• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • तांब्याच्या बाटलीतून पाणी पिणं आहे फायदेशीर; पण या गोष्टींचीही तुम्हाला माहिती हवी

तांब्याच्या बाटलीतून पाणी पिणं आहे फायदेशीर; पण या गोष्टींचीही तुम्हाला माहिती हवी

आयुर्वेदातही या धातूचा वापर अत्यंत उपयुक्त मानला जातो. जर घरात वापरल्या जाणाऱ्या भांड्यांसाठी, विशेषत: पाणी पिण्याची फुलपात्र, ग्लासेस आणि बाटल्यांसाठी तांब्याचा वापर केला गेला तर ते आरोग्यासाठी मोठे फायदेशीर ठरू शकते.

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 सप्टेंबर:  लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत की, तांब्याच्या भांड्यात (Copper Vessels)  पाणी पिण्याचे (Drinking Water) अनेक फायदे आहेत. पण तुम्हाला कदाचित माहीत नसेल हा एकमेव धातू आहे की, ज्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे (Benefits Of Drinking Water From Copper Bottle Vessels) गुणधर्म आहेत. pharmacy.in मध्ये दिलेल्या माहितीनुसार, तांब्याचा वापर जखमेवर (कापणे), डोकेदुखी आणि अगदी कॉलराच्या उपचारांमध्येही खूप फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे. आयुर्वेदातही या धातूचा वापर अत्यंत उपयुक्त मानला जातो. जर घरात वापरल्या जाणाऱ्या भांड्यांसाठी, विशेषत: पाणी पिण्याच्या कुंड्या, ग्लासेस आणि बाटल्यांसाठी तांब्याचा वापर केला गेला तर ते आरोग्यासाठी मोठे फायदेशीर ठरू शकते. त्याचे फायदे काय आहेत - तांब्यामध्ये (कॉपर) अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात, जे कर्करोगास कारणीभूत मुक्त रॅडिकल्स आणि त्यांचे दुष्परिणाम कमी करण्यास मदत करतात. -  तांब्यामध्ये मेलेनिनचा घटक असतो जो आपल्या त्वचेला अतिनीलपासून संरक्षण करतो आणि त्याचे नुकसान टाळतो. - अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, तांबे कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी करते. -  हे थायरॉईड ग्रंथी सुरळीत चालण्यास मदत करते. -  हे हिमोग्लोबिन तयार करण्यास आणि शरीरातील लोह शोषण्यास मदत करते. ज्यामुळे अशक्तपणा दूर होतो. - तांब्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे सांधेदुखीपासून मुक्त होण्यास मदत करतात. हे वाचा - Discount च्या हव्यासामुळे Cold drink ची एक बाटली पडली 36 लाखांना; सात वर्षे तुरुंगवासाचीही शक्यता - शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी तांब्यातील पाणी प्रभावी आहे. - हे रक्तपेशींमध्ये असलेल्या प्लेक्स काढून रक्त परिसंचरण वाढवते, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. - तांबे हे एक नैसर्गिक प्रतिजैविक आहे. - तांब्याचे पाणी प्यायल्याने कॉलरा किंवा दूषित पाण्यामुळे होणारे अनेक प्रकारचे संक्रमण टाळता येते. ते शरीराला डिटॉक्स करते. तांब्याच्या बाटलीमध्ये पाणी किती काळ ठेवावे? जर तुम्ही रात्री तांब्याच्या भांड्यात, बाटलीत पाणी ठेवले तर सकाळी हे पाणी प्या. 6 ते 8 तास तांब्याच्या वस्तूत राहिलेले पाणी पिण्यासाठी फायदेशीर असते. उपाशी पोटी हे पाणी पिणे सर्वात उपयोगी आहे. हे वाचा - Bigg Boss Marathi: आपल्या दोन्ही अपयशी लग्नाबद्दल चर्चा करणाऱ्या स्नेहा वाघवर भडकली काम्या पंजाबी याचा आरोग्यासाठी फायदा असला तरी सतत तांब्याच्याच भांड्यातील पाणी पिणं योग्य नाही. काही दिवस दुसऱ्या धातूच्या भांड्यातील पाणी प्यायला हवे. उदाहरणार्थ, जर तुम्ही एक महिना नियमितपणे तांब्याच्या भांड्यातील पाणी पित असाल, तर पुढचे दोन महिने सामान्य पाणी प्या. थंड नको, नॉर्मल तापमानाचे पाणी वापरा गरम किंवा खूप थंड पाणी कधीही तांब्याच्या भांड्यातून किंवा बाटलीत घेऊ नका. नेहमी नॉर्मल टेंम्परेचरचे पाणी प्यावे. ऑक्सिजन आणि द्रव पदार्थांच्या संपर्कात आल्यावर तांब्याची भांडी काळी होतात. अशा परिस्थितीत, ते स्वच्छ करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लिंबू आणि मीठाने घासणे.
  Published by:News18 Desk
  First published: