मुंबर्ई, 20 जून : दिवसभर मन प्रसन्न आणि शरीरयंत्रणा कार्यक्षम ठेवण्यासाठी सकाळी ब्रेकफास्ट म्हणजेच नाश्ता करणं आवश्यक असतं. साधारणपणे प्रत्येक व्यक्ती दिवसभरात 3-4 वेळा काही ना काही खात असते, ज्या माध्यमातून शरीरातील पोषक तत्वे आणि एनर्जी टिकून राहतात. मात्र सकाळचा नाश्ता हा आपल्या शरीरासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचा ठरतो. सकाळच्या ब्रेकफास्टमधून आपल्याला दिवसभर काम करण्यासाठी उर्जा मिळते. म्हणूनच सकाळचा नाश्ता हा कधीही टाळू नये. अन्यथा त्याचे अनेक दुष्परिणाम संभवतात. अनेक आजारांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो.
1 - जे लोकं सकाळचा नाश्ता करत नाहीत त्यांना टाईप 2 डायबेटीस होण्याची शक्यता बळावते. सकाळचा नाश्ता टाळल्याने हृदयासंबंधी तक्रारीही उद्भवतात.
प्रक्रिया केलेले पदार्थ खाताय? मग आहे खूपच धोकादायक कारण...
2 - सकाळी नाश्ता न केल्याने शरीरातली साखरेची पातळी कमी होते आणि डोकेदुखीचा त्रास सुरू होतो.
3 - दुभारचं जेवण पोटभर तुम्ही घेत असाल, पण जर तुम्ही सकाळच्या ब्रेकफास्टकडे दुर्लक्ष केलं तर दिवसभर तुम्हाला सुस्ती आणि थकवा जाणवतो. शरीराला दिवसभर लागणाऱ्या उर्जेसाठी पोषक तत्व आवश्यक असतात जी तुम्हाला ब्रेकफास्टमधून मिळतात. पण तुम्ही नाश्ता केलाच नाही तर पोषक तत्वांच्या आभावी दिवसभर थकवा जाणवतो.
4 - अनेकजण सकाळचा नाश्ता टाळून भरपूर जेवण करतात. मात्र, असं केल्याने तुमच्या शरीरातील कॅलरीजचं प्रमाण वाढतं आणि शरीरात अतिरिक्त चरबी जमा होते, जी लठ्ठपणासाठी कारणीभूत ठरते.
पचनक्रिया बिघडू नये म्हणून अशी घ्या काळजी; उपयुक्त आहेत 'या' 7 टिप्स
5 - सकाळी ब्रेकफास्ट न केल्याने शरीरातील सेल्स डॅमेज होतात. ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होते, आणि विविध रोगांचा धोका वाढतो. म्हणून रोज सकाळी नाश्ता केला तर तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि तुम्ही निरोगी राहता.