Home /News /lifestyle /

हवा प्रदूषणामुळं सायनसचा त्रास वाढलाय का? मग हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

हवा प्रदूषणामुळं सायनसचा त्रास वाढलाय का? मग हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

Home Remedies of Sinusitis: सायनस लवकर बरा होत नाही. नाकातून नेहमीच पाणी टपकत असते. नाक आणि डोळ्यांनाही सूज येते. नेहमी डोकेदुखी आणि चक्कर येते. ही अत्यंत अस्वस्थ करणारी स्थिती आहे.

    नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : सायनसमध्ये (Sinus) नाकातून पाण्यासारखा चिकट पदार्थ सतत बाहेर पडत राहतो. हेल्थलाइनच्या बातमीनुसार, सायनस हा प्रकार सर्दीसारखाच आहे; परंतु, सायनस लवकर बरा होत नाही. नाकातून नेहमीच पाणी टपकत असते. नाक आणि डोळ्यांनाही सूज येते. नेहमी डोकेदुखी आणि चक्कर येते. ही अत्यंत अस्वस्थ करणारी स्थिती आहे. सायनसला वैद्यकीय भाषेत सायनुसायटिस (Sinusitis) म्हणतात. या आजारात रुग्णाच्या नाकाचं हाड वाढतं. त्यामुळं सर्दी सतत राहते. सायनसच्या आजारामुळं होणारा त्रास थंडी आणि प्रदूषणात जास्त वाढतो. धुळीचे कण, धुकं आणि प्रदूषित हवा यामुळं सायनसच्या समस्या वाढू शकतात. थंडीचा त्रास होण्यासारखे पदार्थ आणि जीवनशैली टाळली तर अनेक वेळा हा आजार स्वतःच संपतो. पण ज्यांना हा त्रास बराच काळ असतो, त्यांना नाकाचं ऑपरेशन करावं लागतं. पण असे काही घरगुती उपाय देखील आहेत, ज्याच्या मदतीने सायनसची समस्या दूर केली जाऊ शकते. चला तर मग, जाणून घेऊया सायनससाठी कोणते घरगुती उपाय (Home Remedies of Sinusitis) केले जाऊ शकतात. वाफ घ्या आणि सायनसपासून मुक्त व्हा सायनसपासून मुक्त होण्यासाठी वाफ घेणं खूप प्रभावी आहे. वाफ घेतल्याने श्लेष्मा सैल होतो आणि छातीतील जडपणा दूर होतो. लक्षात ठेवा गरम पाणी नव्हे तर, वाफ घ्या. कापूर, मेन्थॉल किंवा निलगिरीचं तेल वाफेच्या यंत्रातील पाण्यात घालून त्याचीही वाफ घेता येते. यामुळं सर्दी, पडसं, सायनस आणि प्रदूषणापासून फुफ्फुसांचं संरक्षण होईल. निलगिरीच्या तेलाचे काही थेंब पाण्यात टाकल्यानं सर्दी आणि डोकेदुखीपासूनही आराम मिळेल. हे वाचा - Working Women : नोकरदार महिलांनी या 6 गोष्टी कराव्यातच; फार बीझी शेड्युल असलं तरी रहाल फिट चिकन सूप देखील फायदेशीर छातीत साठलेली सर्दी कमी करण्यासाठी चिकन सूप फायदेशीर असल्याचं अनेक अभ्यासात आढळून आलंय. एका अभ्यासात असं दिसून आलंय की, सायनसमुळं येणारी सूज कमी करण्यासाठी चिकन सूप खूप प्रभावी आहे. स्वतःला हायड्रेटेड ठेवा वाढत्या प्रदूषणामुळं सायनसच्या रुग्णांच्या समस्या वाढू शकतात, त्यामुळे सायनसच्या रुग्णांनी स्वत:ला हायड्रेट ठेवावं. नाकातून भरपूर पाणी येत असल्यानं शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. पाणी आणि द्रवपदार्थांचं सेवन केल्यानं द्रव श्लेष्मा पातळ होण्यास मदत होते आणि सायनसमधील त्रास कमी होतो. हे वाचा - IDBI Bank Recruitment: IDBI बँक मुंबई इथे 60 लाख रुपये प्रतिवर्षी पगाराची नोकरी; ‘या’ पदांसाठी करा अर्ज हळद आणि आलंदेखील गुणकारी अनेक अभ्यासात असं आढळून आलंय की, हळदीत असलेले अँटीऑक्सिडंटस अनेक रोगांशी लढण्यासाठी प्रभावी आहेत. याव्यतिरिक्त, हळदीमध्ये दाह-विरोधी गुणधर्मही आढळतात. त्यामुळं हळदीसोबत आल्याचं सेवन केल्यास सायनसच्या रुग्णांना खूप फायदा होतो. ताज्या आल्याच्या रसात 1 चमचा मध मिसळून दिवसातून 2 ते 3 वेळा घेतल्यास सायनसचा त्रास कमी होतो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Air pollution, Health Tips

    पुढील बातम्या