Home /News /lifestyle /

फक्त चवीसाठी नव्हे, कढीपत्त्याचे आरोग्यासाठी आहेत इतके फायदे; स्नायू-हाडांसाठी गुणकारी

फक्त चवीसाठी नव्हे, कढीपत्त्याचे आरोग्यासाठी आहेत इतके फायदे; स्नायू-हाडांसाठी गुणकारी

कढीपत्ता कार्बोहायड्रेट्स, फायबर, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम, झिंक, मल्टीविटामिन आणि फ्लेव्होनॉइड्स सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहे. हे घटक आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. आरोग्यासाठी होणारे फायदे जाणून घेऊया.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 26 मे : कढीपत्ता (Curry leaves) हा सामान्यतः दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांमध्ये प्रामुख्याने वापरला जातो. खाद्यपदार्थांना एक विशेष चव आणण्यासाठी त्याचा वापर केला जातो. जेवणात कढीपत्ताचा वापर केल्याने चव तर वाढतेच आणि कढीपत्ता आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. तमिळ भाषेत करी म्हणजे मसाला. कढीपत्त्याला अनेक ठिकाणी गोड कडुलिंब असेही (Health Benefits Of Curry leaves) म्हणतात. NetMed मध्ये दिलेल्या माहितीनुसार, कढीपत्ता कार्बोहायड्रेट्स, फायबर, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम, झिंक, मल्टीविटामिन आणि फ्लेव्होनॉइड्स सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहे. जे आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. आयुर्वेदानुसार, कढीपत्त्याचा उपयोग अॅनिमिया, मधुमेह, अपचन, लठ्ठपणा, किडनी समस्या, केस आणि त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी देखील केला जातो. कढीपत्त्याचे आरोग्यासाठी फायदे - पचन सुधारणे - कढीपत्त्यात भरपूर फायबर आढळतात, पचन चांगले ठेवण्यासाठी आणि पोटाच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी ते उपयुक्त ठरते. कढीपत्त्याच्या वापराने चक्कर येणे, उलट्या होणे, जुलाब होणे इत्यादी त्रास कमी होतात. बॉडी ग्रोथ- कढीपत्त्यात भरपूर प्रथिने असतात, ज्यामुळे शरीरातील बिल्डिंग ब्लॉक्सची वाढ होण्यास मदत होते. याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि स्नायू मजबूत होतात. हाडे मजबूत - कढीपत्त्यात कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते, जे हाडे मजबूत करण्याचे काम करते. त्याचा नित्यक्रमात समावेश केल्याने हाडांशी संबंधित आजार होण्याची शक्यता कमी होते आणि दातही मजबूत राहतात. केस, त्वचा आणि तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर - कढीपत्त्याच्या मदतीने विविध प्रकारची एसेंशियल तेले तयार केले जातात, ज्यामुळे केस, त्वचा आणि तोंडाच्या अनेक समस्या कमी होतात. हे वाचा - मंगळवारी कोणालाच उधार पैसे द्यायचे-घ्यायचे नसतात; अनेक अडचणी नंतर डोकेदुखी ठरतात मधुमेहामध्ये फायदेशीर - कढीपत्ता रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते, ज्यामुळे ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. सकाळी-संध्याकाळी कढीपत्त्याची पाने चावून खाणे किंवा त्यांचा रस काढून पिणे मधुमेहींसाठी गुणकारी आहे. हे वाचा - कुठे मीठ मागायचं नाही तर, कुठे किटली धूत नाहीत; जगात खाण्यासंबंधी आहेत अजब प्रथा अशक्तपणा - जर तुम्हाला अॅनिमियाचा त्रास होत असेल तर तुमच्या दिनचर्येत कढीपत्त्याचा समावेश करा. त्याची काही पाने रोज खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिन वाढू शकते, ज्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या