मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Green Tea : तुमचा ग्रीन टी असा बनवा अधिक हेल्दी; या 5 गोष्टी मिसळल्यानं दुप्पट होतील फायदे

Green Tea : तुमचा ग्रीन टी असा बनवा अधिक हेल्दी; या 5 गोष्टी मिसळल्यानं दुप्पट होतील फायदे

Add These Ingredients To Your Green tea : ग्रीन टी हे जगभरात लोकप्रिय पेय बनलं आहे. अनेकजण निरोगी (Healthy Drink) राहण्यासाठीच नव्हे तर वजन कमी करण्यासाठी देखील हा चहा पितात. यामध्ये एक विशेष अँटिऑक्सिडेंट असते, ज्यामुळं वजन कमी करण्यात खूप मदत मिळते.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर :  ग्रीन टी हे जगभरात लोकप्रिय पेय बनलं आहे. अनेकजण निरोगी (Healthy Drink) राहण्यासाठीच नव्हे तर वजन कमी करण्यासाठी देखील हा चहा पितात. यामध्ये एक विशेष अँटिऑक्सिडेंट असते, ज्यामुळं वजन कमी करण्यात खूप मदत मिळते. याशिवाय यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. हेल्थशॉटच्या बातमीनुसार, पोषक तत्वांव्यतिरिक्त त्यात भरपूर दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात, ज्यामुळं आपली चयापचय प्रक्रिया वाढते आणि त्वचा चमकदार होण्यासही मदत मिळते. तसंच ग्रीन टी प्यायल्यानं रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवता येते. इतके सगळे फायदे असलेल्या या चहामध्ये काही गोष्टींचा समावेश केला तर हा चहा आणखी फायदेशीर ठरू शकतो. चला तर मग जाणून घेऊया आपण आपला ग्रीन टी अधिक फायदेशीर कसा (Add These Ingredients To Your Green Tea And Get More Benefits) बनवू शकतो.

1. लिंबू वापरणे

ग्रीन टीमध्ये लिंबाचा रस मिसळून प्यायल्यास त्यामुळे ग्रीन टीचे अँटीऑक्सिडंट गुणधर्म वाढतात. त्यामुळं आपली त्वचा चांगली राहते, अनेक आजार दूर राहतात. याशिवाय अतिनील किरणांचे वाईट परिणाम देखील कमी होऊ शकतात.

२.आलं

जर तुम्ही तुमच्या ग्रीन टीमध्ये आल्याच्या रसाचे काही थेंब टाकले तर ते तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. आल्याचा रस ग्रीन टीची चव तर वाढवतोच, शिवाय कॅन्सरपासून बचाव करण्यासही मदत होते. याशिवाय, आपण हंगामी फ्लू इत्यादीपासून देखील सुरक्षित राहू शकतो.

3.स्टीव्हियाची पाने

ग्रीन टीमध्ये स्टीव्हियाची पाने उकळून रोज प्यायल्यास मधुमेह आणि हृदयविकार टाळता येऊ शकतात. वास्तविक, हे तुमच्या शरीरातील कॅलरीज कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

हे वाचा - हवा प्रदूषणामुळं सायनसचा त्रास वाढलाय का? मग हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

4. पुदिन्याची पाने

जर तुम्ही ग्रीन टीमध्ये पुदिन्याची पाने घातली तर ते तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करू शकते. त्यामुळे पचनक्रियाही सुधारते.

हे वाचा - पैशांसाठी काय पण! 24 कोटींच्या इन्शुरन्ससाठी ट्रेनखाली आला, हात-पायही तोडले; पण झालं काहीतरी भलतच

5.दालचिनी

ग्रीन टीमध्ये चिमूटभर दालचिनी पावडर टाकून प्यायल्यास जास्त वेळ भूक लागत नाही, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. याशिवाय तुमची रोगप्रतिकारशक्तीही वाढते.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती विविध स्त्रोतातून मिळवलेल्या सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Health Tips, Tea