Home /News /lifestyle /

घरीच वर्कआउट करत असाल तर ही 5 गॅजेट्स आहेत बेस्ट; उत्साह पण वाढेल डेटाही मिळेल

घरीच वर्कआउट करत असाल तर ही 5 गॅजेट्स आहेत बेस्ट; उत्साह पण वाढेल डेटाही मिळेल

त्यामुळे आपण अधिक चांगला वर्कआउट करण्यास प्रवृत्त होतो. जाणून घेऊया कोणते फिटनेस गॅजेट्स आपला वर्कआउट अधिक सुलभ करण्यात मदत करू शकतात आणि त्याचा कसा फायदा होतो.

    मुंबई, 17 जून : निरोगी राहणे प्रत्येकासाठी महत्वाचे आहे. जर तुम्ही तंदुरुस्त असाल आणि दररोज वर्कआउट करत असाल तर तुमचे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतील. सहसा लोकांना व्यायामशाळेत व्यायाम करायला आवडते परंतु असे बरेच लोक आहेत ज्यांना जिममध्ये जाण्यासाठी वेळ नसतो आणि ते घरी किंवा उद्यानात व्यायाम करतात. असे लोक फिटनेस गॅजेट्सचा भरपूर वापर करत आहेत. मार्केटमध्ये अनेक प्रकारचे फिटनेस गॅझेट्स आहेत, जे आपल्याला वर्कआउट प्रभावी बनवण्यात आणि बॉडी ट्रान्सफॉर्मेशनमध्ये खूप मदत करू शकतात. अशी अनेक गॅजेट्स आहेत जी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन दैनंदिन अ‌ॅक्टिविटीजची मोजणी करतात आणि डेटा तयार (fitness gadgets for workout from home) करतात. हे आपल्या फिटनेस अहवालाप्रमाणे आहे, त्यामुळे आपण अधिक चांगला वर्कआउट करण्यास प्रवृत्त होतो. जाणून घेऊया कोणते फिटनेस गॅजेट्स तुमचा वर्कआउट अधिक सुलभ करण्यात मदत करू शकतात. वर्कआउटसाठी या फिटनेस गॅझेट्सचा वापर करा स्मार्ट वॉच - आजकाल लोकांना स्मार्ट वॉच घालायला आवडते. हे तुमचे दैनंदिन वर्कआउट्स आणि स्टेप्स मोजते आणि त्यांचे विश्लेषण करते आणि डेटा जनरेट करते. हा डेटा तुमच्या फोनशी ब्लूटूथच्या मदतीने कनेक्ट केला जाऊ शकतो, जो तुम्ही कधीही पाहू शकता. आपली व्यायामातील वाढ आणि व्यायामाची उद्दिष्टे, हृदयाचे ठोके, हृदय गती, ऑक्सिजन पातळी इत्यादी गोष्टींचा नियोजनबद्धरित्या मागोवा घेता येतो. पोर्टेबल ट्रेडमिल - जर तुम्हाला जिममध्ये व्यायाम करायचा नसेल तर तुम्ही घरच्या घरी पोर्टेबल ट्रेडमिल वापरू शकता. त्याच्या मदतीने तुम्ही जॉगिंग आणि चालण्याच्या क्रिया करू शकता. वजन कमी करण्याचा आणि कॅलरी बर्न करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग ठरू शकतो. केटलबेल - चरबी जाळण्यासाठी आणि कमकुवत मसल्ससाठी आपण केटलबेल वापरू शकता. ओवरऑल स्ट्रेंथ, कोर पॉवर, फ्लेक्सिबिलिटी सुधारण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे. हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा स्किपिंग रोप - स्किपिंग रोप हे एक स्वस्त आणि उपयुक्त गॅझेट आहे. कार्डिओ वर्कआउटसाठी हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. सध्या बाजारात एक स्मार्ट जंप रोप देखील उपलब्ध आहे, जो स्मार्ट घड्याळाप्रमाणे काम करतो आणि आपला वर्कआउट डेटा, जंप काउंट आणि बर्न झालेल्या कॅलरीजचा डेटा तयार करत राहतो. हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर टम्मी ट्विस्टर - या छोट्या दिसणार्‍या टमी ट्विस्टरच्या मदतीने आपण स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकता. या कमी किमतीच्या फिटनेस गॅझेटमुळे अतिरिक्त चरबी कमी करता येते आणि परफेक्ट फिगर बनवता येते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या