मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

उन्हाळ्यात लस्सी पिण्याचे आहेत अनेक फायदे; वजन नियंत्रणात राहतं आणि बरंच काही

उन्हाळ्यात लस्सी पिण्याचे आहेत अनेक फायदे; वजन नियंत्रणात राहतं आणि बरंच काही

लस्सी आपल्याला हायड्रेटेड तर ठेवतेच, पण पचनशक्तीही निरोगी ठेवते. लस्सी प्यायल्याने शरीर आतून थंड राहते. जाणून घेऊया लस्सी पिण्याचे आरोग्यासाठी इतर कोणते फायदे (Health Benefits of Lassi) आहेत.

लस्सी आपल्याला हायड्रेटेड तर ठेवतेच, पण पचनशक्तीही निरोगी ठेवते. लस्सी प्यायल्याने शरीर आतून थंड राहते. जाणून घेऊया लस्सी पिण्याचे आरोग्यासाठी इतर कोणते फायदे (Health Benefits of Lassi) आहेत.

लस्सी आपल्याला हायड्रेटेड तर ठेवतेच, पण पचनशक्तीही निरोगी ठेवते. लस्सी प्यायल्याने शरीर आतून थंड राहते. जाणून घेऊया लस्सी पिण्याचे आरोग्यासाठी इतर कोणते फायदे (Health Benefits of Lassi) आहेत.

    मुंबई, 03 जून : उन्हाळ्यात लोक तहान शमवण्यासाठी विविध प्रकारचे पेये पितात. कोणी भरपूर पाणी पितं, कोणी रस, नारळपाणी, सरबत, ताक इ. आपल्या या यादीत लस्सी (Lassi) चुकली असेल किंवा अजून ती घ्यायची राहिली असेल, तर उन्हाळ्यात या आरोग्यदायी आणि पौष्टिक पेयाचा नक्कीच समावेश करा. उन्हाळ्यात गोड लस्सी पिण्याची मजा काही औरच असते. लस्सी आपल्याला हायड्रेटेड तर ठेवतेच, पण पचनशक्तीही निरोगी ठेवते. लस्सी प्यायल्याने शरीर आतून थंड राहते. जाणून घ्या, लस्सी पिण्याचे आरोग्यासाठी इतर कोणते फायदे (Health Benefits of Lassi) आहेत. लस्सीमुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते - बीबॉडीवाइजमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, काही लोक उन्हाळ्यात तहान शमवण्यासाठी कार्बोनेटेड पेये, कोल्ड ड्रिंक्स, शर्करायुक्त सोडा इत्यादी पितात, ज्यामुळे आरोग्याला अनेक प्रकारे हानी पोहोचते. त्यामुळे पोटदुखी, स्मृतिभ्रंश, पोटाची चरबी, यकृतातील चरबी, मेटाबॉलिक सिंड्रोम इत्यादी समस्या वाढवतात. नैसर्गिक पेय किंवा सेंद्रिय पेय म्हणून लस्सी पिणे चांगले. सोडा आणि साखरयुक्त पेयांपेक्षा लस्सी हा आरोग्यदायी पर्याय आहे. लस्सी गोड असते, जी दह्यापासून तयार केली जाते. लस्सीमध्ये विविध प्रकारचे पोषक आणि चांगले बॅक्टेरिया असतात, पोटाचे खराब आरोग्य बरे करून एकूण आतड्याचे आरोग्य सुधारते. वजन कमी करणारी लस्सी आपण वजन कमी करण्याचे अनेक मार्ग आजमावले असतील तर आताच लस्सी प्यायला सुरू करा. त्यात प्रोबायोटिक्स आणि दूध दोन्ही असतात, आतड्यांच्या हालचाली सुधारतात, ज्यामुळे पचन सुधारते. निरोगी बॅक्टेरिया आणि प्रोबायोटिक्स असल्याने पोट फुगणे आणि जळजळ होण्याच्या समस्येस प्रतिबंध होतो. हे दोन्ही घटक वजन कमी करण्यास मदत करतात. लस्सी बनवण्यासाठी आपण कमी चरबीयुक्त दही घेतो, त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि वजनही कमी राहते. ऊर्जा मिळते - लस्सीमध्ये जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिजे, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, एंजाइम असतात, जे अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करण्यास मदत करतात. हे वाचा - 5 जूनपासून या राशींवर शनीची राहणार विशेष कृपा; तुमच्या राशीचा भाग्योदय होणार? प्रतिकारशक्ती वाढते - लस्सीमध्ये भरपूर लॅक्टिक अॅसिड असते, त्याचप्रमाणे त्यात व्हिटॅमिन डीही भरपूर असते. हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. चयापचय गती वाढवते, ज्यामुळे वजन कमी करण्यात कोणतीही अडचण येत नाही. हे वाचा - मंकीपॉक्समध्ये शारीरिक संबंधांवरही बंधन; प्रसार रोखण्यासाठी इतके दिवस दूर राहा हाडे मजबूत, कोलेस्ट्रॉल नियंत्रित - हाडांमध्ये वेदना होणे आणि तरुण वयात हाडांचे आजार टाळायचे असतील तर लस्सीचे सेवन जरूर करा. कारण, लस्सी कॅल्शियमने समृद्ध आहे, हाडांना त्याचा फायदा होतो. लस्सीमध्ये असलेले प्रोबायोटिक्स कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास तसेच रक्तदाब सामान्य ठेवण्यास मदत करतात. तसेच, जीवनसत्त्वे आणि खनिजे असल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन राखते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips, Summer

    पुढील बातम्या