• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • पालकांनी इंटरनेटचं व्यसन असं कमी करून मुलांसमोर ठेवावा आदर्श; वापरा या सोप्या टिप्स

पालकांनी इंटरनेटचं व्यसन असं कमी करून मुलांसमोर ठेवावा आदर्श; वापरा या सोप्या टिप्स

Parenting Tips : जेव्हा त्याला तुमचं लक्ष वेधण्याची अपेक्षा असते, तेव्हा तुम्ही इंटरनेटवर व्यग्र असता. याचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होतो. तो चिडचिडा होऊ शकतो. म्हणूनच पालकांनी मुलांसमोर जास्त वेळ मोबाईलमध्ये डोकं घालून राहू (Parenting Tips) नये.

 • Share this:
  मुंबई, 09 नोव्हेंबर : आजच्या काळात केवळ मुलंच नाही तर पालकही इंटरनेटच्या व्यसनाला (Internet addiction) बळी पडत आहेत. आजच्या काळात प्रत्येकजण सोशल मीडियाशी कनेक्ट आहे. तुम्ही मुलांचे पालक (parents) असाल आणि तुम्ही ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम इत्यादी सोशल मीडियावर कनेक्ट असाल तर तुम्ही मुलांकडे लक्ष द्यायला कमी पडू शकता. अनेकदा पालक मुलांसोबत बसून त्यांना खेळात गुंतवून ठेवतात आणि त्यांच्यासमोर सोशल साइट्सवर सर्फिंग किंवा चॅटिंग सुरू करतात. त्यांना असे वाटते की, त्यांचे मूल खेळात व्यग्र आहे, परंतु असं केल्यानं मुलांवर वाईट परिणाम होऊ शकतो. तुमचं लक्ष आपल्याकडं नसून सोशल मीडियावर (Social Media addiction) आहे, असं मुलांना वाटू शकतं. जेव्हा त्याला तुमचं लक्ष वेधण्याची अपेक्षा असते, तेव्हा तुम्ही इंटरनेटवर व्यग्र असता. याचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होतो. तो चिडचिडा होऊ शकतो. म्हणूनच पालकांनी मुलांसमोर जास्त वेळ मोबाईलमध्ये डोकं घालून राहू (Parenting Tips) नये. संशोधन काय सांगते संशोधनानुसार, जे पालक मोबाईलवर सोशल मीडिया अपडेट, गेमिंगमध्ये जास्त गुंतलेले असतात, त्यांची मुलं अधिक गैरवर्तन करतात. म्हणूनच फोन सोडून मुलांसोबत चांगला वेळ घालवणे आणि त्यांच्याकडे शक्य तितके लक्ष देणं महत्त्वाचं आहे. हे वाचा - तुरुंगातून आल्यांनतर पहिल्यांदाच कॅमेरात कैद झाला राज कुंद्रा; शिल्पा शेट्टीसोबत घेतलं देवीचं दर्शन घरी नियम बनवा जेव्हा पालक अनेकदा फोनमध्ये गुंतलेले असतात, तेव्हा हे पाहून मुलेही फोनवरच जास्त वेळ घालवतात. अशा परिस्थितीत यासाठी काही नियम बनवणे आवश्यक आहे, विशेषत: जेवण करताना जेवणाच्या टेबलावर कोणताही फोन किंवा टॅब येऊ नये इत्यादी. सोशल मीडियाला नो म्हणा तुम्ही सोशल मीडिया किंवा तुमचा फोन सतत तपासत राहिल्यास त्याचा तुमच्या मुलावर नकारात्मक परिणाम होईल. यासाठी सोशल मीडियापासून काही अंतर राखणं आवश्यक आहे. हे वाचा - Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या जबरदस्त योजना; तुमचे पैसे सुरक्षितपणे करा दुप्पट सुट्टीच्या दिवशी फोनपासून दूर रहा तुम्ही कुठेतरी फिरायला जात असाल तर फोटो जरूर घ्या, पण तो लगेच सोशल मीडियावर अपलोड करण्याऐवजी तुमच्या कुटुंबीयांसोबत आणि मुलांसोबत थोडा वेळ घालवा. यासाठी सुट्टीच्या काळात तुमचा फोन सायलेंट किंवा फ्लाईट मोडमध्ये ठेवावा, जेणेकरून तुम्ही फोटो क्लिक करू शकाल पण तो अपलोड करायचा नाही हे लक्षात राहील. (या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यजू 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
  Published by:News18 Desk
  First published: