किचन सिंक बाहेरच्यांना दाखवायची लाज वाटते? चमकदार करायचा 'हा' आहे प्रभावी उपाय

किचन सिंक बाहेरच्यांना दाखवायची लाज वाटते? चमकदार करायचा 'हा' आहे प्रभावी उपाय

भांडी धुतल्यानंतर पाणी टाकल्याने सिंक स्वच्छ होतं असा जर तुमचा समज असेल तर तो साफ चुकीचा आहे

  • Share this:

मुंबई, 8 मे : स्वयंपाक घरात सगळ्यात महत्त्वाचा भाग असलेल्या किचन सिंकची नियमित स्वच्छता होणे आवश्यक आहे. अस्वच्छतेमुळे सिंकमध्ये अनेक जीवाणू आणि कीटक जमा होतात. या घाणीमुळे घरातल्या सदस्यांना अनेक प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे किचन सिंकच्या अस्वच्छतेकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करता कामा नये.

सिंकमध्ये जास्तवेळ भांडी ठेऊ नका - किचनमधलं सिंक नेहमी रिकामं ठेवण्याचा प्रयत्न करा. स्वयंपाकादरम्यान आणि नंतर वापरलेले भांडे ताबडतोब स्वच्छ करा. अनेकजणांच्या सिंकमध्ये तासं-तास भांडी पडेलाली असतात. त्यामुळे तयार झालेल जीवाणू सिंकमध्ये ठेवलेल्या भांड्यावर आक्रमण कराता. असं होऊ नये म्हणून तुम्हाला स्वच्छता बाळगावीच लागेल.

जागतिक पोहे दिवस : जगात सगळ्यात झटपट तयार करता येतो 'हा' पदार्थ

दररोज स्वच्छता बाळगा - किचनमधलं सिंक दररोज स्वच्छ ठेवण्याचा तुम्ही निश्चय करायला हवा. भांडी धुतल्यानंतर पाणी टाकल्याने सिंक स्वच्छ होतं असा जर तुमचा समज असेल तर तो साफ चुकीचा आहे. फक्त पाणी टाकल्याने सिंकमधले जीवाणू मरत नाहीत. यासाठी तुम्हाला दररोज आणि वेळोवेळी सिंक स्वच्छ करणं आवश्यक आहे. ते अगदी घासून-पुसूनच स्वच्छ करायला हवं असं नाही, तर हलक्या हातानेसुद्धा ते स्वच्छ केलं तरी पुष्कळ आहे.

आरोग्य उत्तम ठेवायचं असेल तर लक्षात ठेवा 'या' 6 गोष्टी

अशी करा स्वच्छता - किचनमधल्या सिंकची स्वच्छता करताना दर दोन आठवड्यानंतर सिट्रस आणि बर्फाचे तुकडे सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीमध्ये टाका. जर पाईपलाईनमध्ये कुठे कचरा किंवा घाण जमा असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी बर्फाचे तुकडे फायदेशीर ठरतात. शक्य झालंच तर सिंकसाठी एक ड्रेन कव्हर तुम्ही खरेदी कराच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 8, 2019 03:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading