नवी दिल्ली, 22 जानेवारी : भारतात 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील तरुणांसाठी लसीकरण (Corona Vaccine) सुरू झाले आहे. यासह, राष्ट्रीय कोविड लसीकरण कार्यक्रमांतर्गत, 10 जानेवारीपासून आरोग्य सेवा कर्मचारी, आघाडीवर (frontline workers) काम करणारे आणि 60 वर्षांवरील कॉमोरबिड लोकांसाठी प्रीकॉशन डोस देखील सुरू करण्यात आले आहेत. ज्या अंतर्गत या लोकांना कोरोना लसीचा तिसरा डोस दिला जात आहे. हा डोस पुन्हा वाढलेला कोरोना संसर्ग आणि नवीन प्रकार ओमिक्रॉन लक्षात घेऊन सुरू करण्यात आला आहे. हा डोस दुसऱ्या डोसच्या 9 महिन्यांनंतर किंवा 39 आठवड्यांनंतर दिला जात आहे.
देशात पसरणाऱ्या कोरोना संसर्गामुळे कोविडचे लाखो रुग्ण दररोज समोर येत आहेत. अशा परिस्थितीत सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, जो व्यक्ती प्रीकॉशन डोस घेण्यास पात्र आहे, त्याला कोरोना संसर्ग झाला तरीही, त्याला प्रीकॉशन डोस देता येईल का? जर देता येत असेल तर मध्यांतर किती दिवसांसाठी निश्चित केला आहे. याविषयी नुकतीच भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने यासाठी एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.
हे वाचा -
Success Mantra: जीवनात निराशा कुणाला चुकलीय; यशस्वी लोकं त्यावर अशी करतात मात
असे सांगण्यात आले आहे की, जर एखाद्या व्यक्तीला SARS-CoV-2 ची लागण झाली असेल आणि ते प्रयोगशाळेच्या चाचणीत सिद्ध झाले असेल, तर त्याला केवळ प्रीकॉशन डोसच नाही तर कोरोनातून बरे झाल्याच्या 3 महिन्यांनंतर कोरोना लसीकरण कार्यक्रमाचा पहिला आणि दुसरा डोस देखील दिला जाईल.
हे वाचा -
Aadhaar Card संबंधी कोणतीही समस्या केवळ एका कॉलवर सोडवली जाईल, या क्रमांकावर करा कॉल
आत्तापर्यंत भारतात 8 कोरोना लसींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे, यामध्ये कोवॅक्सिन आणि कोविशील्ड व्यतिरिक्त Zydus Cadila च्या ZyCoVD, बायालॉजिकल E चे Corbivax, Kovovax, Sputnik V, Moderna आणि Johnson & Johnson यांचा समावेश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.