नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी : आजकाल बहुतेक लोक वजन वाढण्याच्या त्रासाला वैतागले आहेत. याचे कारण म्हणजे घरात एकाच ठिकाणी बसून काम करत राहणं. व्यायाम न करणं, खाण्याच्या चुकीच्या सवयी इ. वजन कमी करण्यासाठी तुम्ही अनेक युक्त्या वापरल्या असतील, पण फारसा फायदा झाला नसेल तर काळजी करू नका, एक्यूप्रेशर (Acupressure) थेरपी करून पाहा. यामुळे तुम्ही घरबसल्या तुम्ही वजन झपाट्यानं कमी करू शकता. एक्यूप्रेशर ही एक प्राचीन चिनी उपचार पद्धत आहे, ज्यामध्ये शरीराच्या काही विशिष्ट बिंदूंवर दाब टाकला जातो. शरीरातील हे एक्यूप्रेशर पॉइंट्स (Acupressure points) दाबण्याचे अनेक फायदे आहेत. यासोबतच ही थेरपी अनेक प्रकारच्या मानसिक समस्याही कमी करते. एक्यूप्रेशरने वजन कसे कमी होते आणि शरीराच्या कोणत्या बिंदूंवर दबाव टाकून वजन झपाट्याने कमी करता येते ते जाणून (Acupressure for Weight Loss) घेऊ या.
वजन कमी करण्यासाठी एक्यूप्रेशरचे फायदे
हेल्थलाइनच्या मते, एक्यूप्रेशरचे अनेक फायदे आहेत, त्यामुळं तणाव कमी होतो. पचनाला चालना मिळते. चयापचय स्थिर होते. तसेच वजन कमी करण्यास मदत होते. काही प्रेशर पॉईंटस भूक आणि रक्तातील साखरेच्या पातळीवर देखील परिणाम करतात. जेव्हा तुम्ही तुमच्या बोटांनी शरीराच्या काही प्रेशर प्वाइंट्स दाबल्यास चयापचय वाढते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. मात्र, हे देखील लक्षात ठेवायला हवं की एक्यूप्रेशर ही केवळ वजन कमी करण्यासाठी पूरक उपचार आहे. हे व्यायाम, सकस आहारासाठी पर्याय म्हणून वापरले जाऊ शकत नाही.
renzong रेन्जोंग प्वाइंट
renzong हा प्रेशर पॉईंटस वरच्या ओठ (Upper lip) आणि नाक (Phitrum) दरम्यान स्थित आहे. असं मानलं जातं की हा पॉईंट दाबून, वजन कमी केलं जाऊ शकतं. वजन कमी करण्यासाठी, रेन्झोंग पॉइंटवर एक बोट ठेवा. बोटाने बिंदूवर थोडासा दाब द्या. आता त्याच बिंदूला 2-3 मिनिटे मसाज करण्यासाठी बोट गोलाकार हालचालीत हलवा. ही क्रिया चयापचय उत्तेजित करते.
हे वाचा - Tips to Reduce Belly Fat: ताबडतोब बदलायला हव्यात या सवयी; वजन कमी होण्याऐवजी वाढतंच राहतं
जुहाई Xuehai पॉइंट
Xuehai पॉइंट मांडीच्या स्नायूंच्या खालच्या भागात, गुडघ्याच्या वाटीच्या वर, शरीराच्या मध्यभागापासून सुमारे 2 इंचावर असतो. या पॉईंटला मसाज करण्यासाठी तुमची दोन बोटे जुहाई पॉइंटवर ठेवा. दोन्ही बोटांनी, पॉइंटवर हलका दाब द्या आणि 2 मिनिटे गोलाकार हालचालीत फिरवा. दुसऱ्या बाजूनेही हेच करा. रक्तातील साखरेच्या नियंत्रणासाठी या बिंदूवर दाब द्यावा.
अंगठ्याचा बिंदू
तुमच्या हातांचे तळवे आणि बोटांमध्ये अनेक अॅक्युप्रेशर पॉइंट्स आहेत. ते शरीराच्या अनेक समस्या दूर करू शकतात. अंगठ्याच्या खालच्या भागावर एक दाब बिंदू देखील आहे, जेथे दाब दिल्यानं थायरॉईड ग्रंथी उत्तेजित होते. यामुळं चयापचय वाढतो. अंगठ्याचा हा भाग दररोज 2 मिनिटं दाबल्यास वजन कमी करता येतं.
हे वाचा - वजन कमी करण्यासाठी इडली-डोसा बेस्ट! साउथ इंडियन Low कॅलरी पदार्थांचा डाएटिशियन का देतात सल्ला?
अॅक्युप्रेशरनं खरोखर वजन कमी होतं का?
वजन कमी करण्यासाठी तुम्हाला खालील व्यायाम, कसरत, वजन कमी करण्याच्या आहारासोबत अॅक्युप्रेशर वापरायचं असेल तर सर्वप्रथम तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. याच्या मदतीनं तुम्हाला या शरीराच्या बिंदूंवर कुठे, कसा दाब द्यायचा, याची योग्य माहिती मिळेल, जेणेकरून नुकसान होण्याऐवजी फायदा होईल. सध्या, वजन कमी करण्यासाठी अॅक्युप्रेशर किती प्रभावी आहे, यावर अजून संशोधन व्हायचं आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Weight, Weight loss