Home /News /lifestyle /

Insomnia : अंथरूणात पडल्या पडल्या झोप लागत नसेल तर काहीतरी बिघडलंय; तात्काळ करा हे उपाय

Insomnia : अंथरूणात पडल्या पडल्या झोप लागत नसेल तर काहीतरी बिघडलंय; तात्काळ करा हे उपाय

Tips to Avoid Insomnia : झोपेच्या कमतरतेमुळे आपला मेंदू नीट काम करू शकत नाही आणि त्याचे आरोग्यावर इतर गंभीर दुष्परिणाम होतात.

    नवी दिल्ली, 28 जानेवारी : माणसाला चोवीस तासात किमान सात ते आठ तासांची झोप (Sleep)  गरजेची असते. यापेक्षा कमी झोपेमुळे अनेक समस्या दिसू लागतात आणि वाढत्या वयाबरोबर ही समस्या आणखी वाढते. त्यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्याशी संबंधित समस्याही उद्भवू शकतात (Sleep problem). झोप न लागण्याची समस्या म्हणजे निद्रानाश (Tips to Avoid Insomnia). याची बरीच कारणे आहेत. पण याचे इतर परिणामही होऊ शकतात. नीट न झोप न मिळाल्याने शरीरात ऊर्जेची कमतरता जाणवते. यासोबतच पचनसंस्थेत बिघाड होण्याच्या समस्याही उद्भवू लागतात. याशिवाय, रात्री नीट झोप न लागल्यामुळे दिवसा आपल्या दैनंदिन कामांमध्ये लक्ष केंद्रीत करण्यात अडचण येऊ शकते. एकूणच झोपेच्या कमतरतेमुळे आपला मेंदू नीट काम करू शकत नाही. त्यामुळे झोप न लागण्याच्या त्रासावर उपाय करायला हवेत.  जाणून घेऊया अशा काही उपायांबद्दल ज्याद्वारे आपण झोप न येण्याच्या समस्येपासून आराम मिळवू शकतो. निद्रानाश टाळण्यासाठी काय करावे? (How to avoid insomnia) व्यायाम रोज चालण्याची आणि व्यायाम करण्याची सवय लावा. यामुळे तुम्हाला रात्री चांगली झोप लागते, परंतु रात्री कोणत्याही प्रकारचा व्यायाम करू नका. जंक फूड टाळा जंक-फूडच्या सेवनामुळे तुमची झोपही खराब होऊ शकते. त्यामुळे जास्त तळलेले पदार्थ आणि जंक फूड खाणे टाळावे. यामुळे तुम्हाला चांगली झोप लागेल. कॅफिन नको चहा किंवा कॉफी इत्यादी कॅफिनयुक्त गोष्टी तुमच्या डोळ्यांची झोप हिरावतात. त्यामुळे अशा पदार्थांचे सेवन करू नका. विशेषत: झोपण्याच्या एक किंवा दोन तास आधी या गोष्टी घेऊ नका. ही सवय तुम्हाला चांगली झोप घेण्यास मदत करेल. हे वाचा - Coconut Benefits: रात्री झोपण्यापूर्वी ओलं खोबरं खाण्याचे इतके फायदे तुम्हाला माहीत नसतील झोपण्यापूर्वी गॅजेट्सपासून दूर राहा तुमची झोप मोबाईल-लॅपटॉप किंवा इतर गॅजेट्समुळे खराब होऊ शकते. मोबाईल इत्यादींमधून निघणारा एक विशिष्ट प्रकारचा प्रकाश आपल्या डोळ्यांची झोप घालवतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी या गॅजेट्सपासून दूर राहा जेणेकरून आपल्याला चांगली झोप लागेल. अंधारी खोली, योग्य तापमान ठेवा प्रकाश आपल्याला जागृत राहण्याची प्रेरणा देत असतो. तसेच खोलीचे तापमान देखील यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे झोपण्यापूर्वी या गोष्टींची काळजी घ्या जेणेकरून तुम्हाला चांगली झोप लागेल. हे वाचा - Sleeping Tips: या वेळात तुम्ही पालथं झोपण्याची चूक करत नाही ना? कमी वयातच वयस्क दिसाल योग आणि ध्यान योग करत असताना, दीर्घ श्वास घ्या आणि ध्यान करा. केवळ श्वासावर लक्ष केंद्रित करणे चांगले. याला योगशास्त्रात विपश्यना म्हणतात. योग किंवा ध्यान आणि दीर्घ श्वास घेणे तुम्हाला चांगली झोप मिळवून देण्यासाठी खूप प्रभावी आहेत. म्हणून, चांगल्या झोपेसाठी योग आणि ध्यान यासारख्या गोष्टी करत रहा. (सूचना: येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Lifestyle, Sleep, Sleep benefits

    पुढील बातम्या