Home /News /lifestyle /

आलिया भट्टच्या योगा ट्रेनरने सांगितल्या 3 ब्रीदिंग टेकनीक; उकाड्यातही असं राहता येईल एकदम Cool

आलिया भट्टच्या योगा ट्रेनरने सांगितल्या 3 ब्रीदिंग टेकनीक; उकाड्यातही असं राहता येईल एकदम Cool

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टची (Alia Bhatt) योगा ट्रेनर अंशुका परवानी (Anshuka Parwani) हिने इन्स्टाग्रामवर काही श्वास घेण्याच्या योगा टेक्नीक्स शेअर केल्या आहेत, ज्या तुम्हाला कडक उन्हाळ्यातही थंड राहण्यास मदत (Breathing Yoga) करतील.

पुढे वाचा ...
  मुंबई, 28 एप्रिल : योग हा एक सर्वांगीण व्यायाम आहे. प्रत्येकाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. काही योगासने आहेत जी विशिष्ट रोग किंवा परिस्थिती हाताळण्यास मदत करतात, त्याचप्रमाणे काही योगासने आहेत जी कडक उन्हात आपल्याला आराम देऊ शकतात. आजकाल तापमानाचा पारा 45 अंशाच्या पुढे जात आहे. उष्णता इतकी आहे की, घराबाहेर पडताच उष्णतेच्या झळा असह्य करतात. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टची (Alia Bhatt) योगा ट्रेनर अंशुका परवानी (Anshuka Parwani) हिने इन्स्टाग्रामवर काही योगा श्वास तंत्र शेअर केले आहेत, जे तुम्हाला कडक उन्हाळ्यातही थंड राहण्यास मदत (Breathing Yoga) करतील. तिच्या इन्स्टा पोस्टवर शेअर केलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अंशुकाने लिहिले आहे की, “बीट द हीट! (उष्णतेवर मात करा), उन्हाळ्यात स्वतःला नेहमी हायड्रेटेड ठेवणे आणि शक्य तितकं उष्णतेपासून स्वतःला वाचवणं खूप महत्त्वाचं आहे, येथे काही योग श्वास तंत्र सांगितले आहेत, जे तुम्हाला या उन्हाळ्यात उष्णतेवर मात करण्यास मदत करतील.”
  चंद्रभेदन प्राणायाम - सर्वात प्रभावी आसनांपैकी एक म्हणजे चंद्रभेदन प्राणायाम, ज्यामध्ये तुमची उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या. असे केल्याने तुमच्या मनाला शांती मिळते आणि त्याचबरोबर शरीराला थंड ठेवण्यासाठी खूप फायदा होतो. शीतकारी पद्धत - हा श्वासोच्छवासाचा व्यायाम केल्याने तुमच्या शरीराला त्वरित थंडावा मिळतो. यासाठी प्रथम दातखिळी मिठवून घ्या, त्यानंतर ओठ उघडा आणि तोंडातून दीर्घ श्वास घ्या. जसजशी हवा तुमच्या लाळ-थुंकीतून जाते, ती थंड होते आणि म्हणून ती तुमच्या शरीरात प्रवेश करते तेव्हा आतून थंड वाटतं. नंतर नाकातून श्वास सोडा. मात्र, हिवाळ्यात चुकूनही ही कृती करू नका. त्यामुळे हिवाळ्यात सर्दी-खोकलाचा त्रास होऊ शकतो. हे वाचा - 10 वर्षात लाखों भारतीय झालेत HIV पॉजिटिव, बचावासाठी या टिप्स नेहमी ध्यानात ठेवा व्हिज्युअलायझेशन ध्यान - हा योग करत असताना, तुम्हाला कल्पना करावी लागेल की, तुम्ही एखाद्या बर्फाळ जागेवर बसला आहात. बर्फाने आच्छादलेले पर्वत पाहून शरीराचे तापमान कमी होतं. मन एकाग्र होण्यासाठी थोडा वेळ लागतो, परंतु ते खूप फायद्याचे आहे. जेव्हा बाहेरील रंग प्रत्यक्षात सनी पिवळे असतात तेव्हा तुम्ही खोल निळ्या रंगाची कल्पना करण्याचा प्रयत्न देखील करू शकता. याचा चांगला परिणाम होतो. हे वाचा - व्यवस्थित पचन होत नाही? आयुर्वेदानुसार या छोट्या-छोट्या चुका आपण वेळीच सुधारा यासोबतच योगा ट्रेनर अंशुका परवानी यांनी उन्हाळ्याच्या काळात आपल्या रोजच्या आहारात पाणीयुक्त लिंबूवर्गीय फळे आणि भाज्यांचा समावेश करा, असा सल्ला दिला आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Alia Bhatt, Health, Summer, Yoga

  पुढील बातम्या