व्यायाम न करता फिट राहायचं असेल, तर परफेक्ट आहे 'हा' उपाय

पायी चालणे हा अतिशय सुंदर व्यायाम असून, त्यामुळे तणाव कमी होतो. झोपही चांगली लागते.

News18 Lokmat | Updated On: Jun 10, 2019 09:19 PM IST

व्यायाम न करता फिट राहायचं असेल, तर परफेक्ट आहे 'हा' उपाय

मुंबई, 10 जून : जर व्यायाम न करता तुम्हाला फिट राहायचं असेल तर चालणं सुरू करा. चालण्याने केवळ तुम्ही तंदुरुस्तच राहता नाही, तर हृदयाशी संबंधित रोगांचा धोकासुद्धा कमी होतो. पायी चालणे हा अतिशय सुंदर व्यायाम असून, त्यामुळे तणाव कमी होतो. झोपही चांगली लागते. चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठऱते.

आजच्या जीवनशैलीमध्ये चालणे फारच गरजेचे झाले आहे. ज्यांना सर्वसाधारणपणे वेगाने चालण्याची सवय आहे, अशा व्यक्ती मंदगतीने चालणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत जास्त काळ जगतात. दिवसभर काम करून आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो. शिवाय हाडांची मजबूतीही चालण्यामुळे वाढते.

मधुमेह टाळता येऊ शकतो, त्यासाठी 'असा' असायला हवा आहार

सतत गाडी वापरल्यामुळे आपण पायी चालणं विसरत चाललो आहोत. थोडंफार चालल्यानेही अनेकदा श्वास लागतो. असे होत असल्यास शरीराने आपल्याला हा इशारा दिला आहे असं समजावं. त्यामुळे चालायची संधी मिळाली तर ती अजिबात सोडू नका.

दररोज 5 किलोमीटर चालल्याने तुम्ही कायम तंदुरूस्त राहता. चालण्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही व्यायाम होतात. साधारणपणे रोज तीस मिनिटे चालल्यास दोनशे कॅलरी खर्च होतात. ह्रदयरोग, उच्च रक्तदाब, पाठीचे दुखणे तसंच श्वासनाच्या त्रासासाठी चालणे फायदेशीर ठरतं.

Loading...

मन आणि मेंदू शांत ठेवतात 'ही' योगासने

चालणे ज्याला शास्त्रीय भाषेत फिटनेस वॉकिंग म्हणतात ते व्हायला हवे. म्हणजे थोड्या वेगात, लयबद्धरित्या आणि ज्यात पावलांवर कमी दाब पडतो अशी शारिरीक क्रिया म्हणजे फिटनेस वॉकिग. यातून व्यायाम केल्यानंतरचे सर्व फायदे मिळतात. फिटनेस वॉकिंग म्हणजे जोरात पळणे किंवा जॉगिंग नव्हे. वजन कमी करण्यासाठी फिटनेस वॉकिंग अतिशय फायदेशीर ठरतं. डोंगरवर किंवा पायऱ्या चढ-उतार केल्यास कॅलरी खर्च होण्याचे प्रमाण वाढते. वेगाच चालण्याने पाय, नितंब, पोटाच्या पेशींना तर ताकद मिळतेच शिवाय चरबी कमी होते.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: health
First Published: Jun 10, 2019 09:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...