कंबरेचा घेर कमी करण्यासाठी फार उपयुक्त आहे 'हे' आसन

कंबरेचा घेर कमी करण्यासाठी फार उपयुक्त आहे 'हे' आसन

हे आसन करताना शरीराची स्थिती ही हनुमानाप्रमाणे होते

  • Share this:

मुंबई, 13 जून : महावीरासन हे एक दंडस्थितीतील आसन आहे. हे आसन करताना शरीराची स्थिती ही हनुमानाप्रमाणे होत असल्यामुळे या आसनाला महावीरासन म्हटलं जातं.

कृती - आधी सरळ दंड स्थितीत उभं रहावं. पूर्ण श्‍वास घेतल्यानंतर तो रोखून डावा किंवा उजवा पाय जेवढा जास्त लांब टाकता येईल तेवढा टाकावा. त्यानंतर दोन्ही हातांच्या मुठी बंद करून हात वर न्यावेत. फार मोठे वजन उचलत असल्याची स्थिती वाटायला हवी. एकदा डावा पाय पुढे घेऊन आणि नंतर उजवा पाय पुढे घेऊन हे आसन करावं.

(वाचा: stretch marks ची समस्या यामुळे होईल दूर)

लाभ - महावीरासन जर भरभर केलं तर त्याचा फायदा अधिक होतो. या आसनामुळे उंची वाढायला मदत होते. हात पाय बळकट होतात. महावीरासनामुळे कंबरेला ताण बसतो आणि कंबरेभोवतीचे सर्व स्नायू लवचिक बनतात. कमरेची चरबी कमी होते. परिणामी तुमची कार्यक्षमता वाढते. पोट साफ आणि हलकं होतं. छाती भरदार होते. शरीर तेजस्वी आणि मजबूत बनतं. प्रकृती उत्तम राखण्यासाठी महावीरासन नियमित करावं.

(वाचा: मन आणि मेंदू शांत ठेवतात 'ही' योगासने)

हाताच्या पंजांच्या मुठी आवळल्यामुळे बोटांचे कार्य सुधारतं. तेथील स्नायू आणि हाडांना बळकटी येते. आसनस्थिती घेतल्यानंतर श्‍वास घेऊ नये आणि सोडूही नये म्हणजेच श्‍वास रोखून कुंभक करावे. आसन सोडताना श्‍वास सोडत नेहमीचे संथ श्‍वसन करावे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: health
First Published: Jun 14, 2019 06:18 AM IST

ताज्या बातम्या