Home /News /lifestyle /

तरुणांची सेक्सपेक्षा व्हिडिओ गेमला अधिक पसंती; संशोधनातून माहिती आली समोर

तरुणांची सेक्सपेक्षा व्हिडिओ गेमला अधिक पसंती; संशोधनातून माहिती आली समोर

तरुण वयात स्त्री-पुरुषांचा ओढा सेक्सकडे अधिक असतो, हे सार्वत्रिक सत्य आहे; पण अलीकडच्या काळात मात्र यात बदल झाल्याचा निष्कर्ष एका संशोधनातून पुढं आला आहे.

न्युयॉर्क, 11 मार्च:  तरुण वयात स्त्री-पुरुषांचा ओढा सेक्सकडे (Sex) अधिक असतो, हे सार्वत्रिक सत्य आहे; पण अलीकडच्या काळात मात्र यात बदल झाल्याचा निष्कर्ष एका संशोधनातून पुढं आला आहे. अमेरिकेत करण्यात आलेल्या एका अभ्यासात तरुण मुलं सेक्सऐवजी व्हिडिओ गेमला (Video Game) अधिक प्राधान्य देत असल्याचं आढळलं आहे. व्हिडिओ गेम खेळण्यासाठी ते सेक्स सोडून देऊ शकतात, असं निरीक्षण या अभ्यासात नोंदवण्यात आलं आहे. द टेलीग्राफनं (The Telegraph) दिलेल्या वृत्तानुसार, 2000 तरुण स्त्री आणि पुरुष यांचा या अभ्यासात समावेश होता. गेल्या वर्षात ज्यांनी लैंगिक प्रेमसंबंध ठेवले नाहीत अशांचे प्रमाण 11.7 टक्क्यांवरून 15.2 टक्क्यांवर गेलं असून, यात 18 ते 24 वर्षे वयोगटातील पुरुषांची (Men) संख्या 18.9 टक्क्यांवरून वाढून 30.9 टक्क्यांवर गेली आहे. स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क (State University of New York) आणि रूटजर्स युनिव्हर्सिटीच्या (Rutgers University) संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. महिलांमध्ये (Women) लैंगिक संबंधात घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे मद्यपान (Drinking) असल्याचं आढळून आलं आहे, तर पुरुषांमध्ये मद्यपानापाठोपाठ गेमिंगमुळं (Gaming) त्यांच्या सेक्स लाईफवर परिणाम झाल्याचं स्पष्ट झालं आहे. दहा टक्के तरुण मुले-मुली अद्याप त्यांच्या पालकांसोबत राहत आहेत, हे देखील यामागचे एक कारण असल्याचं या अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे. (हे वाचा: Explainer: काय आहे Maternity Benefit Act? मातृत्व रजेचे फायदे काय जाणून घ्या) समाजाचे ‘पोर्नोग्राफिजेशन’ (Pornographisation) होत असून, ऑनलाइन पोर्नोग्राफीमुळं (Pornography) लोकांच्या लैंगिक संबंधांवर मोठा परिणाम होत असण्याची शक्यता आहे, याकडेही न्यूकॅसल युनिव्हर्सिटीच्या (New Castle University) आरोग्य आणि सामाजिक इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक सायमन फॉरेस्ट यांनी लक्ष वेधलं. तरुण मुलं आई-वडिलांसह राहत असतील आणि आर्थिकदृष्ट्या त्यांच्यावर अवलंबून असतील तर याचाही त्यांच्या सेक्स लाईफवर परिणाम होतो. स्वातंत्र्याचा अभाव हे या बाबतीतले खूप महत्वाचे कारण आहे, असं मत फॉरेस्ट यांनी व्यक्त केलं. व्हिडिओ गेममुळे भारतातही तरुणाई मैदानांपासून दूर गेली आहे. सध्या भारतातील मुलेही मैदानावर खेळण्याऐवजी घरी बसून व्हिडिओ गेम खेळायला प्राधान्य देतात. व्हिडिओ गेममधील विश्वात रहावं आणि तसंच आपलं आयुष्य असावा अशीही अनेकांची इच्छा असते. भारतातील इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे पॉर्नोग्राफीचंही प्रमाण बरंच वाढलं असून, त्याचेही दुष्परिणाम समाजात दिसत आहेत. स्रीकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन वाढत आहे. या निरीक्षणांबाबत संशोधनावर आधारित पुरावे मात्र उपलब्ध नाहीत.
First published:

Tags: Health, International, Sex, Sexual health, Sexual wellness

पुढील बातम्या