नवी दिल्ली, 16 मे : भारतात काही परंपरा शतकानुशतके चालत आल्या आहेत. कपाळावर चंदनाचा टिळा लावणे देखील यामध्ये येतं. पूजेतही चंदनाचे विशेष महत्त्व आहे. याशिवाय अनेक कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये चंदनाचा वापर केला जातो. चंदनाच्या फेसपॅकपासून ते परफ्यूम, रूम फ्रेशनरपर्यंत असंख्य उत्पादने बाजारात आहेत. बदलत्या ट्रेंडमध्येही कपाळावर चंदनाचा टिळक लावणारे लाखो लोक आहेत. आज आम्ही तुम्हाला चंदनाच्या अशा गुणधर्मांबद्दल सांगत आहोत, हे जाणून तुम्हीही चंदनाची पेस्ट वापरण्यास (Sandalwood Benefits) सुरुवात कराल.
वास्तविक, हिंदू धार्मिक प्रथेचा एक भाग असण्यासोबतच चंदनाला एक विशेष वैज्ञानिक महत्त्व देखील आहे. यामुळेच अनेकजण कपाळावर, मानेवर आणि डोक्याच्या वरच्या बाजूला चंदनाचा टिळा लावतात. दक्षिण भारतातील बहुतांश भागात ही परंपरा आजही घरोघरी पाळली जाते. तिथे स्त्रिया, पुरुष आणि मुलेही चंदनाचा टिळा लावतात. जाणून घ्या चंदनाचे अनोखे फायदे.
ताप कमी करण्यासाठी चंदन गुणकारी आहे
तापामध्ये शरीराचे तापमान कमी करण्यासाठी अनेकदा डोक्यावर थंड पाण्याची पट्टी लावली जाते. त्याप्रमाणेच तापावर चंदनाचा वापर होतो. वास्तविक, चंदनाचा प्रभाव थंड असतो. तापामध्ये चंदनाची पेस्ट कपाळावर लावल्याने ते नैसर्गिक औषधाप्रमाणे काम करते. चंदनाच्या पेस्टने शरीराचे तापमान सामान्य होण्यास सुरुवात होते.
हे वाचा -
चटणी आणि औषधी गुणधर्माशिवाय पुदिन्याचा घरात इतक्या कामांसाठी आहे उपयोग
चंदन हे चमकदार त्वचेचे रहस्य -
सध्या लोक पुन्हा नैसर्गिक वस्तू वापरणे पसंत करत आहेत. यामुळेच अनेक कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये चंदनाचा वापर केला जात आहे. तथापि, या उत्पादनांमध्ये रसायने देखील असतात. अशा स्थितीत त्वचा सुधारण्यासाठी चंदन पावडरचा फेस पॅकही लावता येतो. यामुळे त्वचेवर चमक तर येतेच पण रंगही सुधारतो.
हे वाचा -
आंबा खाल्ल्यानं वजन कमी होतं का? एका दिवसात नेमके किती आंबे खाणे आहे योग्य
चंदन डोकेदुखीवर गुणकारी -
डोकेदुखीच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी चंदनाचा वापर केला जाऊ शकतो. अनेक वेळा उष्णतेमुळे डोक्याच्या नसा ताणल्या जातात, त्यामुळे डोकेदुखी होते. अशा वेळी डोक्यावर चंदनाची पेस्ट लावल्याने माथा थंड राहतो आणि दुखण्यापासून आराम मिळतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.