• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • खाण्या-पिण्याच्या पदार्थांमधील वापराशिवाय सैंधव मीठाचे आहेत इतके फायदे; असा करा वापर

खाण्या-पिण्याच्या पदार्थांमधील वापराशिवाय सैंधव मीठाचे आहेत इतके फायदे; असा करा वापर

Amazing Uses Of Rock Salt : हृदयरोग आणि पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठीही याचा उपयोग होतो. अन्नाव्यतिरिक्त या मीठाच्या वापराबद्दल बोलायचे झाल्यास ते आपल्यासाठी इतर अनेक प्रकारांमध्ये देखील उपयुक्त ठरू शकते. सैंधव मीठाचा वापर कसा करावा याबाबत आपण जाणून घेऊया.

 • Share this:
  मुंबई, 07 नोव्हेंबर : सणासुदीच्या काळात सैंधव मिठाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आयुर्वेदातही उपचारासाठी सैंधव मिठाचा वापर केला गेला आहे. संशोधनात असंही आढळून आलं आहे की सैंधव मीठ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सैंधव मीठ म्हणजेच मॅग्नेशियम सल्फेट हे अंतर्गत अवयवांची सूज कमी करण्यासाठी देखील चांगले मानले जाते. याशिवाय हृदयरोग आणि पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठीही याचा उपयोग होतो. अन्नाव्यतिरिक्त या मीठाच्या वापराबद्दल बोलायचे झाल्यास ते आपल्यासाठी इतर अनेक प्रकारांमध्ये देखील उपयुक्त ठरू शकते. सैंधव मीठाचा वापर (Amazing Uses Of Rock Salt) कसा करावा याबाबत आपण जाणून घेऊया. यासाठीही सैंधव मीठ आहे फायदेशीर जर किचन सिंक जास्त घाण झाली असेल तर सैंधव मीठ शिंपडा आणि रात्रभर तसेच राहू द्या, सकाळी सींक ब्रशने घासून घ्या. सिंक एकदम स्वच्छ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. वॉशिंग मशिनमध्ये वॉशर घाण झाला असेल, तर मशिनमध्ये गरम पाणी भरून त्यात एक चतुर्थांश व्हाईट व्हिनेगर आणि एक कप सैंधव मीठ घाला. आता मशीन सुरू करा, यामुळे मशिनची साफसफाई केली जाईल. एक ग्लास पाण्यात एक चमचा सैंधव मीठ मिसळा आणि स्प्रे बाटलीत भरून ते झाडांवर शिंपडा. यामुळे झाडे पिवळी होणार नाहीत. सैंधव मीठ आणि लिक्विड डिश डिटर्जंट मिक्स करा आणि याने बाथरूम किंवा किचन फरशी स्वच्छ करा, सर्व डाग निघून जातील. हे वाचा - Good News! मोदी सरकारच्या या निर्णयामुळे खाद्यतेल होणार स्वस्त, बेसिक ड्यूटी 2.5 टक्क्यांवरुन शुन्यावर डास किंवा कीटक चावल्यावर अर्धा कप कोमट पाण्यात अर्धा कप सैंधव मीठ मिसळून खाजलेल्या भागावर लावा, लगेच आराम मिळेल. जर हात खडबडीत झाले असतील तर एक चमचा सैंधव मीठामध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑईल मिसळा आणि या मिश्रणाने हातांना मसाज करा आणि पाण्याने धुवा. बद्धकोष्ठता असेल तर एक ग्लास पाण्यात एक चमचा सैंधव मीठ मिसळून प्या, आराम मिळेल आणि पोट साफ होईल. थकवा दूर करण्यासाठी गरम पाण्यात सैंधव मीठ टाका आणि त्यात पाय भिजवा आणि 10 मिनिटे बसा. थकवा कमी होईल आणि झोप चांगली येईल. हे वाचा - नव्या नवरीप्रमाणे नटली Rinku Rajguru! अभिनेत्रीच्या ब्रायडल लुकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा जर तुम्ही तणावाखाली राहत असाल तर यामागचे एक कारण म्हणजे मॅग्नेशियमची कमतरता. अशा स्थितीत आंघोळ करताना पाण्याने भरलेल्या टबमध्ये सैंधव मीठ मिसळा आणि त्यात काही वेळ बसा, तुमचा मूड चांगला राहील. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
  Published by:News18 Desk
  First published: