कच्ची पपई खाल्ल्याने वाढते रोगप्रतिकारक शक्ती; आणखीही आहेत फायदे

कच्ची पपई खाल्ल्याने वाढते रोगप्रतिकारक शक्ती; आणखीही आहेत फायदे

कच्च्या पपईमध्ये भरपूपर प्रमाणात असतं 'अ', 'ई' आणि 'क' व्हिटॅमिन

  • Share this:

मुंबई, 15 जून : खायला आवडत नसली तरी कच्ची पपई ही आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असते. विशेषतः कावीळ झालेल्या व्यक्तीच्या लिव्हरवर सूज येत असल्यामुळे अशा रुग्णांना कच्ची पपई खाणे फायद्याचे ठरू शकते.

कच्च्या पपईमध्ये भरपूपर प्रमाणात 'अ', 'ई' आणि 'क' व्हिटॅमिन असतं. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ही जीवनसत्त्वे फायदेशीर ठरतात. सर्दी-पडसाचा त्रास होत असेल तर कच्ची पपई खावी. लघवीसंबंधीच्या समस्यांचंही कच्च्या पपईमुळे निराकरण होऊ शकतं.

चष्मा सोडवायचा आहे? मग घरच्याघरी करा 'हे' सोपे उपाय

शरीरावर अनेक ठिकाणी लव म्हणजेच नको असलेले केस उगवतात. ते काढण्यासाठी कच्ची पपई उत्तम आहे. प्रत्येकवेळी व्हॅक्स आणि शेव्हिंग करण्याऐवजी पपईचा वापर करावा. हा उपाय कोणत्याही दुखापतीशिवाय करता येतो.

हृदया संबंधी काही आजार झाले असतील त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कच्ची पपई फायदेशीर ठरते. यात पोषक तत्व असतात जसे फायबर, विटामिन C आणि एन्टी ऑक्सिडेंट मोठ्या मात्रेत उपलब्ध असतो, ज्यामुळे रक्तात कोलेस्ट्रोल जमा होत नाही. आपल्याला हृदया संबंधी आजार होण्याची संभावना कमी होते.

किशोरवयीन मुलांच्या आहारात 'या' 5 गोष्टी असायलाच हव्यात

फास्ट फूड खाल्ल्याने पचनशक्ती कमी होते. त्यामुळे अनेक प्रकारचे आजार होतात. पपई मध्ये अनेक प्रकारचे एन्झाईम्स असल्यामुळे पचनक्रिया चांगली होते आणि पचनशक्ती वाढते. शरीराला ऊर्जा देण्यासाठी यातलं डाईट्रि फायबर फायदेशीर असतं.

पपईमध्ये भरपूर प्रमाणात असणारं व्हिटॅमिन 'ए' आणि 'सी' हे डोळ्यांसाठी फायदेमंद ठरतात. वय वाढल्यावर दृष्टी कमी होते, पण कच्ची पपई खाल्ल्याने डोळ्यांना फायदा होतो.

First published: June 15, 2019, 11:25 PM IST
Tags: health

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading