसटी कर्मचाऱ्यांना राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन 5. खोकला कमी होतो ज्या लोकांना कफ होण्याचा त्रास आहे, त्यांनी याचे नियमित सेवन केल्यास किंवा मध मिसळून खाल्ल्यास खूप आराम मिळतो. (सूचना : या लेखात दिलेली माहिती विविध स्त्रोतातून मिळवलेल्या सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Health, Health Tips

पुढील बातम्या