नवी दिल्ली, 27 डिसेंबर : प्रवासात उलट्या होणं, ही काही लोकांसाठी मोठी समस्या असते. या आजारामुळे त्या व्यक्तीला केवळ शारीरिक त्रास सहन करावा लागत नाही, तर प्रवासादरम्यान त्यांना लाजिरवाणे वाटू लागते. या त्रासामुळे अनेक वेळा अशा लोकांना कुठंही जायला आवडत नाही. वैद्यकीय भाषेत या आजाराला मोशन सिकनेस म्हणतात. मोशन सिकनेसमध्ये, कार, बस, जहाज, विमान, ट्रक इत्यादींमधून प्रवास करताना उलट्या किंवा मळमळ होण्याची समस्या असते. मोशन सिकनेसमुळे लोकांच्या प्रवासादरम्यान उलट्या थांबत नाहीत. फॅमिली डॉक्टर वेबसाइटनुसार, मोशन सिकनेस हा काही फार गंभीर आजार नाही, परंतु प्रवासादरम्यान त्यामुळं खूप (Tips to prevent vomiting while traveling) अस्वस्थ परिस्थिती निर्माण होते.
मोशन सिकनेसची लक्षणं म्हणजे प्रवासादरम्यान उलट्या होणं
मोशन सिकनेसचं प्रवासात उलट्या होणं हे मुख्य लक्षण आहे. याशिवाय त्वचेचा रंग कमी होतो. मोशन सिकनेसमुळे तीव्र डोकेदुखी आणि जास्त घाम येतो. खूप लवकर चक्कर येते. या स्थितीत रुग्णाला काहीही करण्याची हिंमत नसते.
मोशन सिकनेस टाळण्याचे उपाय
तुम्हाला सतत मोशन सिकनेसचा त्रास होत असेल तर गाडीच्या पुढच्या सीटवर बसा. बोटीने प्रवास करत असाल तर मध्यभागी बसा. ट्रेनमध्ये असताना, तुमचा चेहरा नेहमी पुढच्या दिशेने ठेवा, म्हणजेच ट्रेन ज्या बाजूने जात आहे, त्याच बाजूला ठेवा.
मोशन सिकनेस टाळण्यासाठी, नेहमी ताजी हवा असलेल्या ट्रेन किंवा बसमध्ये खिडकीजवळ बसा. ताजी हवा मिळाल्याने तुम्हाला बरे वाटेल आणि उलट्या होणार नाहीत.
हे वाचा - हनी ट्रॅपला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन? चिठ्ठीत लिहिलेला मोबाइल पासवर्ड उलगडणार गूढ
प्रवासादरम्यान उलट्या होत असल्यास हलके अन्न खावे. काहीही न खाता प्रवासाला निघाल्याने मोशन सिकनेस अधिक होतो. हलका आणि सकस आहार मोशन सिकनेसपासून मुक्त होण्यासाठी प्रभावी आहे.
प्रवासात काहीही वाचण्याचा प्रयत्न करू नका. अस्वस्थ असताना, आसनावर झोपा किंवा विश्रांती घ्या.
प्रवासादरम्यान तुम्हाला उलट्यांचा त्रास होत असेल, तर आकसाचे पान उलट्या रोखण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. आंब्याचे एक पान घेऊन त्याचा गुळगुळीत भाग पायाच्या तळव्यावर ठेवा आणि त्यावर मोजे घाला, प्रवासात उलट्यांपासून आराम मिळेल.
प्रवासापूर्वी दही आणि डाळिंबाचे सेवन केल्याने प्रवासात उलटीच्या समस्येचा त्रास होणार नाही. फक्त दही खाल्ल्याचाही तुम्हाला फायदा होईल.
जर तुम्हाला सकाळी प्रवास करायचा असेल तर रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे, धणे आणि बडीशेप भिजवा आणि सकाळी सेवन करा. प्रवासात उलट्या होणार नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips