मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

महामारीच्या काळात फक्त लठ्ठपणाच्या भीतीनं Anorexia आजार इतका वाढला - नवं संशोधन

महामारीच्या काळात फक्त लठ्ठपणाच्या भीतीनं Anorexia आजार इतका वाढला - नवं संशोधन

Anorexia in teens: किशोरवयीन मुलांना एनोरेक्सियासाठी उपचार घ्यावे लागतात, त्यांच्या शरीराचा आकार (बॉडी शेप) खराब होतो. संशोधकांनी 2015 ते नोव्हेंबर 2020 दरम्यान एनोरेक्सियावर उपचारासाठी आलेल्या किशोरवयीन मुलांचा डेटा गोळा केला.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 13 डिसेंबर : कोविड-19 महामारीच्या काळात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर जगभरातील अनेक लोक आपापल्या घरात अक्षरश: कैद झाले होते. यामुळे लोक घरात राहून जास्त अन्न खातील, ज्यामुळे लठ्ठपणा वाढेल, अशी भीती होती. प्रौढांमध्‍ये महामारीच्‍या काळात लठ्ठपणा वाढला आहे की नाही याबाबत कोणतीही माहिती नाही, परंतु लठ्ठपणाच्‍या भीतीमुळे कमी खाल्ल्याने एनोरेक्सियाच्‍या (Anorexia) घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. कॅनडाच्या मॅकगिल युनिव्हर्सिटीच्या (McGill University) संशोधनातून असे दिसून आले आहे की, महामारीच्या काळात एनोरेक्सियाने ग्रस्त किशोरवयीनांच्या संख्येत 65 टक्के वाढ झाली आहे. एनोरेक्सिया हा एक आजार आहे ज्यामध्ये पौगंडावस्थेतील वजनात अन्नाच्या कमतरतेमुळे लक्षणीय घट होते. किशोरवयीन मुलांच्या मनात जास्त खाल्ल्याने आपण लठ्ठ होऊ, अशी भीती लागून राहते. त्यामुळे असे लोक काहीही खाताना टाळाटाळ करतात. विशेष म्हणजे खूप खाल्ले आहे, असे वाटले तरी अशा लोकांच्या (Anorexia in teens) उलट्या होतात.

रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्याही वाढली

डेलीमेलच्या वृत्तानुसार, संशोधकांना रुग्णालयांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे असे आढळून आले की, महामारीपूर्वी 13 ते 16 वर्षे वयोगटातील 24.5 टक्के किशोरांना दर महिन्याला एनोरेक्सियाच्या उपचारासाठी यावे लागत होते, तर साथीच्या आजारानंतर 40.6 टक्के किशोरवयीन मुले उपचारासाठी येत आहेत. धक्कादायक म्हणजे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ही संख्या 65 टक्क्यांवर गेली आहे. एनोरेक्सिया असलेल्या किशोरवयीन मुलांचा हॉस्पिटलायझेशन दर देखील 166 टक्क्यांनी वाढला आहे. यावरून असा अंदाज लावता येतो की, किशोरवयीन मुले लठ्ठपणाबाबत कोणत्या ना कोणत्या इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्सने त्रस्त असतात.

हे वाचा - Iron for Health: आपल्या शरीराला दररोज किती लोह आवश्यक असतं, योग्य प्रमाण जाणून घ्या

चिंता आणि नैराश्येचे बळी

अभ्यासात असे आढळून आले की, ज्या किशोरवयीन मुलांना एनोरेक्सियासाठी उपचार घ्यावे लागतात, त्यांच्या शरीराचा आकार (बॉडी शेप) खराब होतो. संशोधकांनी 2015 ते नोव्हेंबर 2020 दरम्यान एनोरेक्सियावर उपचारासाठी आलेल्या किशोरवयीन मुलांचा डेटा गोळा केला.

हे वाचा - Public Provident Fund: कमीत कमी 500 रुपयांची गुंतवणूक आवश्यक, PPF Account संबंधित 10 महत्त्वाचे मुद्दे

यानंतर, विश्लेषणात असे दिसून आले की 13 ते 16 वयोगटातील किशोरवयीन मुले लठ्ठपणाबद्दल खूप चिंतेत आहेत. या भीतीमुळे बहुतांश किशोरवयीन मुलांनी खाण्यापिण्यावर मर्यादा आणल्या आहेत. संशोधकांनी सांगितले की, एनोरेक्सियाने ग्रस्त असलेल्या किशोरांना इतर आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. अशी किशोरवयीन मुले खूप लवकर चिंता आणि नैराश्येचे बळी ठरतात.

First published:

Tags: Corona, Coronavirus, Health Tips