मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Adulsa in winter : हिवाळ्यात अडुळशाची पानं आहेत बहुगुणी; असा बनवा घरच्या-घरी काढा

Adulsa in winter : हिवाळ्यात अडुळशाची पानं आहेत बहुगुणी; असा बनवा घरच्या-घरी काढा

Health benefits of Adusa in winter: हिवाळ्यात काही लोकांना विविध कारणांमुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. त्यावेळी अडुऴशाच्या पानांचा काढा करून प्यायल्याने खूप आराम मिळतो. त्यामुळं श्लेष्मा पातळ होऊन बाहेर पडतो. अडुळसा श्वासोश्वाचा मार्ग मोकळा करतो. श्वसनमार्ग मोकळा झाल्यानं दम्याच्या रुग्णांना फायदा होतो.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर : भारतीय आयुर्वेदात अनेक घरगुती उपचार आहेत, ज्यातून अनेक प्रकारच्या आजारांवर उपचार करता येतात. यापैकी एक घरगुती उपाय म्हणजे अडुळशाची (Adusa) पानं. हिवाळ्यात अडुळशाच्या पानांचे अनेक फायदे आहेत. अडुळशाला देशात अनेक नावांनी ओळखले जाते. त्याला अडुस, अरुस, बाकस, बिरसोटा, रुसा, आरुषा असेही म्हणतात. त्याचे संस्कृतमध्ये नाव वासक किंवा वासा आहे. अडुळसाला इंग्रजीत मलबार नट म्हणतात. सर्दी-खोकला, हृदयविकार, रक्तासंबंधीचे आजार, तहान, श्‍वसनाचे आजार, ताप, कुष्ठरोग, टी.बी यांसारख्या आजारांवर अडुऴसा उपयोगी आहे. हिवाळ्यात काही लोकांना विविध कारणांमुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. त्यावेळी अडुऴशाच्या पानांचा काढा करून प्यायल्याने खूप आराम मिळतो. त्यामुळं श्लेष्मा पातळ होऊन बाहेर पडतो. अडुळसा श्वासोश्वाचा मार्ग मोकळा करतो ज्यामुळे श्वास घेण्याची हालचाल सुलभ होते. श्वसनमार्ग मोकळा झाल्यानं दम्याच्या रुग्णांना फायदा होतो. वेबएमडीच्या बातमीनुसार, अडुळशाचा वापर छातीत जडपणा किंवा रक्तसंचय कमी करण्यासाठी केला जातो. यामुळे श्वसनमार्गामधील सूज कमी (Health benefits of Adusa in winter) होते.

हिवाळ्यात अडुळशाच्या पानांचे फायदे

श्वासोच्छवासाच्या समस्या दूर करते - अडुळशाच्या पानांमध्ये वेसिन नावाचा घटक आढळतो. यामुळे श्वसनमार्ग चांगला राहतो. याशिवाय अडुळशामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म देखील आढळतात, ज्यामुळे श्वसनमार्गातील सूज कमी होते. यामुळे श्‍वसनमार्ग साफ होतो, ज्यामुळे श्‍वसनातील समस्या दूर होतात. याशिवाय घशातील संसर्ग, दमा, ब्राँकायटिस इत्यादी समस्या दूर करण्यातही अडुळसा उपयोगी आहे.

थंडी आणि सर्दीपासून आराम - हिवाळ्यात सर्दी-पडशाचा त्रास होऊ लागल्यास अडुळशाच्या पानांचा काढा बनवून त्याचा वापर केला जातो. अडुळशाचा काढा प्यायल्यानं गच्च झालेलं नाक लगेच रिकामं होतं. अडुळसा भरलेली छातीही कमी करते. साधारणपणे त्याची पाने पाण्यात उकळून त्याचा काढा बनवून सेवन केलं जातं.

हे वाचा - OMG! महिलेनं भल्यामोठ्या मगरीला मारली मिठी; अंगावर काटा आणणारा VIDEO

सूज कमी करते - अडुळशामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. यामुळेच विंडपाइपमधील सूज कमी करून श्वसनमार्गाची स्वच्छता करते. यामुळे श्वासासंबंधीचा त्रास दूर होतो.

रक्तदाब नियंत्रित- अडुळसा रक्तदाब संतुलित करण्यास मदत करू शकतो. अडुळसा हे रक्त शुद्ध करण्यासाठी देखील ओळखले जाते. यात अँटी-फायब्रिनोलिटिक गुणधर्म आहेत जे हार्ट ब्लॉकेज दूर करण्यास मदत करतात.

हे वाचा - दोन लाखांत Ambulanceचं केलं घर, आता नांदतात सौख्यभरे; पाहा PHOTOs

गुडघेदुखीपासून आराम- गुडघेदुखी आणि सूज कमी करण्यासाठी लोक अडुळशाचे सेवन करतात. सांधेदुखीतही ही औषधी वनस्पती म्हणून वापरली जाते. यामध्ये आढळणारे अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म सांधेदुखी, सूज कमी करण्यात उपयोगी आहे.

डोकेदुखी - अडुळशाच्या फुलामुळे डोकेदुखीपासून आराम मिळतो. यासाठी अडूसाचे फूल गुळात मिसळून खावे. यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळतो.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health Tips, Winter session