Home /News /lifestyle /

Sleep Tips: रात्री शांत, आरामदायी झोप हवी आहे ना? अंथरुणावर जाण्यापूर्वी नक्की खा या 5 गोष्टी

Sleep Tips: रात्री शांत, आरामदायी झोप हवी आहे ना? अंथरुणावर जाण्यापूर्वी नक्की खा या 5 गोष्टी

Best Foods For Sound Sleep: रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही जे काही खाता-पिता त्याचाही झोपेवर परिणाम होतो. गाढ झोप (Sound sleep) न येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. उदा. तणाव, चिंता किंवा कोणतीही शारीरिक समस्या.

    नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी : रात्रीची शांत झोप प्रत्येकाला हवी असते. यामुळं दिवसभर काम करण्याचा उत्साह राहतो आणि आरोग्यही चांगलं राहतं. मात्र, जर रात्री चांगली झोप येत नसेल आणि रात्रभर अंथरुणावर कूस बदलत राहण्याची वेळ येत असेल, तर यामागे अनेक कारणं (Best Foods For Sound Sleep) असू शकतात. गाढ झोप (Sound sleep) न येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. उदा. तणाव, चिंता किंवा कोणतीही शारीरिक समस्या. अनेक वेळा चांगल्या आरोग्यासाठी अयोग्य जीवनशैलीचं अवलंब केल्यानंही चांगली झोप येत नाही. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही जे काही खाता-पिता त्याचाही झोपेवर परिणाम होतो. काही लोकांना झोपण्यापूर्वी कॉफी पिण्याची सवय असते. याचाही झोपेवर परिणाम होतो. तसंच रात्री 1 ते 2 वाजेपर्यंत जागून काम करणं, लॅपटॉप, मोबाईल चालवणं याचाही झोपेवर परिणाम होतो. एकूणच आरोग्यासाठी नियमित झोप पद्धत खूप महत्त्वाची आहे. यामुळं शरीरातील ऊर्जा पातळी वाढते आणि तणाव कमी होतो. काही पदार्थांचं सेवन करूनही तुम्ही निद्रानाशाच्या समस्येवर मात करू शकता. इंडियन स्पायनल इंज्युरीज (वसंत कुंज, नवी दिल्ली) च्या वरिष्ठ आहारतज्ज्ञ कम एफएसटीएल हिमांशी शर्मा यांनी सांगितलं की, रात्री जेवण आणि झोपण्याच्या दरम्यान एक तास तरी जाऊ देणं आवश्यक आहे. यामुळं झोप चांगली होऊ शकते. गरम दूध प्या रात्री गाढ झोपण्यासाठी कोमट दूध पिणं चांगलं मानलं जातं. चांगल्या झोपेसाठी हे उत्तम पेय आहे. तुम्ही हळद, वेलची पावडर, बदाम एकत्र करून दुधात घालून पिऊ शकता. यामुळं चव सुधारते आणि हे आरोग्यदायी देखील आहे. रात्री कोमट दूध प्यायल्यानं चांगलं आरोग्य आणि चांगली झोप मिळते. डार्क चॉकलेट जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर, तुम्ही डार्क चॉकलेट खाऊ शकता. मात्र, त्याचं जास्त सेवन करू नये, याची काळजी घ्या. एका दिवसासाठी एक लहान तुकडा पुरेसा आहे. मात्र, शांत झोपेसाठी फक्त गडद चॉकलेटवर अवलंबून राहू नका. जास्त प्रमाणात आणि वारंवार डार्क चॉकलेट खाल्ल्यानं तुमच्या आरोग्याला हानी होऊ शकते. सुका मेवा दररोज झोपण्यापूर्वी 5 ते 6 बदाम, 1 अक्रोड आणि मूठभर मखना हे चांगल्या झोपेसाठी उत्तम मानले जातात. कारण, त्यात झिंक, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम सारखी आवश्यक खनिजे असतात. मात्र, त्यांचं सेवन मर्यादित प्रमाणात करा. 10-15 बदाम किंवा 5 अक्रोड खाणं टाळावं. हे वाचा - Good Night Tips: तुम्हालाही रात्री लवकर झोपच लागत नाही का? वेळेवर झोप येण्यासाठी या गोष्टी करा ट्राय फळं खा रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही चेरी, बेरी, किवी, केळी, अंजीर इत्यादी खाऊ शकता. यामुळं झोप न येण्याची समस्या दूर होते. त्यामध्ये अशी काही पोषक तत्त्वं असतात, ज्यांच्यामुळं झोप सुधारते. ओट्स, चिया सीडस् एकत्र शिजवून खाल्ल्यानं चांगली झोप येईल. हर्बल चहा काही लोकांना रात्री चहा, कॉफी पिऊन झोपण्याची सवय असते, जर तुम्ही असं करत असाल तर ही सवय बदला. त्याऐवजी झोपण्यापूर्वी एक कप हर्बल चहा प्या. त्यामुळं शांत झोप येईल. हे वाचा - Why Men Sleep After Romance: पुरुषांना सेक्सनंतर लगेच झोप का लागते? त्यापाठीमागील काय आहे सायन्स झोपेवर विपरीत परिणाम करणाऱ्या वाईट सवयी चांगल्या झोपेसाठी दिनचर्येकडं देखील लक्ष द्या. रात्री उशिरापर्यंत जागी राहण्याची सवय सोडून द्या. अल्कोहोल, धूम्रपान, कॅफिन आणि जंक फूड, प्रक्रिया केलेलं अन्न खाऊ नका. रात्री उशिरा जेवण्याची सवय असल्यास ती सुधारा. उशिरा जेवून लगेच झोपायला गेल्यास अन्न लवकर पचत नाही. यामुळं अ‌ॅसिड रिफ्लक्सचा धोका वाढतो. जास्त मसालेदार आणि चरबीयुक्त अन्न खाऊ नका. (सूचना: येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Sleep, Sleep benefits

    पुढील बातम्या