मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Fruits for Weight Loss: वजन घटवण्यासाठी ही फळं कधीही ठरतात फायदेशीर; फॅटी झालेले असे होतील एकदम Fit

Fruits for Weight Loss: वजन घटवण्यासाठी ही फळं कधीही ठरतात फायदेशीर; फॅटी झालेले असे होतील एकदम Fit

Fruits for Weight Loss : येथे माहिती दिलेल्या फळांमध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असतं, ज्यामुळं वजन कमी होण्यास मदत होते. यामुळं मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, हृदयविकार होण्याची शक्यताही कमी होते.

Fruits for Weight Loss : येथे माहिती दिलेल्या फळांमध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असतं, ज्यामुळं वजन कमी होण्यास मदत होते. यामुळं मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, हृदयविकार होण्याची शक्यताही कमी होते.

Fruits for Weight Loss : येथे माहिती दिलेल्या फळांमध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असतं, ज्यामुळं वजन कमी होण्यास मदत होते. यामुळं मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, हृदयविकार होण्याची शक्यताही कमी होते.

नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी : कोरोना महामारीमुळं (Corona Pandemic) गेल्या दोन वर्षांपासून लोकांचं घराबाहेर पडणं लक्षणीयरीत्या कमी झालंय. जीममध्ये जाणं कमी झाल्यानं आधीपासून वर्कआऊट करणार्‍यांची सर्व मेहनत व्यर्थ गेली आहे. लोक घरी बसून सर्व कामं ऑनलाइन करत आहेत. त्यामुळं शारीरिक हालचाली नगण्य झाल्या आहेत. घरात बसून लोक कधीही काहीही खातात. अनेकजण Binge Eating चे बळी ठरले आहेत. यामुळं साहजिकच लठ्ठपणा वाढत आहे. त्यामुळं वजन आटोक्यात ठेवण्यासाठी टेरेसवर जा, बागेत जाऊन धावण्याचा व्यायाम करा, जॉगिंग करा. तुम्ही जितकं जास्त चालाल आणि धावाल तितक्या वेगाने तुमच्या शरीरातील कॅलरीज बर्न होतील. यासोबतच, काही फळांचा (Fruits for weight loss) नियमित आहारात समावेश करा. हेल्थलाइनच्या बातमीनुसार, काही फळांमध्ये वजन कमी करण्याचे गुणधर्म असतात. त्यात भरपूर जीवनसत्त्वं, फायबरसह इतर अनेक पोषक घटक असतात, जे वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त (Fruits for Weight Loss) ठरू शकतात.

फळांमध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असतं, ज्यामुळं वजन कमी होण्यास मदत होते. यामुळं मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, हृदयविकार होण्याची शक्यताही कमी होते.

सफरचंद

असं म्हणतात की, रोज एक सफरचंद खाल्ल्यानं तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची गरज भासणार नाही. सफरचंदात कॅलरीजचं प्रमाणही खूप कमी असतं आणि फायबरही खूप जास्त असतं. सफरचंद वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असल्याचंही अनेक अभ्यासांमध्ये आढळून आलंय. एका अभ्यासात, महिलांच्या तीन गटांना 10 आठवड्यांसाठी दररोज तीन सफरचंद, तीन नासपती आणि तीन ओट कुकीज देण्यात आल्या. ज्या गटानं सफरचंद खाल्लं त्यांचं वजन 2 पौंड (0.91 किलो) कमी झालं, नासपती खाणार्‍या गटातील महिलांचं वजन 1.6 पौंड (0.84 किलो) कमी झालं. परंतु, ज्या महिलांनी ओट कुकीज खाल्ले त्यांचं वजन अजिबात कमी झाले नाही.

टरबूज

वजन कमी करायचं असेल तर, उन्हाळ्यात भरपूर टरबूज खा. कॅनटालूप, टरबूज यांसारख्या फळांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि कॅलरीज खूप कमी असतात. हे वजन कमी करण्यास मदत करतात. या फळांमध्ये भरपूर फायबर, अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन, लायकोपीन आदी घटक असतात. याच्यामुळं उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही.

पपई

पपई हे एक आरोग्यदायी फळ आहे, ज्यामध्ये भरपूर फायबर असतं. पोटासाठी हे सर्वात फायदेशीर फळ मानलं जातं. पपई खाल्ल्यानं वजनही कमी होतं. त्यात कॅलरीज कमी असतात. रोज पपई खाल्ल्यानं चयापचय वाढतो.

हे वाचा - Relationship Tips: अति काळजी करणंही बरं नव्हं; चांगल्या नात्यांवर असा होत जातो परिणाम

आंबट-तुरट-गोड चवीची फळं

आंबट-तुरट-गोड चवीच्या फळांमध्ये काही घटक असतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात. या फळांमध्ये कॅलरीज आणि इतर अनेक पोषक तत्त्वं असतात. एक कप स्ट्रॉबेरीमध्ये फक्त 50 कॅलरीज असतात. तसंच आहारातील फायबर, व्हिटॅमिन सी, मॅंगनीज देखील मिळतं. ही फळं खाल्ल्यानं उच्च कोलेस्ट्रॉल पातळी, उच्च रक्तदाब, जळजळ या समस्या कमी होतात. हे आजार असलेल्या लोकांना स्थूलपणा कमी करण्यासाठी विविध समस्यांचा सामना करावा लागतो. तेव्हा ही फळं नक्की खा.

हे वाचा - Sprouted garlic: लसणाला कोंब आले म्हणून लगेच फेकू नका; आरोग्यासाठी त्याचे आहेत दुप्पट फायदे

संत्री

इतर लिंबूवर्गीय फळांच्या तुलनेत संत्र्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण खूपच कमी असतं. यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबरचं प्रमाण जास्त असतं. हे फळ खाल्ल्यानं लठ्ठपणा कमी करण्यास मदत होते. यांचं सेवन केल्यानं पोट बराच काळ भरलेलं राहतं. संत्र्याचा ज्यूस पिण्याऐवजी थेट संत्री खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं.

(सूचना: येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Weight, Weight loss tips