कधी मिळणार मेड इन इंडिया कोरोना लस? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्यसभेत दिलं उत्तर

कधी मिळणार मेड इन इंडिया कोरोना लस? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्यसभेत दिलं उत्तर

भारताच्या कोरोना लशीबाबत (India corona vaccine) केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन (health minister Dr Harsh Vardhan) यांनी राज्यसभेत सविस्तर माहिती दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 17 सप्टेंबर : भारतानेही कोरोनाविरोधातील लस (India corona vaccine) तयार करून त्याचं ट्रायल सुरू केलं आहे, मात्र ही कोरोना लस कधी मिळणार याची उत्सुकता प्रत्येकाला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन (health minister Dr Harsh Vardhan) यांनी राज्यसभेत याचं उत्तर दिलं आहे. 2021 वर्षाच्या सुरुवातीला भारताला कोरोनाची लस उपलब्ध होईल, असं त्यांनी सांगितलं आहे.

आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोना महासाथीची देशातील सद्य परिस्थिती, त्यावरील उपचार आणि लशींबाबत राज्यसभेत सविस्तर माहिती दिली. त्यांनी याबाबत निवेदन सादर केलं.

डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, जगभरात जसे कोरोनाची लस तयार करण्यासाठी प्रयत्न होत आहेत, तसंच भारतातही सुरू आहे. भारतातील तीन लशी क्लिनिकल ट्रायलच्या  वेगवेगळ्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञांची एक समिती याचा अभ्यास करत आहे. प्रगत टप्प्यातील नियोजन केलं जात आहे.  पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच भारतात लस उपलब्ध होऊ शकेल अशी आशा आम्हाला आहे. यासाठी आम्ही जागतिक आरोग्य संघटना आणि लशीसाठी प्रयत्न करणाऱ्या संस्थांच्याही संपर्कात आहोत.

हे वाचा - Covid संसर्गाच्या गतीत मोठी वाढ; 39 दिवसांत 2 वरून रुग्णसंख्या 3 कोटींच्या पार

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या नवीन आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांत 97 हजार 894 लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. देशातील कोरोनाचा आतापर्यंतचा आकडा 50 लाख पार झाला असून 51 लाख 18 हजार 254 रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे 24 तासांत 1 हजार 132 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांचा आकडा 83 हजार 198 वर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनातून बरे झालेल्या लोकांची संख्याही 40 लाखांहून अधिक आहे. आतापर्यंत 40 लाख 25 हजार 80 रुण बरे झाले असून बुधवारी विक्रमी 82 हजार 922 लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. देशात सध्या 10 लाख 9 हजार 976 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हे वाचा - Coronavirus : भारतात कोरोनाची दुसरी लाट येणार? जाणून घ्या सत्य

सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते असा अंदाजही अनेकांनी व्यक्त केला आहे. साधारण दर दिवसाला कोरोनाचे 85 ते 95 च्या आसपास नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.

Published by: Priya Lad
First published: September 17, 2020, 5:20 PM IST

ताज्या बातम्या